agricultural news in marathi pomegranate advisory | Agrowon

डाळिंब सल्ला

डॉ. एन. व्ही. सिंह, दिनकर चौधरी
रविवार, 18 एप्रिल 2021

हस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग ने झाकून पिशवीचे खालचे तोंड उघडे ठेवावे. किंवा डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्यासाठी क्रॉपकव्हरचा वापर करावा. 

हस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग ने झाकून पिशवीचे खालचे तोंड उघडे ठेवावे. किंवा डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्यासाठी क्रॉपकव्हरचा वापर करावा. 

हस्त बहर (सप्टेंबर-ऑक्टोबर पीक नियमन) 
बागेची अवस्था 

फळे तोडणी आणि फळे तोडणीनंतर झाडांना विश्रांती.

बागेची मशागत

  • हस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग ने झाकून पिशवीचे खालचे तोंड उघडे ठेवावे. किंवा डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्यासाठी क्रॉपकव्हरचा वापर करावा. 
  •  क्रॉपकव्हरने शेंड्यापासून दोन्ही बाजूंस १.५ ते ३.० फूट झाकावे. जेणेकरून तीव्र सूर्यकिरणांमुळे फळांचे होणारे नुकसान टाळले जाईल. क्रॉपकव्हर झाकतांना झाडाची उंची आणि घेर विचारात घ्यावे. जेणेकरून पश्‍चिमेकडील बाजू ६० टक्क्यांपर्यंत झाकली जाईल. कारण त्याबाजूस दुपारनंतरचे ऊन प्रखर असते. क्रॉपकव्हरचा वापर केल्याने काही प्रमाणात अजैविक कारणाने होणारी फळफूट कमी होते.
  •  फळे असलेल्या फांद्यावर फळांचा भार जास्त असेल तर त्यांना बांधून आधार द्यावा.
  •  हस्त बहराची फळे तोडून झाल्यावर मध्यम ते जास्त छाटणीची शिफारस करण्यात येते. यामध्ये रोगग्रस्त, गुंतलेल्या, मोडलेल्या, वाळलेल्या, गर्दी असलेल्या फांद्या काढाव्यात. आणि अन्नद्रव्यांचा बेसल डोस द्यावा.

आंबिया बहर (जानेवारी-फेब्रुवारी बहर नियमन) 
बागेची अवस्था 

 फळ धारणा आणि फळाची वाढ.

बागेची मशागत 

  •  कोवळी फूट अधिक असेल तर कोवळे शेंडे खुडणे.
  •  फळधारक फांद्यांना आणि झाडांना बांधून आधार देणे.
  •  प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळांवर डाग पडण्याची शक्यता आहे.
  •  फळ लिंबू आकाराचे किंवा १०० ग्रॅम वजनाचे झाल्यानंतर प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यावर डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी फळे संरक्षक पिशवीने किंवा पूर्ण ओळ क्रॉप कव्हरने झाकावी.

-  दिनकर चौधरी,  ०२१७-२३५००७४
(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...