पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मिती

नाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील कृष्णदास रावजी जमधडे यांचे २४ हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे शेड आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कोंबडी खतावर प्रक्रिया करून ‘पॅलेट’ स्वरूपातील प्रक्रियायुक्त खत त्यांनी उपलब्ध केले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून त्यास चांगली मागणीआहे.
Poultry of Krishnadas Jamdhade with modern technology
Poultry of Krishnadas Jamdhade with modern technology

नाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील कृष्णदास रावजी जमधडे यांचे २४ हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे शेड आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कोंबडी खतावर प्रक्रिया करून ‘पॅलेट’ स्वरूपातील प्रक्रियायुक्त खत त्यांनी उपलब्ध केले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून त्यास चांगली मागणी असून, महिन्याला ८०० ते ९०० बॅग एवढी विक्री होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.  नाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील कृष्णदास रावजी जमधडे यांनी २००६ मध्ये शेतीला पूरक म्हणून करार पद्धतीने ब्रॉयलर कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांनी चांगल्या प्रकारे स्थैर्य मिळवले. मध्यंतरीच्या काळात चेन्नई येथील पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या पोल्ट्री विभागाचे माजी प्रमुख डॉ. देवारेड्डी नरहरी यांचा लेख त्यांच्या वाचनात लेख आला. कोंबडी खत पॅलेट स्वरूपात बनविल्यास शेतात त्याचा वापर अधिक फायदेशीर ठरतो असे त्यात म्हटले होते. जमधडे यांना तो लेख अत्यंत महत्त्वाचा वाटला. त्यांनी उत्पादन व संधीच्या बाजू तपासल्या. अलीकडे विविध पिकांसाठी कोंबडी खताची मागणी वाढत आहे. शिवाय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या कोंबडी विष्ठेवर प्रक्रिया केल्यास त्याला चांगला उठाव मिळेल ही बाब त्यांनी हेरली. त्यातून दाणेदार कोंबडी खत प्रक्रिया उद्योग उभारण्याची प्रेरणा मिळाली.  कल्पकतेने उभारलेला प्रकल्प  सुरुवातीला घरगुती पद्धतीने ग्राइंडरचा वापर करून खतनिर्मिती सुरू केली. मात्र त्यात अपेक्षित क्षमतेचे उत्पादन होत नव्हते. मग स्वतः संरचना तयार करून पुणे येथून प्रक्रिया यंत्र बनवून घेतले. त्यात पुढे सुधारणा करीत थ्री-फेज वीजजोडणीवर आधारित यंत्राची निर्मिती केली. स्वकल्पनेतून हे युनिट तयार करण्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च आला. संशोधकवृत्ती व उद्यमशिलतेतून ‘खुशाल ॲग्रोटेक’ नावाने दाणेदार कोंबडी खतनिर्मिती प्रकल्प स्वमालकीच्या जागेत उभा राहिला. नेटवर्क  तीन वर्षांत सुमारे एक हजार ते बाराशेपर्यंत शेतकरी ग्राहकांचे नेटवर्क जोडले असून, त्यातून विक्री सुकर होते. नाशिकसह औरंगाबाद, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर खताचा पुरवठा केला जातो. प्रामुख्याने ऊस, कांदा, फळबागा यासाठी शेतकऱ्यांची मागणी अधिक असल्याचे जमधडे सांगतात. सोलापूर, सातारा या जिल्ह्यांतूनही मागणी आहे. मात्र उत्पादन क्षमता मर्यादित असल्याने तेवढा पुरवठा शक्य होत नाही. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी नवे युनिट कार्यान्वित करण्याचे प्रयत्न आहेत. कामाचे व्यवस्थापन  

  • किमान मनुष्यबळात काम. पोल्ट्रीसाठी ४, तर खतनिर्मितीत केवळ दोन जण कार्यरत.  मजूर खर्चात बचत.
  • पत्नी भारती, यांच्यासह मुले तुषार व संकेत यांची उद्योगात मोठी मदत
  • उत्पादनपश्‍चात ग्राहक मागणी नोंदवून विक्री
  • शेतकऱ्यांनी आगाऊ पैसे पाठविल्यास मागणीप्रमाणे थेट बांधावर खतपुरवठा
  • शेतकऱ्यांत जागृती  कोंबडी खताचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते हे वाचनात आले. सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्याने रासायनिक खतांच्या वापरात बचत करणे शक्‍य होते असे प्रा. नरहरी यांचे म्हणणे होते. त्यानुसार वापराच्या बाजू जमधडे यांनी अभ्यासल्या. त्यादृष्टीने कोंबडी खताचे पिकांसाठीचे महत्त्व समजून सांगत कमी खर्चात वापर व्हावा हे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. विविध भागांतून शेतकरी संपर्क करून माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. प्रत्येकाला वेळ देऊन उत्पादन व वापरासंबंधी ते मार्गदर्शन करतात.  पोल्ट्री क्षमता 

  • एकूण क्षमता - २४ हजार पक्षी
  • एकूण पक्षिगृहे (शेडस)- ३, प्रत्येकी शेडमध्ये ८ हजार पक्षी
  • वर्षभर पूर्ण क्षमतेने ४० ते ४५ दिवसांच्या अशा एकूण सहा ६ बॅचेस घेतल्या जातात.
  • खतनिर्मिती 

  • बॅच संपल्यानंतर प्रत्येक शेडमधून बेडवर वापरलेले भाताचे तूस व कोंबडीच्या विष्ठेसह एकूण ८ टन कोंबडी खत (कच्चा माल) मिळते. म्हणजेच वर्षभर प्रति शेड ५० टन याप्रमाणे तीन शेड्‍समधून १५० टन खत उपलब्ध होते. 
  • घरच्या पोल्ट्रीतून मिळणारे खत वर्षभर पुरेसे नसल्याने परिसरातील पोल्ट्री उत्पादकांकडून महिन्याला सरासरी ४० टन कोंबडी विष्ठेची (खताची) खरेदी. प्रति किलो ३ रुपयांप्रमाणे वाहतुकीसह थेट दारात उपलब्ध.
  • निर्मितीत निंबोळी पावडर, ह्युमिक ॲसिड यांचाही वापर होतो. 
  • वर्षभर एकूण सुमारे ६५० टन एवढी प्रक्रिया करून सहा मिमी. आकार असलेले पॅलेट स्वरूपातील खत विक्रीसाठी तयार होते. 
  • ४५ किलो वजनाच्या गोणीत भरून कोरड्या जागेत साठवण केली जाते. 
  • या गोणीची किंमत ३७० रुपये आहे.  
  • जमधडे सांगतात, की पूर्वी पावडर स्वरूपात हे खत उपलब्ध व्हायचे. मात्र देताना त्याचा व्यय व्हायचा. आता पॅलेट स्वरूप असल्याने ते पिकाला पुरेपूर लागू होते. दुर्गंधीही येत नाही.
  • वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. अतिरिक्त पाणी निचरा होण्यासह पाणीधारणा क्षमता वाढते. 
  • महिन्याला सुमारे ८०० ते ९०० बॅग एवढी विक्री होते. ४५ किलो खताची गोणी असून, किंमत ३७० रुपये आहे.  
  • संपर्क : कृष्णदास जमधडे  ९४२११५५७४१ तुषार जमधडे  ७८२०२०१६१७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com