agricultural news in marathi Poultry planning | Page 2 ||| Agrowon

कुक्कुटपालन नियोजन

मुकुंद पिंगळे
शुक्रवार, 19 मार्च 2021

 पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी आणण्यात आली. सध्या ही पिले १० दिवसांची झाली आहेत. वाढीच्या अवस्थेत पूर्वनियोजन व योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले परिणाम मिळतात, असा माझा अनुभव आहे.  

 पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी आणण्यात आली. सध्या ही पिले १० दिवसांची झाली आहेत. वाढीच्या अवस्थेत पूर्वनियोजन व योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले परिणाम मिळतात, असा माझा अनुभव आहे.  

नाव : सतीश पोपट कुळधर
गाव: सायगाव, ता. येवला, जि. नाशिक
कोंबड्यांची संख्या : १२ हजार
शेडचा आकार :  ६०० बाय ३० फूट

मी करार पद्धतीने कुक्कुटपालन करतो. त्यानुसार एक बॅच पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नवीन बॅचची प्लेसमेंट करण्याचे नियोजन असते. त्यापूर्वी शेडची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण या बाबी महत्त्वाच्या असतात. त्यावरच कोंबड्यांची किमान मरतुक, अपेक्षित वाढ आणि वजन अवलंबून असते.  पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी आणण्यात आली. सध्या ही पिले १० दिवसांची झाली आहेत. वाढीच्या अवस्थेत पूर्वनियोजन व योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले परिणाम मिळतात, असा माझा अनुभव आहे.  

पिले आणण्यापूर्वीचे नियोजन 

 • माझ्या इथे प्रत्येक बॅच ही १२ हजार क्षमतेची असते. त्यानुसार नवीन बॅचसाठी करार केलेल्या कंपनीकडे पिल्लांची मागणी नोंदवली होती. 
 • बॅच आणण्यापूर्वी शेडचे पडदे, खेळती हवा यांचा आढावा घेण्यात आला. 
 • पिले येण्‍यापूर्वी शेडमधील चीक फिडर व ड्रिंकर स्वच्छ करण्यात आले. तसेच पिल्लांच्या संख्येनुसार खाद्य आणि पाण्याची भांडी ठेवण्यात आली. 
 • स्वच्छता, निर्जंतुकीकरण करून बेडवर चुना मारून भाताचे तूस पसरवून घेतले. पिल्लांची बैठक तुसाच्या गादीवर असल्याने ते कोरडे राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. गरजेनुसार आवश्‍यक त्या ठिकाणी तूस टाकले जाते. 

ब्रूडिंग नियोजन 

 • पिले आल्यानंतर पहिले २ आठवडे ब्रूडिंग प्रक्रिया महत्त्वाची असते. त्यासाठी ब्रूडर किंवा देशी शेगडीच्या माध्यमातून उष्णता दिली जाते. यामध्ये कोळसा किंवा लाकूड वापरून उष्णता देण्यापूर्वी धूर गेल्यानंतर शेगडी शेडमध्ये ठेवली जाते. 
 • प्लेसमेंट करण्यापूर्वी ब्रूडिंगची जागा अगोदर ६ तास गरम करून ठेवली जाते. उष्णता वाढल्यास पडदे वर करून किंवा शेगडी काढून घेतली जाते. आणि तापमान कमी झाल्यास पुन्हा पडदे बंद केले जातात.

खाद्य व पाणी व्यवस्थापन 

 • पिले आल्यानंतर प्रथम त्यांना गूळपाणी देण्यात आले. 
 • खाद्यासाठी चीक फिडर्सचा तर पाणी देण्यासाठी चीक ड्रिंकरचा वापर केला आहे.
 • खाद्य आणि पाण्याची भांडी योग्य उंचीवर ठेवण्यात आली आहेत. जेणेकरून त्यांचा पिल्लांना योग्य वापर होईल.
 • पिल्लांना स्वच्छ, निर्जंतुक पाणी दिले जाते. पिल्लांना वेळेच्या वेळी खाद्य पुरविले जाते. खाद्य हे कोरड्या ठिकाणी व उंचीवर ठेवतो.
 • सुरवातीला प्रति पिल्लू १३ ग्रॅम प्रमाणे खाद्य दिले जाते. पुढे दर दिवसाला ३ ग्रॅम प्रमाणे त्यात वाढ केली जाते. सध्या प्रति पिलू ३२-३५ ग्रॅम प्रमाणे खाद्य देत आहे.

पुढील २० दिवसांचे नियोजन 

 • पिलांची वाढ होईल त्याप्रमाणे खाद्य आणि पाण्याची भांडी वाढविली जातील.
 • प्रतिजैविक भुकटी ही पाण्यातून दिली जाईल. यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार औषधे देणार आहे.
 • पिलांना सहाव्या दिवशी पहिले लसीकरण केले आहे. लसीकरण हे वेळापत्रकानुसार थंड वातावरणात सायंकाळी केले जाते. 
 • उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे पिल्लांमध्ये ताण येऊन मरतुक येण्याची शक्यता असते. 
 • ताण आल्यामुळे पिले पाणी जास्त पितात आणि खाद्य कमी खातात. त्यामुळे पिलांचे अपेक्षित वजन भरत नाही. तसेच पिलांना धाप लागते. 
 • शेडमधील तापमान कमी करण्यासाठी शेडमध्ये फॉगरचा वापर  करतो. दिवसातून किमान १० मिनिटे फॉगर चालू केला जातो. 
 • शेडमध्ये गारवा येण्यासाठी शेडभोवती झाडे लावली आहेत. 
 • शेडच्या बाजूने गोणपाटाची पोती लावून त्यावर ठिबकच्या साह्याने पाणी सोडले जाईल. जेणेकरून थंड हवा शेडमध्ये येईल.

- सतीष कुळधर, ९८२२९५७७११


इतर कृषिपूरक
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...