डाळिंबातील कीड- रोग नियंत्रण

बहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास ब्लिचिंग पावडर (३३ टक्के सीएल) २५ किलो प्रति १००० लिटर पाणी प्रति हेक्टर याप्रमाणात माती किमान १ इंच माती ओली होईल असे ड्रेंचिंग करावे.
Bacterial Blight on pomegranate
Bacterial Blight on pomegranate

बहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास ब्लिचिंग पावडर (३३ टक्के सीएल) २५ किलो प्रति १००० लिटर पाणी प्रति हेक्टर याप्रमाणात माती किमान १ इंच माती ओली होईल असे ड्रेंचिंग करावे. मृग बहर (मे-जून पीक नियमन)  कीड व्यवस्थापन 

  • खोड किडा, शॉट/पिन होल बोरर, वाळवी इत्यादींसाठी झाडाचे नियमित निरीक्षण करावे.
  • किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी) २० मिलि अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करावी. जमिनीपासून २ ते २.५ फुटांवर खोडावर लेप द्यावा.
  • रोग व्यवस्थापन (फवारणी प्रति लिटर पाणी) तेलकट डाग रोग आणि बुरशीजन्य ठिपके 

  • बोर्डो मिश्रण तयार करून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी किंवा
  • कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ते ३ ग्रॅम किंवा
  • कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ टक्के) २ ते २.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.३ ते ०.५ मिलि
  • बहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास ब्लिचिंग पावडर (३३ टक्के सीएल) २५ किलो प्रति १००० लिटर पाणी प्रति हेक्टर याप्रमाणात माती किमान १ इंच माती ओली होईल असे ड्रेंचिंग करावे.
  • हस्त बहर (सप्टेबर-ऑक्टोबर पीक नियमन) विश्रांती काळ  पानांवरील रस शोषणाऱ्या किडी  (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ०.५ ते ०.७५ मिलि किंवा
  • इंडोक्झाकार्ब (१४ टक्के एससी) ०.५ ते ०.७५ मिलि किंवा
  • सायॲन्ट्रानिलिप्रोल ०.७५ मिलि किंवा
  • थायामेथॉक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम
  • खोड किडा (शॉर्ट होल/स्टेम होल बोरर) 

  • लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी) २० मिलि अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक १० लिटर पाणी एकत्रित मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत खुंटावर लावावी. किंवा
  • थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) १० ते १५ ग्रॅम अधिक प्रॉपिकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १५ ते २० मिलि प्रति १० लिटर द्रावण प्रति झाड याप्रमाणे ड्रेचिंग करावे.
  • मिलिबग  (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • प्राथमिक अवस्थेत, ॲझाडिरेक्टीन किंवा कडुनिंबयुक्त तेल (१०,००० पीपीएम) १ टक्का अधिक करंज (पोंगामिया) तेल ३ मिलि
  • उशिरा प्रादुर्भाव दिसून आल्यास, थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.७५ मिलि
  • कोळी (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • प्राथमिक अवस्थेत, ॲझाडिरेक्टीन किंवा कडुनिंबयुक्त तेल (१०,००० पीपीएम) ३ मिलि
  • उशिरा प्रादुर्भाव दिसून आल्यास, फेनाझाक्वीन (१० टक्के ईसी) १.५ मिलि किंवा फेनप्रॉक्सिमेट (५ टक्के ईसी) ०.४ मिलि
  • मर आणि सूत्रकृमी (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) ३ ग्रॅम किंवा
  • २ ब्रोमो २ नायट्रो प्रोपेन १-३ डायोल (९५ टक्के) ०.५ ग्रॅम
  • १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • - (०२१७) २३५४३३०, दिनकर चौधरी, ९६२३४४४३८० (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com