agricultural news in marathi Poultry and pig rearing from a commercial point of view | Page 2 ||| Agrowon

व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन वराहपालन

विनोद इंगोले
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021

पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून गावातील मित्र चंद्रशेखर खंडार यांच्यासोबत भागीदारीत पोल्ट्री व वराहपालन व्यवसाय सुरू केले आहेत.

पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून गावातील मित्र चंद्रशेखर खंडार यांच्यासोबत भागीदारीत पोल्ट्री व वराहपालन व्यवसाय सुरू केले आहेत. व्यावसायिक, शास्त्रीय व ‘हायजेनिकक’ घटकांवर आधारित या व्यवसायांमधून बाजारपेठ मिळवून आश्‍वासक उत्पन्नही घेण्यास सुरवात केली आहे.

संत्रा लागवडीमुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी वरुड तालुक्‍याची (जि. अमरावती) ओळख आहे. तालुका ठिकाणापासून १५ किलोमीटरवरील पवनी शिवारातील हवामान व जमीन मोसंबी लागवडीस पोषक आहे. त्यामुळे या पिकाखाली क्षेत्रही मोठे आहे. कपाशी, तूर ही पिके सोबतीला आहेत.

भागीदारीत व्यवसाय
संदीप राऊत नागपूर येथे राहतात. त्यांची पवनी शिवारात २० एकर शेती आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत बहुराष्ट्रीय कंपनीत १८ वर्षे नोकरी केली. कोरोना काळात सर्वच कंपन्यांमधील नोकऱ्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. इतकी वर्षे आपण नोकरी केली. उर्वरित करिअर मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांसाठी रोजगार तयार करून या उद्देशाने नोकरी सोडली. एकट्याने वाटचाल करण्याऐवजी भागीदारीसाठी शोध सुरू केला. गावातीलच चंद्रशेखर खंडार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यादृष्टीने २०१९ मध्ये ‘पोल्ट्री’ सुरु केली.

व्यवसायातील बाबी

 • पुणे येथील प्रसिद्ध कंपनीसोबत ब्रॉयलर पक्षांची कंत्राटी शेती.
 • सहाहजार चौरस फूट आकाराचे शेड. उभारणीवर आठ लाख रुपयांचा खर्च.
 • पक्षी पुरवठा, संगोपनासाठीची औषधे, खाद्य यांचा कंपनीव्दारे पुरवठा.
 • वजनानुसार कंपनीकडून परतावा मिळतो.
 • सहा रुपये प्रति किलोप्रमाणे करार. पक्षाच्या प्रति किलो वजनासाठी सरासरी ६७ रुपये उत्पादन खर्च निश्‍चित. तो ६८ रुपये झाल्यास कमी परतावा तर ६६ रुपये झाल्यास अतिरिक्‍त बोनस.
 • प्रति पाच हजार पक्षांची बॅच. वर्षभरात सुमारे पाच बॅचेस. सुमारे ४५ दिवसांत अडीच किलो वजन मिळते.
 • मरतुकीचे प्रमाण तीन ते चार टक्‍के.
 • हिवाळा, उन्हाळ्यात तापमानानुसार हिटर, फॉगर्स, फॅन पॅड आदी सुविधा.
 • उत्पन्नातील नफा- तोट्याची भागीदारांत समान विभागणी.

वराहपालन क्षेत्रात टाकले पाऊल
पोल्ट्री व्यवसायत जम बसल्यानंतर अजून एक पूरक व्यवसाय करावा असा विचार दोघा भागीदार मित्रांच्या मनात आला. ऑनलाइन मीडिया द्वारे शोध घेतला असता वराहपालन क्षेत्रात संधी असल्याचे लक्षात आले. ‘यूट्यूब’ च्या माध्यमातून व्यवसायातील बारकावे, बाजारपेठ याबाबत माहिती घेतली. बाजारातून २० हजार रुपये प्रति नग याप्रमाणे यॉर्कशायर (व्हाइट) जातीचे २० मादी वराह, नर व पिल्लांची खरेदी अमरावती येथून केली. चारहजार चौरस फूट आकाराचे शेड उभारले.

खाद्य व्यवस्था

 • राऊत सांगतात की कोणतेही टाकाऊ खाद्य न वापरता व्यावसायिक खाद्यच देतो.
 • मका, तांदूळ, गव्हाचा कोंडा, सोया पेंड, मिनरल मिक्‍श्चर यांचा वापर.
 • पीठ स्वरूपात देण्यासाठी २५ हजार रुपयांची छोटी गिरणी.
 • पाच एकरांवर मका लागवड. अधिक गरज भागवण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून १२०० ते १३०० रुपये प्रति क्‍विंटल दराने खरेदी होते. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या वाहतूक व अन्य खर्चही वाचून त्यांचा फायदा होतो.
 • वयानुसार प्रति वराह सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी एक किलो खाद्य. त्याचा दर सरासरी १८ रुपये.
 • प्रक्रिया स्वतःच्या प्लॅंटवर होत असल्याने बाजारातील दराच्या तुलनेत प्रति किलो चार रुपये बचत.

