agricultural news in marathi pomegranate advisory | Page 2 ||| Agrowon

डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग व्यवस्थापण

डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. सोमनाथ पोखरे, डॉ. मल्लिकार्जुन.
मंगळवार, 20 एप्रिल 2021

डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. योग्य वेळी उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते. 

डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. योग्य वेळी उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते. 

अंबिया बहर (जानेवारी-फेब्रुवारी बहर नियमन) 

फळ पोखरणारी अळी (अंडी अवस्था) : (फवारणी प्रति लिटर पाणी)

 • ॲझाडिरेक्टीन किंवा कडुनिंबयुक्त तेल (१००० पीपीएम) ३ मिलि किंवा पोंगामिया (करंज बियांचे तेल) ३ मिलि ७ ते ८ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्‍यात.
 • सायॲन्ट्रीनिलीप्रोल ०.७५ मिलि किंवा क्लोरॲन्ट्रीनिलिप्रोल (१८.५ एससी) ०.७५ मिलि किंवा टोलफेनपायरॉड (१५ टक्के इसी) ०.७५ मिलि किंवा फ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यूजी) ०.७५ ते १.० मिलि.
 • खराब झालेली आणि छिद्रे पडलेली फळे काढून खड्ड्यात पुरून टाकावीत.

मिलिबग : (फवारणी प्रति लिटर पाणी)

 • ॲझाडिरेक्टीन किंवा कडुनिंबयुक्त तेल (१०, ००० पीपीएम) ३ मिलि अधिक पोंगामिया तेल ३ मिलि
 • उशिरा प्रादुर्भाव आढळून आल्यास,
  थायामेथॉक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५ टक्के झेडसी) ०.७५ मिलि

कोळी 

 • अझाडिरेक्टीन किंवा कडुनिंबयुक्त तेल (१०, ००० पीपीएम) ३ मिलि
 • उशिरा प्रादुर्भाव दिसून आल्यास,
  फेनाझाक्वीन (१० टक्के ईसी) १.५ मिलि किंवा फेनप्रॉक्सिमेट (५ टक्के ईसी) ०.४ मिलि

रोग व्यवस्थापन : (फवारणी प्रति लिटर पाण्यातून)
बहार व्यवस्थापन वेळेस फवारण्या (२ फवारण्यामधील अंतर १० ते १४ दिवस)

 • सॅलिसिलिक ॲसीड ०.३ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून ४ फवारण्या एक महिन्याच्या अंतराने फुलधारणेच्या आधीपासून घ्याव्यात.
 • बोर्डो मिश्रण (०.५ टक्के) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५-३ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ टक्के डब्ल्यूपी) २ ते २.५ ग्रॅम किंवा २ ब्रोमो २ नायट्रो प्रोपेन १-३ डायोल (९५ टक्के) ०.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.३ ते ०.५ मिलि

तेलकट रोग 
स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट (९० टक्के) अधिक टेट्रा सायक्लिन हायड्रोक्लोराईड (१० टक्के) (स्ट्रेप्टोमायसीन) ०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी याप्रमाणे महिन्यातून एकदा फवारणी करावी.

बुरशीजन्य स्कॅब, ठिपके आणि कुजव्या : (फवारणी प्रति लिटर पाणी)

 • मॅन्डीप्रोपॅमिड (२३.४ टक्के एससी) १ मिलि
 • मेटीराम (५५ टक्के अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबिन (५ टक्के डब्ल्यूजी) ३ ग्रॅम
 • प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मिली अधिक ॲझोक्सिस्ट्रोबीन (२३ टक्के एससी) १ मिलि
 • अ‍ॅझॉक्सीस्ट्रोबीन (२० टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (१२.५ टक्के एससी) २ मिलि
 • क्लोरोथॅलोनिल (५०टक्के) अधिक मेटॅलॅक्झील-एम (३.७५ टक्के) २ मिलि
 • बोर्डो मिश्रण (०.५ टक्के)
 • ट्रायसायक्लॅझोल (१८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६२ टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम
 • झायनेब (६८ टक्के) अधिक हेक्साकोनॅझोल (४ टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम
 • क्लोरोथॅलोनिल (७५ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम
 • प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मिलि
 • कॉपर ऑक्सिक्लोराईड (४५ टक्के) अधिक कासुगामायसिन (५ टक्के) २.५ ग्रॅम

