agricultural news in marathi Post-harvest technology for roses | Agrowon

गुलाब फुलांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान

दशरथ पुजारी
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

फूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे. दांड्यांच्या काप बाहेरच्या बाजूला दिशा असलेल्या वरच्या बाजूला घ्यावा. सर्वसाधारणपणे बहुतेक ठिकाणी फुले काढताना कापाच्या खाली पाच पानांचे एक या प्रमाणे दोन पर्णगुच्छ राहतील हे पाहावे.  
 

फूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे. दांड्यांच्या काप बाहेरच्या बाजूला दिशा असलेल्या वरच्या बाजूला घ्यावा. सर्वसाधारणपणे बहुतेक ठिकाणी फुले काढताना कापाच्या खाली पाच पानांचे एक या प्रमाणे दोन पर्णगुच्छ राहतील हे पाहावे. काढल्यानंतर फुलदांड्यांची खालील टोके स्वच्छ पाण्यात राहतील, अशा प्रकारे बादलीमध्ये ठेवावीत.

लागवडीनंतर आलेल्या तळ फुटव्यांची काढणी साधारणतः चार महिन्यानंतर चालू होते. तळ फुटव्यांची काढणी खालून तिसरे ते चौथे पान सोडून केली जाते. त्या खालील डोळे फुटून पाच ते सात आठवड्यांमध्ये काढणीयोग्य फुले येतात. या फुलांची काढणी मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर करावी. तळफुटव्यांतून आलेल्या फुलांच्या काढणीनंतर येणाऱ्या सर्व फुलांची काढणी पुढे नियमितपणे दुसऱ्या पानांजवळ केली जाते.

 • बाजारपेठेच्या मागणी व अंतरानुसार फुलांची काढणी कळी व त्यानंतरच्या अवस्थांमध्ये केली जाते. सामान्यतः कळ्यांचा रंग पूर्ण दिसलेल्या अवस्थेत, मात्र पाकळ्या उमलण्याआधी काढणी केली जाते. काप घेतल्यापासून त्या काडीवर उन्हाळ्यात ३८ ते ४२ दिवसांनी आणि हिवाळ्यात ५५ ते ६० दिवसांनी पुढील फुलाचे उत्पादन मिळते.
 • फूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे. दांड्यांच्या काप बाहेरच्या बाजूला दिशा असलेल्या वरच्या बाजूला घ्यावा. सर्वसाधारणपणे बहुतेक ठिकाणी फुले काढताना कापाच्या खाली पाच पानांचे एक या प्रमाणे दोन पर्णगुच्छ राहतील हे पाहावे. काढल्यानंतर फुलदांड्यांची खालील टोके स्वच्छ पाण्यात राहतील, अशा प्रकारे बादलीमध्ये ठेवावीत.
 • फुले काढल्यानंतर पंधरा मिनिटांत प्रतवारी केंद्रावर (ग्रेडिंग हॉल) न्यावीत. पाण्यात ॲल्युमिनिअम सल्फेट प्रिझर्व्हेटिव्ह मिसळून, तयार द्रावणात ३ तास फुले ठेवावीत. पॅकिंग हॉलचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास ठेवावे. नंतर प्रतवारी करावी. प्रतवारीनंतर फुले पुन्हा याच द्रावणात किंवा क्लोरीनच्या पाण्यात ठेवावीत. बादलीत ७-१० सेंमीपर्यंत द्रावण असावे. या द्रावणात फुले पॅकिंग करेपर्यंत ठेवावीत. जर वरील प्रिझर्व्हेटिव्ह उपलब्ध नसतील तर ३ किलो साखर अधिक ६ ग्रॅम सायट्रिक अॅसिड प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार केले. हे द्रावण बादलीमध्ये ७-१० सेंमीपर्यंत भरावे. त्यात फुले ठेवावीत.

प्रतवारी 

 • गुलाबाच्या फुलांची प्रतवारी फुलदांड्याच्या लांबीनुसार केली जाते. प्रत्येक ग्रेडमध्ये १० सें.मी. अंतर ठेवावे. फुलांची ग्रेड ३० ते ९० सें. मी. ग्रेडमध्ये केली जाते.
 • फुलदांड्याच्या लांबीबरोबरच दांड्याची जाडी, फुलांचा आकार, पाने व रोग व कीटकनाशकांच्या रेसिड्यू यांचाही विचार प्रतवारी करताना केला जातो. प्रतवारी केलेल्या एका ग्रेडमधील सर्व फुले एकाच दर्जाची असावीत. बंचमधील एखाद्या खराब फुलामुळे साऱ्याच फुलांची प्रत कमी धरली जाते. ग्रेडिंगनंतर पुन्हा फुले प्रिझर्व्हेटिव्ह द्रावणात ठेवावीत.

फुलांची प्रतवारी करताना महत्त्वाच्या बाबी 
फुलांची निर्यात करण्यासाठी फुलांची प्रतवारी काटेकोरपणे करावी लागते.

