agricultural news in marathi Poultry planning | Page 2 ||| Agrowon

कुक्कुटपालनाचे नियोजन

मुकुंद पिंगळे
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

करार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने कोंबड्यांची पिल्ले आणल्यापासून ते बॅच जाण्यापर्यंत प्रामुख्याने पाणी, खाद्य आणि हंगामनिहाय नियोजन महत्त्वाचे असते. मात्र ही साखळी पूर्ण झाल्यानंतर कोंबड्यांचे लिफ्टिंग आणि त्यानंतर नवीन बॅच प्लेसमेंट ही कामे महत्त्वाची असतात

करार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने कोंबड्यांची पिल्ले आणल्यापासून ते बॅच जाण्यापर्यंत प्रामुख्याने पाणी, खाद्य आणि हंगामनिहाय नियोजन महत्त्वाचे असते. मात्र ही साखळी पूर्ण झाल्यानंतर कोंबड्यांचे लिफ्टिंग आणि त्यानंतर नवीन बॅच प्लेसमेंट ही कामे महत्त्वाची असतात

नाव : सतीश पोपट कुळधर
गाव : सायगाव, ता.येवला, जि. नाशिक

करार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने कोंबड्यांची पिल्ले आणल्यापासून ते बॅच जाण्यापर्यंत प्रामुख्याने पाणी, खाद्य आणि हंगामनिहाय नियोजन महत्त्वाचे असते. मात्र ही साखळी पूर्ण झाल्यानंतर कोंबड्यांचे लिफ्टिंग आणि त्यानंतर नवीन बॅच प्लेसमेंट ही कामे महत्त्वाची असतात. त्यामुळे बॅच संपल्यावर शेडची स्वच्छता व निर्जंतुकीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असतो. बॅच सुरू होण्यापूर्वी शेडचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. त्यावरच कोंबड्यांची किमान मरतूक, वाढ व विक्री करताना अपेक्षित वजन मिळते.

  • एकूण ४० ते ४५ दिवसांची बॅच असते. कोंबड्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतर कंपनीशी केलेल्या कराराप्रमाणे वजन करून विक्री होते.  कोंबड्या तीन दिवसांच्या कालावधीत बाजारपेठेत पाठवल्या जातात. अपेक्षित वाढ करून विक्रीच्या नोंदी  ठेवल्या जातात. बॅचमधील कोंबड्या गेल्यानंतर पुन्हा नवीन बॅच सुरू करण्यासाठी नियोजन केले जाते.
  • बॅच गेल्यानंतर शेडमध्ये अंथरलेल्या भात तुसावर पडलेले कुक्कुट खत संकलित करून शेड बाहेर टाकले जाते. कुठलेही खत शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घेतली जाते. परिसरातील शेतकऱ्यांना मागणीनुसार पुरवठा केला जातो. 
  • स्वच्छ व दुर्गंधीमुक्त शेड यावर कोंबड्यांची वाढ व आरोग्यपूर्ण वातावरण अवलंबून असते. त्यामुळे शेडची स्वच्छता ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. त्यानंतर फवारणी यंत्राच्या साहाय्याने पाण्याचे फवारे मारून संपूर्ण शेड धुवून स्वच्छ केली जाते. त्यानंतर फ्युमिगेशन प्रक्रिया करून शेड स्वच्छ केले जाते.
  • रोगप्रतिबंधक उपाययोजना म्हणून शेड स्वच्छ केल्यानंतर पुढील टप्प्यात लगेच निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर बेडवर चुना मारला जातो. त्यानंतर नवीन बॅचसाठी शेड तयार होते.
  • शेड सेमी स्वयंचलित असल्याने खाद्याची भांडी, पाणी भांडी, फिडर शिफारशीनुसार स्वच्छ केले जातात. त्यामुळे नवीन बॅच मधील कोंबड्यांना आरोग्यदायी वातावरण राहाते.
  • स्वच्छता, निर्जंतुकीकरण झाल्यानंतर शेडमध्ये चुना मारलेल्या बेडवर भाताचे तूस पसरविले जाते. त्यानंतर क्षमतेनुसार करार केलेल्या कंपनीकडून पिल्ले मागवून पुढील बॅच सुरू होते.

- सतीश कुळधर,  ९८२२९५७७११


इतर कृषिपूरक
पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणादळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर...
दुधाळ गायींमधील लंगडेपणावर उपायखुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे....
यकृत आजारावर चिरायता, कटुकी, माका उपयोगीजनावरांमध्ये आजारावर उपचार करताना प्रतिजैविकांचा...
कुक्कुटपालनाचे नियोजननाव: सतीश पोपट कुळधर गाव: सायगाव, ता.येवला, जि....
सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची...सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक,...
शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲ...झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास...
दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी...
प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर...पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी...मी जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी जातींच्या...
कोंबडी खत : सेंद्रिय खताचा उत्तम...कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती...
शेळ्यांमध्ये रोग निदानात्मक चाचणी,...रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे  ...
‘बर्ड फ्लू’बाबत जागरूक राहापक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग...
पोल्ट्रीशेडमध्ये जैवसुरक्षा आवश्यकजैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक,...
लेयर कोंबड्यांसाठी संतुलित आहारकोंबड्यांना संतुलित खाद्य नियोजन करावे. शुद्ध आणि...
शेळ्यांमधील पैदास तंत्रशेळीपालन करताना शेळीपालकांना उत्पन्न...
शेळीपालनाचे नियोजनमाझी शिंदेवाडी गावामध्ये अडीच एकर शेती आहे....
जनावरांमधील हिवाळी अतिसारहिवाळी अतिसार हा दुधाळ जनावरांच्या पचन संस्थेचा...
शेवाळ उत्पादन प्रक्रियाशेवाळाचे उत्पादन हे पोषक अन्न, औषधे, जैवइंधनासाठी...
अन्नासह विविध कारणांसाठी शेवाळ शेती शेवाळ म्हणजेच सुक्ष्म आकारापासून विविध आकारामध्ये...