( टीप : वरीलपैकी कोणत्याही बुरशींनाशकाच्या २ ते ३ फवारण्या १० ते १४ दिवसांच्या अंतराने केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे पुढील अनेक फवारण्या टाळता येतात. बोर्डो मिश्रणा व्यतिरिक्त प्रत्येक फवारणीत स्टिकर स्प्रेडर वापरावे. एका हंगामात कॉपरजन्य बुरशीनाशकांव्यतिरिक्त कोणतेही बुरशीनाशक २ पेक्षा जास्त वेळ फवारू नये.)

बुरशीजन्य मर रोग 
नियंत्रणासाठी तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या सुरवातीच्या टप्प्यात खालीलपैकी एका पद्धतीने ड्रेचिंग करावे.

पहिली पद्धत 
पहिली ड्रेचिंग

प्रोपीकोनॅझोल (२५%) २ मिली अधिक क्लोरपायरीफॉस २ मिलि प्रती लिटर पाणी या प्रमाणे १० लिटर द्रावण प्रती झाड.

दुसरी ड्रेंचिंग (पहिल्या ड्रेचिंगनंतर ३० दिवसाने)
अ‍ॅस्परजिलस नायजर (एएन २७) बुरशी ५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रती झाड.

तिसरी ड्रेचिंग (दुसऱ्या ड्रेचिंगनंतर ३० दिवसांनी)
आर्बस्क्युलर मायकोरायझा बुरशी (राइझोफॅगस इररेगुलरिस/ग्लोमस इंट्राडॅलिसिस) २५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो.

किंवा
दुसरी पद्धत
प्रॉपिकोनॅझोल (२५%) २ मिलि अधिक क्लोरपायरीफॉस २ मिलि प्रती लिटर पाणी या प्रमाणे २० दिवसांच्या अंतराने ३ ड्रेचिंग करावे.

किंवा
तिसरी पद्धत
पहिली व तिसरी ड्रेचिंग 
फोसेटील एएल (८० % डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रति १० लिटर द्रावण प्रति झाड.

दुसरी व चौथी ड्रेचिंग
टेब्यूकोनॅझोल (२५.९ % ईसी) ३ मिलि प्रति १० लिटर द्रावण प्रति झाड २० दिवसांच्या अंतराने करावे.

सूत्रकृमी व्यवस्थापन
विश्रांती काळात सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.

 • प्रत्येक ड्रीपर खाली ५ ते १० सें.मी. खोल खड्डा करून त्यामध्ये फ्लूएनसलफोन (२% जीआर) १० ग्रॅम टाकून मातीने झाकून टाकावे. (फ्लूएनसलफोन ची मात्रा जास्तीत जास्त ४० ग्रॅम प्रति झाड इतकी वापरावी) त्यानंतर हलके पाणी द्यावे किंवा
 • फ्लूओपायरम (३४.४८% एससी) २ मिलि प्रति झाड प्रमाणे ड्रेंचिंग करावे. ड्रेंचिंग करण्यापूर्वी झाडांना पुरेसे पाणी द्यावे. प्रत्येक झाडासाठी २ लिटर पाण्यामध्ये २ मिलि फ्लूओपायरम ५०० मिली प्रती ड्रिपर (जर एका झाडाला ४ ड्रिपर असतील) किंवा १००० मिली प्रती ड्रिपर (जर एका झाडाला २ ड्रिपर असतील) मिसळून ड्रेंचिंग करावे.

- (०२१७) २३५४३३०,
दिनकर चौधरी, ९६२३४४४३८०
(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)


इतर ताज्या घडामोडी
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...