agricultural news in marathi Poultry rearing provided financial support | Agrowon

कोंबडीपालनाने दिली आर्थिक साथ...

राजेश कळंबटे
शनिवार, 24 एप्रिल 2021

रत्नागिरी जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि महिला बचत गटांनी गावशिवारात कोंबड्यांची मागणी लक्षात घेऊन पाच वर्षांपूर्वी पूरक व्यवसाय सुरू केला. त्यातून त्यांना आर्थिक विकासाचा मार्ग सापडला आहे. 

पारंपरिक शेतीच्या बरोबरीने आर्थिक मिळकतीसाठी लहान स्तरावर सुधारित जातींच्या कोंबड्यांचे संगोपन फायदेशीर ठरत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि महिला बचत गटांनी गावशिवारात कोंबड्यांची मागणी लक्षात घेऊन पाच वर्षांपूर्वी पूरक व्यवसाय सुरू केला. त्यातून त्यांना आर्थिक विकासाचा मार्ग सापडला आहे. 

राजवाडी (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) येथील राजवैभव विलास राऊत हा तरुण वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षामध्ये आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मागील अडीच वर्षे तो कुक्कुटपालनातून किफायतशीर उत्पन्न मिळवत आहे. ‘पेम’ संस्थेचे अध्यक्ष सतीश कामत यांनी राजवैभवला कुक्कुटपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले. राजवैभव याने नरबे (जि. रत्नागिरी) येथील पोल्ट्रीला भेट देऊन संगोपन, लसीकरण आणि मार्केटिंगबाबत माहिती घेतली. सुरुवातीला त्याने कोंबडीच्या कावेरी व देशी जातीची ३६ पिले खरेदी केली. दोन महिन्यांच्या संगोपनानंतर कोंबड्यांची गावामध्ये विक्री झाली. प्रति कोंबडी ३०० ते ३५० रुपये मिळाले. खर्च वजा जाता ५० टक्के फायदा झाला.

कुक्कुटपालनाचे नियोजन 
कुक्कुटपालनाच्या नियोजनाबाबत राजवैभव राऊत म्हणाला, की स्वतंत्र पोल्ट्री शेड बांधण्यापेक्षा मी जनावरांच्या जुन्या गोठ्याचे रूपांतर पोल्ट्री शेडमध्ये केले. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मी वर्षातून तीन ते चार वेळा कोंबडीची पिले आणतो. शंभर पिलांना पहिल्या महिन्याला ३ हजार रुपये स्टार्टर, दुसऱ्या महिन्यात फिनिशरसाठी ४,५०० रुपये खर्च येतो. अंड्यासाठी सांभाळलेल्या कोंबड्यांना तिसऱ्या महिन्यांपासून पुढे फिनिशर खाद्यासाठी सहा हजार रुपये खर्च आला. गहू भरडून खाद्य म्हणून वापरतो.

संगमेश्‍वरमध्ये २५ रुपये प्रमाणे एक दिवसाची पिले मिळतात. मी स्वतः पिलांना लसीकरण करतो.  बाजारपेठ आणि परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन मी पूर्ण वाढ झालेल्या कोंबड्या विकण्यापेक्षा एक दिवसाचे पिलू आणून ते महिनाभर वाढवतो. त्यानंतर त्याची विक्री करतो. गावातच कुक्कुटपालन करणारे चार जण तयार झाले आहेत. त्यांना मी पिले पुरवितो. यामुळे गावातील लोकांना चांगल्या वाढीची पिले मिळतात आणि मला उत्पन्न मिळते.

गतवर्षी मार्च महिन्यात मी ९०० कोंबडी पिले आणली होती. एक महिना वाढवून त्यातील पाचशे पिले सरासरी ९० रुपये प्रमाणे गावातील पाच जणांना विकली. खर्च वजा जाता तीस टक्के नफा मिळाला. कोरोनामुळे संबंधित व्यावसायिकांना गावातच ग्राहक मिळाले. येत्या काळात मी हॅचरी उभारणार आहे. 

अंडी विक्रीतूनही चांगले उत्पन्न 
कोंबड्यांच्या विक्रीबरोबर अंडी विक्रीतून राजवैभवने उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली. गावठी अंड्यांना चांगली मागणी आहे. यासाठी त्याने जुलै महिन्यात दीडशे कोंबड्या आणल्या. चार महिन्यांनंतर कोंबड्यांनी अंडी देण्यास सुरुवात झाली आहे. सध्या दिवसाला ६५ ते ७० अंडी मिळतात. गावठी अंड्याला ८ ते ९ रुपये दर मिळतो. गावासह रत्नागिरी, पुण्यामध्येही अंडी विक्री होते. 

कोंबडी व्यवसायातील प्रगती 

  • एप्रिल २०१८ : ३०० कोंबड्यांची विक्री, ६० हजारांचे उत्पन्न. ३० टक्के नफा.
  • २०१९ : वर्षभरात १४०० कोंबड्यांची विक्री. सरासरी एक लाख रुपये उत्पन्न. ३० टक्के नफा.
  • २०२०  ः  वर्षभरात १४०० कोंबड्यांची विक्री. तीस टक्के नफा.
  • २०२१  ः १५० कोंबड्यांची विक्री. तसेच अंडी विक्रीतूनही चांगला नफा.

मार्केटिंगचा फंडा
कोकणामध्ये शिमागोत्सव, शेतीच्या हंगामात राखणीचा कार्यक्रमाला फारच महत्त्व असते. या वेळी गावठी कोंबड्यांना प्रचंड मागणी येते. त्याचा फायदा गावातील हे कुक्कुटपालन व्यावसायिक करतात. सणाचा महिना लक्षात घेऊन पोल्ट्रीधारक कोंबड्यांची पिले संगोपनाला घेऊन येतात. त्यामुळे मार्केटसाठी वेगळ्या ठिकाणी जावे लागत नाही. गावातच कोंबड्यांची विक्री होते.

- राजवैभव राऊत   ९६०४०८२२७८


इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...