भुईमुगातील पतंगवर्गीय, भूमिगत किडी

भुईमुग पिकामध्ये पतंगवर्गीय किडी, भूमिगत किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. पतंगवर्गीय किडींमध्ये पाने पोखरणारी अळी (नागअळी), तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्यूरा), लाल केसाळ अळींचा समावेश होतो. तर भूमिगत किडींमध्ये वाळवी आणि हुमणी अळीचा समावेश होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
pest  in groundnut crop
pest in groundnut crop

भुईमुग पिकामध्ये पतंगवर्गीय किडी, भूमिगत किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. पतंगवर्गीय किडींमध्ये पाने पोखरणारी अळी (नागअळी), तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्यूरा), लाल केसाळ अळींचा समावेश होतो. तर भूमिगत किडींमध्ये वाळवी आणि हुमणी अळीचा समावेश होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे. पतंगवर्गीय किडी पाने पोखरणारी अळी (नागअळी)  

  • भुईमूग पिकावर अगदी सुरुवातीच्या पीक अवस्थेपासूनच पाने पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो.
  • प्रौढ मादी पतंग पानांवर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी सुरुवातीला पाने पोखरते. पानाच्या शिरेच्या मध्यभागी किंवा टोकावर फोडासारखा फिक्कट रंगाचा ठिपका दिसतो. हा ठिपका फोडून पाहील्यास  हिरव्या रंगाचे डोके असलेली अळी दिसते. 
  • कालांतराने अळी भुईमूगाची दोन पाने किंवा एकाच पानाच्या दोन कडा एकत्र गुंडाळून आतील बाजू खाते. वाढ पूर्ण झाल्यानंतर कोषावस्थेत जाते.
  • आर्थिक नुकसान पातळी २ ते ३ अळ्या प्रति झाड किंवा झाडाच्या मध्यभागी १० टक्के पाने पोखरलेली.  तंबाखूवरील पाने खाणारी अळी  (स्पोडोप्टेरा लिट्यूरा) 

  • भुईमूग पिकाच्या पानांवर मादी पतंग संपूर्ण आयुष्यात १००० पेक्षा जास्त अंडी पुंजक्यात घालते. एका अंडीपुंजामध्ये १५० ते ३५० अंडी असू शकतात. 
  • अंडीपुंजातून निघालेल्या पांढरट, हिरव्या पारदर्शक लहान अळ्या सामुहिकपणे पानातील हरितद्रव्य खातात, त्यामुळे पाने जाळीदार होतात. पानांवर पांढरे चट्टे दिसतात. 
  • अळ्या तिसऱ्या अवस्थेत आल्यानंतर अलग होऊन पाने खातात. मोठ्या अळ्या रात्रीच्या वेळी झाडाची पाने, कोवळे शेंडे खाऊन पानांच्या फक्त शिराच शिल्लक ठेवतात. जमिनीलगतच्या फांद्यासुद्धा खातात. -पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेगवेगळ्या रंगाच्या होतात. प्रामुख्याने मळकट हिरव्या रंगाच्या असून, शरीरावर पिवळसर तपकिरी रेषा, काळे ठिपके तर शरीराच्या दोन्ही बाजूने पांढरे चट्टे दिसून येतात. 
  • या किडीच्या प्रादुर्भावामुळे ७० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. 
  • आर्थिक नुकसान पातळी : २ अळ्या प्रति झाड किंवा एक अंडीपुंज प्रति चौरस मीटर. 
  • नियंत्रणासाठी फवारणी (प्रमाण प्रति १० लिटर पाणी) फ्लूबेंडायअमाईड (२% डब्ल्यूजी) ६ ग्रॅम क्विनॉलफॉस (२०% एएफ) १६.६७ मि.लि. फिप्रोनिल (४०%) अधिक इमिडाक्लोप्रिड (४०% डब्ल्यूजी) २.५ ते  ३ ग्रॅम लाल केसाळ अळी 

