डाळिंब बागेतील मृग बहराचे नियोजन

जर फांद्याची घनता जास्त असेल तर हवा खेळती राहण्यासाठी व सूर्य प्रकाश पोहोचण्यासाठी रिफिल आकाराच्या फांद्या शेंड्याकडून १०-१५ सेंमी पर्यंत कट करून हलकी छाटणी करावी. वॉटर शूट काढावेत.
डाळिंबाच्या खोडावरील तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव
डाळिंबाच्या खोडावरील तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव

मृग बहराची अवस्था  पीक नियमन, फुलधारणा आणि फळधारणा बागेची मशागत :  अर्ली मृग बहराचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटी हलकी छाटणी केली असेल. छाटणीमध्ये काटे, वाळलेल्या फांद्या, पेन्सिल आकाराच्या काड्या शेंड्याकडून १०-१५ सेंमीपर्यंत छाटल्या असतील. संजीवकांचा वापर करून पानगळ केली असावी. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पानगळ करून घेतली नसल्यास तातडीने करून घ्यावी. खते देताना बागेत पडलेली पाने आणि अवशेष गोळा करून नष्ट करावेत.

ताण तोडणे इथेफॉनचा वापर करून ताणाच्या तीव्रतेनुसार पानगळ करावी. 

  •  जेथे अवकाळी पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे ताण बसला नसेल, तिथे इथेफॉन (३९% एसएल) दोनदा फवारावे. पहिली फवारणी  ०.९ मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे करावी. पाने पिवळी पडण्यानुसार दुसरी फवारणी ५-८ दिवसांनंतर इथेफॉन (३९% एसएल) १ ते १.५ मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे करावी. प्रत्येक इथेफॉनच्या फवारणीत डीएपी किंवा १२:६१:०० किंवा ००:५२:३४ हे खत ५ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे मिसळावे. 
  • जिथे ताण व्यवस्थित बसून पाने पिवळी पडलेली आहेत, तिथे इथेफॉन (३९% एसएल) १ मि.लि. अधिक डीएपी ५ ग्रॅम प्रति लिटर अशी फवारणी घ्यावी. 
  • अधिक ताणामुळे पूर्ण पानगळ झालेली असल्यास, कृत्रिम पानगळीची गरज नाही.
  • जर फांद्याची घनता जास्त असेल तर हवा खेळती राहण्यासाठी व सूर्य प्रकाश पोहोचण्यासाठी रिफिल आकाराच्या फांद्या शेंड्याकडून १०-१५ सेंमी पर्यंत  कट करून हलकी छाटणी करावी. वॉटर शूट काढावेत. कीड व्यवस्थापन नवीन पालवी फुटण्याची अवस्था

  • रस शोषक किडींसाठी,  फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)
  • पहिली फवारणी :  प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक निम तेल (१%) किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. किंवा करंज बियांचे तेल ३ मि.लि. किंवा वरील दोन्ही एकत्रित प्रत्येकी ३ मि.लि. 
  • दुसरी फवारणी :  सायॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा थायामेथॉक्झाम (२५% डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम.
  • वरील प्रत्येक फवारणीमध्ये स्प्रेडर वा स्टीकर ०.२५ मि.लि.प्रति लिटर मिसळावे.
  •  फुलधारणा, फुलकळी येण्याची अवस्था रस शोषक किडींसाठी, फवारणी प्रति लिटर पाणी  स्पिनेटोरम (१२% एससी) १ किंवा स्पिनोसॅड (४५% एसपी) ०.५ मि.लि. 

    फलधारणा अवस्था

  • रस शोषक कीड व फळ पोखरणारी अळी यासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी 
  • क्लोरॲण्ट्रानिलिप्रोल (१८.५% ईसी) ०.७५ मि.लि. 
  • वरील प्रत्येक फवारणीमध्ये स्प्रेडर स्टीकर ०.२५ मि.लि. प्रति लिटर मिसळावे.
  • रोग व्यवस्थापन