बाजारपेठ व विक्री
वराहांची खरेदी स्थानिक स्तरावर व्यापाऱ्यांकडून होते. शिवाय ई.कॉमर्स’ च्या आधारे संकेतस्थळाचा पर्याय वापरून तेथे व्यवसायाची जाहिरात केली. त्याद्वारे देशभरातील बाजारपेठा उपलब्ध झाल्या. जानेवारी २०२१ मध्ये प्रकल्प सुरु झाला. सुरवातीच्या २० ते २१ मादींपासून १५२ पिल्ले मिळाली. त्यातील ११० जणांची बिलासपूर (छत्तीसगड) येथील व्यापाऱ्याला विक्री केली. सध्या वराहांची संख्या ३५० पर्यंत आहे.

ठळक बाबी

 • ११४ दिवस वेताचा कालावधी. ४५ दिवसांपर्यंत मादी पिल्लांना दूध पाजते. या कालावधीपर्यंत वजन १२ किलोपर्यंत.
 • एक मादी दोन वर्षांत पाचवेळा पिल्ले देते.
 • प्रति मादीपासून जास्तीत जास्त ८ ते १६ पिल्ले मिळतात. बाजारपेठेत मागणीही चांगली.
 • एकूण विचार केल्यास वराहपालन फायद्याचे ठरते असा अनुभव.
 • पिल्लांची विक्री प्रति नग ४००० ते ८००० रुपयांपर्यंत दर. त्यांचे वजन १५ ते २० किलो.
 • शेतकऱ्यांना पैदाशीसाठी प्रति मादी विक्री दर- २० ते २५ हजार रू.
 • आठ महिन्यापर्यंत वराहाचे वजन १०० किलोपर्यंत जाते.
 • व्यवसायातील नफ्याचे प्रमाण ४० ते ५० टक्के.
 • २० वराहांपासून सुरवात करण्यासाठी गुंतवणूक २० लाख रुपये.
 • दोन्ही व्यवसायात ‘हायजेनिक’ व शास्त्रीय दृष्टिकोन.

संपर्क- संदीप राऊत- ८८७९३०८१८२,
चंद्रशेखर खंडार- ९७६६८१६००६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
श्‍वानपालन रुजविले, यशस्वी केलेमातृतीर्थ सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील अतुल...
फळबागेच्या नेटक्या नियोजनातून आर्थिक...कुंडल (जि. सांगली) येथील महादेव आणि नाथाजी हे लाड...
महिला, शिक्षण अन्‌ ग्रामविकासातील ‘...कानडेवाडी (ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापूर) येथे...
ब्रॅंडेड अंजीर, सीताफळाला मिळ लागली...अंजीर व सीताफळ या पुरंदर तालुक्यातील (जि. पुणे)...
कांदासड रोखण्याऱ्या तंत्राची अभियंता...नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कल्याणी शिंदे या...
कोकणात फुलला कॉफीचा मळारत्नागिरी - कोकण म्हटलं की आपल्याल्या चटकन आठवतो...
रेशीम उत्पादकांचे गाव, त्याचे बान्सी...सिंचन सुविधांचा अभाव असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील...
वर्षभर तिहेरी आंतरपीक पद्धती, आले शेती...सातारा जिल्ह्यातील पाल येथील विजय व सतीश या शिंदे...
माळरानावर फळबागांमधून समृद्धीवाट्याला आलेल्या डोंगराळ माळरानाची बांधबंदिस्ती...
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
रेशीम शेतीतील समाधानकिनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथील समाधान भिकन...
शेतकऱ्यांच्या खात्रीची, सोयीची...राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८...
पापड, बेकरी उद्योगात तयार केली ओळखभादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा...
गृहद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...औरंगाबाद शहरातील संपदा अनिल बाळापुरे यांनी...
नागली उत्पादनांचा ‘स्टार बाइट’ ब्रॅण्डनाशिक ः  कोरोना संकटकाळात अनेकांनी संधी...
जागतिक दर्जाच्या शेतीतून वाटा केल्या...निघोज (जि. नगर) येथील आपल्या साठ एकरांत विज्ञान-...
निराधार विधवांना ‘शेक हॅंड’ फाउंडेशनचा...परभणी जिल्ह्यातील मांडळाखळी येथील शरद लोहट...
सालईबनला मिळाली नवी ओळखबुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनने...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत कांदा...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
टेरेसवर द्राक्ष बागेचा फिलकांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या...