  • मादी पतंग मिलनानंतर पानावर पुंजक्यात अंडी घालतात. अंडी पुंजातून बाहेर पडलेल्या अळ्या खादाड, सामुहिकपणे पानाच्या खालच्या बाजूवर राहून पानातील हरितद्रव्य खातात. पानाची जाळी करतात. दुसऱ्या अवस्थेपर्यंत अळ्या समूहाने एकाच पानावर राहतात. अळ्या मोठ्या झाल्यावर संपूर्ण  शेतात पसरतात. पाने खाऊन उपजीविका करतात. 
  • संपूर्ण वाढ झालेली अळी लालसर तपकिरी, अंगावर दोन्ही बाजूने काळे पट्टे असून, संपूर्ण शरीरावर लालसर तपकिरी केस असतात. 
  • अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीत झाडाचे खोडच शिल्लक राहते. एका शेतामधून दुसऱ्या शेतात स्थलांतर करतात. 
  • पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होते.
  • आर्थिक नुकसान पातळी - १० टक्के प्रादुर्भावग्रस्त पाने
  • भूमिगत किडी वाळवी 

  • पीक लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत वाळवीचा मुळावर कोणत्याही अवस्थेत प्रादुर्भाव. 
  • वाळवीची वसाहत वारुळामध्ये असून, ती वारुळे खोल आणि जास्त अंतरापर्यंत विस्तारलेली असू शकतात. 
  • वाळवीमध्ये राणी, कामकरी, सैनिक आणि प्रजोत्पादन करणारे वाळवी अशी त्यांची कुटुंबव्यवस्था असते. 
  • वाळवी ही झाडांच्या मुळांवर उपजीविका करते. झाडे पूर्ण वाळतात आणि मरतात. वाळवी किडीचा प्रादुर्भाव असलेली झाडे उपटल्यास अगदी सहजतेने निघून येतात. 
  • वाळवी किडीच्या व्यवस्थापनाकरिता बांधावरील व शेताच्या आसपास असलेली सर्व वारुळे खोदून काढावीत. त्यातील राणीचा शोध घेऊन नष्ट करावे. वारूळ नष्ट केल्यानंतर जमीन सपाट करून मध्यभागी ३० सेंमी खोल एक छिद्र करावे. त्यात क्लोरपायरीफॉस (२०% प्रवाही) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी हे द्रावण वारुळात टाकावे. एका सरासरी विस्तारलेल्या वारुळाकरिता ५० लिटर द्रावण पुरेसे आहे. 
  • वाळवी किडीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता, प्रादुर्भावग्रस्त जागेवर आणि सभोवतालच्या एक चौरस मीटर परिघातील झाडांना ड्रेचिंग करावे. थायामिथोक्झाम (७५% एस.जी.) २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी. 
  • हुमणी अळी 

  • विविध पिकांच्या मुळावर उपजीविका करणारी बहुभक्षी कीड. 
  • प्रादुर्भावग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून वाळतात. 
  • वालुकामय जमिनीमध्ये अधिक प्रादुर्भाव. 
  • हुमणीची प्रथम अळी अवस्था पांढरी, पिवळसर तपकिरी डोके. ही अवस्था पिकाची तंतूमुळे खाते. तंतूमुळांवर उपजीविका करून झाल्यावर मुख्य मुळांकडे वळते. 
  • पूर्ण विकसित अळी पिवळसर पांढरी, डोक्‍याचा रंग बदामी, तपकिरी असून, आकार इंग्रजी ‘सी’ अक्षराप्रमाणे अर्धगोलाकार असतो. दुसऱ्या अवस्थेपासून पुढे अळी जमिनीलगतच्या खोडाचा भाग व सोटमूळ पोखरते, त्यामुळे झाड वाळते. 
  • हुमणी भुंगेरे (प्रौढावस्था) भुईमुग पिकाव्यतिरिक्त अन्य पिकांवर तसेच बाभळी व कडुनिंबाच्या झाडांवर उपजीविका करतात. 
  • किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादनामध्ये ३० ते ८० टक्क्यांपर्यंत घट शक्य. 
  • आर्थिक नुकसान पातळी- एक अळी प्रति चौरस मीटर फवारणी (प्रमाण प्रति १० लिटर पाणी) फिप्रोनिल (४०%) अधिक इमिडाक्लोप्रीड (४०% डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक) २.५ ते ३ ग्रॅम.
  • संपर्क - डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५,  (विषय विशेषज्ञ -कीटकशास्त्र) (कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख  कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com