 • गुच्छ बांधताना प्रत्येक फुलकळीचे आकार सारखा असावा.
 • फुल कळ्यांची उंची सारखी असावी.
 • फुलदांड्यांची जाडी व कठीणपणा सारखा असावा.
 • प्रतवारी करताना एकाच लांबीचे फुलदांडे बांधावेत.
 • पॅकिंग खोक्यावर फुलांची जात, फुलांची संख्या, फुलदांडे ची लांबी आणि पॅकिंग केलेले तारीख नमूद करावी.

पॅकिंग 

 • शक्यतो मागणीनुसार फुलांची गड्ड्या बांधाव्यात. सामान्यतः गुलाबामध्ये २० फुलांची एक जुडी बांधली जाते. फुलांच्या बाजूने रॅपिंग पेपर गुंडाळून रबर लावले जाते. असे पेपरमध्ये गुंडाळलेले बंच कोरूगेटेड बॉक्समध्ये भरावेत. १०० × ४० × २० सें.मी.च्या आकाराच्या बॉक्सला आतून पॉलिथिनचे लायनिंग व हवा खेळती राहण्यासाठी छिद्रे असावीत. बॉक्स भरल्यानंतर त्यातील हवा बाहेर खेचून काढली जाते. त्याजागी थंड खेचली जाते. (प्रीकूलिंग). शीतगृहातील तापमान २ अंश सेल्सिअसपर्यंत असावे. बॉक्सचे तापमान शीतगृहाच्या तापमान इतके होण्यास १०-१२ तास लागतात. शीतगृहात ९० टक्क्यांच्या आसपास आर्द्रता ठेवावी. फुलातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
 • निर्यातीसाठी फुले पाठवता दोन अंश सेल्सिअस तापमानाची शीतसाखळी असावी. काढणीपासून पॅकिंग व नंतर विमानतळापर्यंत शीत वाहनामार्फत पोहोचवावीत.

शीतसाखळी 
फुलांचा टिकाऊपणा हा फुलांची झाडावरून काढणी केल्यापासून ग्राहकांच्या हातात पोहोचेपर्यंत ती ताजी व टवटवीत राहिली पाहिजेत. फुले अत्यंत नाजूक आणि नाशवंत असून, संपूर्ण हाताळणी अलगद, सावध आणि हळुवारपणे करावी लागते. तसेच त्याचे तापमान कमी व आर्द्रता ही स्थिर असावी लागते. त्यासाठी शीतसाखळी पुढील प्रमाणे असावी.

 • शेतावर शीतगृह.
 • वाहतुकीसाठी रेफर व्हॅन.
 • विमानतळावरही शीतगृह.
 • विमानात त्वरित माल भरणे.
 • विमानात शीतगृह सुविधा.
 • माल उतरल्यावर तो शीतगृहात ठेवणे.
 • पुन्हा रेफर व्हॅनमधून ग्राहकाकडे पोहोचवणे.

उत्पादनाचे नियोजन 
सर्वसाधारणपणे जातीपरत्वे प्रत्येक झाडास पंचवीस ते तीसपर्यंत चांगल्या प्रतीचे फुलदांडे मिळतात. एक एकर हरितगृहातून प्रति दिवस २००० इतके निर्यातक्षम फुलदांडे मिळू शकतात.

- दशरथ पुजारी, ९८२३१७७८४४, ९८८१०९७८४४
(लेखक तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे येथील खासगी फूल उत्पादक कंपनीत कार्यरत आहेत.)


इतर फूल शेती
गुलाब फुलांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानफूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे....
हरितगृहात गुलाब लागवडीनंतर घ्यावयाची...हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...
गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रणसध्या दुपारचे तापमान वाढत आहे. मात्र रात्री...
पॉलिहाउसमधील गुलाबशेतीत तयार केली ओळखऊसशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्लामपूर (जि....
ॲस्टर लागवडीसाठी वापरा सुधारित वाणॲस्टर हंगामी फुलपीक असून, त्याची लागवड...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
निशिगंध लागवडीचे नियोजनलागवड केल्यापासून निशिगंध पीक २ ते ३ वर्षे त्याच...
ग्लॅडिओलस कंदांची काढणी, साठवणूकयोग्य टप्प्यावर ग्लॅडिओलस कंदांची काढणी करणे...
नियोजन मोगरावर्गीय फुलशेतीचेमोगरावर्गीय फुलझाडामध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली,...
निशिगंध लागवड तंत्रज्ञाननिशिगंध हे एक कंदवर्गीय फूलझाड असून महाराष्ट्रात...
ग्लॅडिओलस पिकातील खत व्यवस्थापनग्लॅडिओलसची चांगल्या प्रतीची फुले आणि कंदांचे...
ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य जातग्लॅडिओलस फुलांना जागतिक आणि देशांतर्गत...
लागवड हेलिकोनियाची...हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते....
..ही आहेत दर्जेदार मोगरा उत्पादनाची...मोगऱ्याच्या झाडाची योग्य पद्धतीने छाटणी करावी....
अशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....
ग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...
क्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...
फुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...
हरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...