  • पानगळनंतर लगेच ताज्या तयार केलेल्या बोर्डो मिश्रणाची (१%) फवारणी करा.
  • सॅलिसिलिक ॲसिड ०.३ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे चार आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची २ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फुलधारणेपूर्वीपासून एक महिन्याच्या अंतराने फवारण्या करा.
  • बोर्डो मिश्रण (०.५%) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्ल्यूपी) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८%) २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर अधिक स्प्रेडर स्टीकर ०.३ ते ०.५ मि.लि. मिसळून फवारणी करावी. 
  • याव्यतिरिक्त २-ब्रोमो, २-नायट्रोप्रोपेन-१,३ डायोल (९५%) (ब्रोनोपॉल) ०.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे १० दिवसांच्या अंतराने फवारावे.
  • जर बागेत आधीपासूनच तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असेल तर, स्ट्रेप्टोमायसीन*  ०.५ ग्रॅम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा फवारवे. ७-१० दिवसांच्या अंतराने ब्रोनोपाल फवारावे. गरजेपेक्षा अधिक फवारण्या टाळाव्यात. 
  • जर पाऊस झाला असल्यास नंतर लगेच स्ट्रेप्टोमायसीन* अधिक ताम्रयुक्त बुरशीनाशकाची एखादी फवारणी करावी. 
  • बागेमधील बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावानुसार कॉपरजन्य बुरशीनाशके बदलून योग्य बुरशीनाशक वापरावे. डाळिंबामधील बुरशीजन्य स्कॅब, ठिपके, कुजवा इ. साठी उपयुक्त अशी बुरशीनाशके.फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)

  • मॅंडीप्रोपॅमीड (२३.४% एससी) १ मि.लि. 
  • मेटीराम (५५%) अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन (५% ईसी) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम.
  • प्रोपीकोनॅझोल (२५% ईसी) १ मि.लि. प्रति लिटर अधिक ॲझाक्सिस्ट्रॉबीन १ मि.लि.
  • ॲझोक्सिस्ट्रोबीन (२०%) अधिक डायफेनोकोनॅझोल (१२.५% एससी) (संयुक्त बुरशीनाशक) १ ते २ मि.लि.
  • क्लोरोथॅलोनील (५०%) अधिक मेटॅलॅक्झिल एम (३.७५%) २ मि.लि. 
  • बोर्डो मिश्रण (०.५%) 
  • कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५%) अधिक कासुगामायसीन (५%) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.
  • झायनेब (६८%) अधिक हेक्झाकोनाझोल (४% डब्लूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.
  • ट्रायसायक्लॅझोल (१८%) अधिक मॅन्कोझेब (६२% डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.
  • क्लोरोथॅलोनील (७५% डब्ल्यूपी) २ ग्रॅम.
  • टीप

  • वरीलपैकी कोणत्याही बुरशीनाशकाच्या २ ते ३ फवारण्या १०-२४ दिवसांच्या अंतराने केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे पुढील अनेक फवारण्या टाळता येतात. 
  • बोर्डो मिश्रणाव्यतिरिक्त प्रत्येक फवारणीत स्टिकर स्प्रेडर वापरावे. 
  •  एका हंगामात कॉपरजन्य बुरशीनाशकाव्यतिरिक्त कोणतेही बुरशीनाशक दोन पेक्षा जास्त वेळ फवारू नका.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन 

  • २५-३० किलो शेणखत किंवा शेणखत १५-२० किलो अधिक गांडूळ खत २ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो प्रति झाड द्यावे किंवा चांगले कुजलेले कोंबडी खत ७.५ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो प्रति झाड द्यावे.
  • जिप्सम २.५ ते २.८ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ८०० ग्रॅम प्रति झाड मुळ्या असलेल्या ठिकाणी मातीतून द्यावे.
  •  रासायनिक खतांच्या २०-३० दिवसांनंतर जैविक फॉर्म्यूलेशन द्यावे. उदा. ॲझोस्पिरिलम स्पेसिज, ॲस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि पेनिसिलिअम पिनोफायलम. या घटकांची आपल्या शेतात वाढ करण्यासाठी एक टन चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये १ किलो जैविक फॉर्म्यूलेशन मिसळून सावलीत वेगवेगळ्या ठिकाणी बेड तयार करावेत. त्यामध्ये ६०-७०% ओलावा ठेवून दर २ दिवसांनी उलथा-पालथ करत राहावे. साधारणपणे १५ दिवसांत जिवाणूंची वाढ चांगली होते. शेतात टाकण्यापूर्वी यामध्ये अर्बास्कूलर मायकोरायझा बुरशी (ए एम एफ) रायझोफॅगस इरेगुल्यारिस किंवा ग्लोमस इंट्राडॉलिसिस हे जैविक फॉर्म्यूलेशन १ किलो प्रति एकर प्रमाणे मिसळावे. हे तयार मिश्रण १० ते २० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे वापरावे.
  • खते दिल्यानंतर लगेचच हलके पाणी द्यावे.
  • नवीन पालवी आणि फुलकळी येताना नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एनएए) (४.५%) २२.५ मि.लि. प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. चांगली फुलधारणा होते.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण १ ते १.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे करावी.
  • ००:५२:३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट) ८.५ किलो प्रति हेक्टर प्रति वेळ याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने ३ वेळा ड्रीपद्वारे सोडावे.
  • - ०२१७-२३५४३३० - दिनकर चौधरी,  ९४०३३९०६२७ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com