भाजीपाला पिकावरील कीडनियंत्रण

कमाल व किमान तापमानात होणारी घट, अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ हवामान यामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसतो. पिकांवर येणाऱ्या विविध किडींची लक्षणे वेळीच ओळखून नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे फायद्याचे ठरते.
Pest control on vegetable crops
Pest control on vegetable crops

काकडीवर्गीय भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, कांदा, गवार आणि चवळी ही उन्हाळी हंगामात घेतली जाणारी महत्त्वाची पिके आहेत. कमाल व किमान तापमानात होणारी घट, अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ हवामान यामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसतो. पिकांवर येणाऱ्या विविध किडींची लक्षणे वेळीच ओळखून नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे फायद्याचे ठरते. काकडी  मावा व तुडतुडे  लक्षणे 

  • हे पानांच्या खालील बाजूने समूहाने राहतात. आणि पानांतील रस शोषण करतात. त्यामुळे पाने सुकतात व प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते.
  • पाने वेडीवाकळी होतात. 
  •  तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास, संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन पानांच्या कडा दुमडतात.
  •  या किडींमुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रसार होतो. 
  • उपाययोजना 

  • एकरी २५ पिवळे चिकट सापळे लावावेत.
  • निबोळी अर्क (१० टक्के)
  •  इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यूजी) ०.७ मिलि प्रति १० लिटर पाणी
  • पांढरी माशी  लक्षणे 

  • पांढऱ्या माशीची पिले पानांच्या मागील बाजूने राहून पानांतील रस शोषण करतात.
  • पिले शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे पिकांमध्ये विविध रोगांच्या विषाणूचा प्रसार होतो.
  • पाने पिवळी पडून सुकतात. 
  • उपाययोजना  (फवारणी प्रति लिटर पाणी)

  •  पिवळे चिकट सापळे एकरी १० लावावेत.
  •  निंबोळी अर्क (१० टक्के)
  •  ॲफिडोपायरोपेन २ मिलि 
  • फळमाशी  आर्थिक नुकसान पातळी  पाच टक्के फळांना छिद्रे पडलेली किंवा फळे खराब झालेली आढळणे. लक्षणे  अळी फळाच्या आत गरामध्ये राहते. त्यामुळे पूर्ण फळ खराब होऊन जमिनीवर पडतात. अशी फळे खाण्यास योग्य राहत नाही.  उपाययोजना 

  • प्रादुर्भावग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.
  • फळ माशीला पकडण्यासाठी सापळ्यांचा वापर करावा. प्लॅस्टिक बॅगमध्ये मिथील युजेनॉल अधिक मॅलेथिऑन (५ ईसी) १ः१ या प्रमाणात मिश्रण तयार करावे. याचा प्रति २५ हेक्टरसाठी वापर करावा.
  • फळे पेपरबॅग किंवा कापडाने झाकून घ्यावीत.
  • फवारणी प्रति लिटर पाणी फ्ल्युबेंडायअमाईड अधिक डेल्टामेथ्रिन (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मिलि  टरबूज आणि खरबूज  पाने खाणारे भुंगे व ठिपक्यांचे भुंगेरे  लक्षणे  प्रौढ भुंगे वेलीवरील कोवळी पाने खातात. परिणामी पानांवर छिद्र पडतात. लाल कोळी  लक्षणे  

  •  पाने पिवळी पडतात. पानांवर गुठळ्या तयार होतात.
  •  पानांच्या खालील बाजूने राहून रस शोषण करतात. 
  •  या किडी अप्रत्यक्षपणे विविध रोगांचे वाहक म्हणून काम करतात.
  • उपाययोजना  (फवारणी प्रति लिटर पाणी) डायफेन्थ्युरॉन (५० टक्के डब्ल्यूपी) १.२ ग्रॅम   पांढरी माशी  लक्षणे 

  •  माशीची पिले पानांच्या मागच्या बाजूने राहून पानांतील रस शोषून घेतात. 
  •  पिले शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे पिकांमध्ये विविध रोगांच्या विषाणूचा प्रसार होतो.
  •  पाने पिवळी पडून सुकतात. 
  • उपाययोजना 

  •  एकरी १० पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
  •  निंबोळी अर्क (१० टक्के)
  • फवारणी प्रति लिटर पाणी
  •  डायफेन्थ्युरॉन (५० टक्के डब्ल्यूपी) १.२ ग्रॅम  
  • कांदा  फुलकिडे  लक्षणे

  •  प्रौढ व पिले पाने खरडून त्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. परिणामी, वेडीवाकडी होऊन वाळतात.
  •  पाने वाळल्यामुळे कांदा नीट पोसत नाही. तसेच बीजोत्पादनाच्या कांद्यामध्ये बीजनिर्मिती होत नाही.
  • आर्थिक नुकसान पातळी  प्रति झाड ३० फुलकिडे उपाययोजना 

  •  निम कोटेड युरियाचा वापर करावा.
  •  निळे चिकट सापळे एकरी १० या प्रमाणात वापरावे.
  •  व्हर्टिसिलिअम लेकॅनी (३ टक्के) ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • रासायनिक नियंत्रण : (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • डेल्टामेथ्रीन (११ टक्के) ०.३ मिलि    किंवा 
  • डायमेथोएट (३० टक्के) ६.६ मिलि किंवा
  • फिप्रोनिल (८० टक्के) १.५ मिलि किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मिलि. 
  • गवार  शेंगा पोखरणारी अळी (तंबाखूवरील पाने खाणारी अळी)  लक्षणे 

  •  अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकपणे पानांचा हिरवा भाग खातात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात. 
  •  जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाला पाने शिल्लक राहत नाही. 
  •  अळ्या नंतर शेंगा छिद्र करतात तसेच शेंगा खातात.
  • उपाययोजना 

  •  प्रादुर्भावग्रस्त पाने व फळे वेचून नष्ट करावेत. 
  •  हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
  • ( टीप : लेखातील कीटकनाशकांना  लेबल क्लेम्स आहेत.) - डॉ. वंदना मोहोड,  ७०२०९०९७२८, डॉ. एस. एम. घावडे,  ७०२०५७५८६७ (मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com