शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारी

मत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करणे खूप गरजेचे असते. मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारी केल्याने माशांच्या भरघोस उत्पादनाची हमी मिळते.
The pond should be cleaned before releasing the fish seeds.
The pond should be cleaned before releasing the fish seeds.

मत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करणे खूप गरजेचे असते. मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारी केल्याने माशांच्या भरघोस उत्पादनाची हमी मिळते. आधुनिक पद्धतीने मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारी करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मशागतींचा वापर करावा. तलाव कोरडे करणे

  • मत्स्यसंवर्धन तलावांमधील पाणी हे वॉटर ड्रेनेज पाइप किंवा मोटर पंपाच्या साह्याने पूर्णपणे काढून टाकावे. जेणेकरून गढूळ पाणी, घातक द्रव्ये, कीटक, बेडूक, जंगली मासे इत्यादी बाहेर निघून जातील.
  •  तलावाच्या तळाला भेगा पडेपर्यंत तलाव चांगला कोरडा करावा.
  •  तलावाची नांगरणी 

  • मत्स्यसंवर्धन तलावाच्या नांगरणीची आवश्यकता असते.
  •  नांगर जवळपास ३ ते ४ इंच खोल जाईल अशा पद्धतीने नांगरणी करावी.
  •  त्यामुळे मातीचे थर वरखाली होऊन हानिकारक वायू निघून जाण्यास मदत होते. खालच्या थरातील पोषक घटक वरील थरात येतात.
  •  चुना टाकणे  मत्स्यसंवर्धन तलावांतील पाण्याचा सामू ६.५ ते ७.० यादरम्यान असावा. मातीच्या सामुनुसार चुन्याची मात्रेचा वापर

    सामू चुन्याची मात्रा (किलो/हेक्‍टर)
    ४.० ते ४.५ १०००
    ४.६ ते ५.५ ७००
    ५.६ ते ६.५ ५००
    ६.५ ते ७.५ २००

      फायदे 

  • पाण्यातील क्षारता, गढूळपणा नियंत्रणात राहतो. हायड्रोजन सल्फाईड वायूचे प्रमाण कमी होते.
  • ह्यूमिक आणि सल्फ्युरिक आम्लांसारख्या आम्लांचे हानिकारक प्रभाव नष्ट होतात.
  • चुन्यामुळे सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाची गती वाढते. तो जंतुनाशक म्हणून काम करतो. पाण्यातील हानिकारक जिवाणू आणि माश्‍यांवर वाढणारे परजीव नष्ट होतात.
  • माशांची कॅल्शिअमची गरज पूर्ण करण्यासाठी चुना आवश्‍यक असतो.
  • तलावामध्ये पाणी भरणे 

  • पाण्याच्या पाइपच्या तोंडाला लहान आकाराच्या छिद्राची जाळी लावावी. जेणेकरून पाण्यामध्ये मत्स्यबीज भक्षक कीटक, मासे येणार नाहीत.
  • तलाव २ ते २.५ मीटर खोलीचा असेल तर १.२५ ते १.५ मीटरच्या जवळपास पाणी भरावे.
  •  पाणवनस्पतींचे निर्मूलन  पाणवनस्पती मासळीच्या वाढीसाठी आवश्यक घटकांचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करतात. त्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जातो. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी होऊन मासे मरू शकतात. निर्मुलन पद्धती  पारंपरिक

  • वनस्पती हाताने उपटणे.
  • तरंगणाऱ्या वनस्पती जाळ्याने काढणे.
  • तलावाच्या काठावर गुरांना चरण्यासाठी सोडणे.
  • यांत्रिक :  गवत कटरचा वापर.  जैविक

  • यामध्ये पाणवनस्पती खाणारे मासे तलावात सोडले जातात.
  • पानवनस्पती खाणारे मासे ः गवत्या मासा, गोरामी, सिल्वर बार्ब, सिप्रिनस. गवत्या मासा त्याच्या वजनाच्या चारपट गवत खातो.
  •  मत्स्यबीज भक्षक माशांचे निर्मूलन  सुकलेल्या तलावात किंवा तलावात पाणी भरताना जाळीचा वापर केल्यास मत्सबीज भक्षक मासे आढळत नाहीत. निर्मूलन पद्धती 

  •  ४ ते ५ वेळा लहान छिद्राचे जाळे तलावात फिरवून मासे काढावेत.
  • हेक्टरी ३५० किलो ब्लिचिंग पावडर पाण्यामध्ये टाकावी. १५ ते २० मिनिटांत मासे मरतात.हा परिणाम ११ दिवस राहतो. तो कमी करण्यासाठी १२ ते २४ तासांनंतर ३५० किलो युरिया प्रति हेक्‍टर याप्रमाणात पाण्यामध्ये टाकावा.
  •  मोहाच्या तेलाची पेंड २००० ते २५०० किलो प्रति हेक्‍टर वापरावी. परिणाम ३ आठवडे राहतो.
  • खतांचा वापर ( कोणत्याही एका पद्धतींचा)

  • शेंगदाणा पेंड/मोहरीची पेंड ७५० किलो, शेणखत २०० किलो व सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो प्रति हेक्‍टर. पातळ मिश्रण मत्सबीज संचयनाच्या ३ दिवस आधी तयार करावे. तलावात सर्व ठिकाणी पसरावे. त्यामुळे जलद गतीने प्लवंग निर्मिती होते. किंवा
  • मत्सबीज सोडण्याच्या १५ दिवस आधी हेक्टरी १० टन शेणखत तलावामध्ये टाकावे. वनस्पती प्लवंग ४ ते ५ दिवसांत आणि प्राणी प्लवंग ७ ते ८ दिवसांत तयार होतात.
  • वरील दोन्ही पद्धतीत प्रथम खताची ५० टक्के मात्रा द्यावी. पाण्याची योग्य गुणवत्ता राखून व प्लवंग निर्मिती पाहून खताची मात्रा १५ ते २० दिवसांनंतर २५ टक्के व त्यानंतर १५-२० दिवसानंतर २५ टक्के प्रमाणात द्यावी. कीटकांचे निर्मूलन 

  • तलावात विविध पान-किटकांचा संचार असतो. ते मत्स्यजिरे, मत्स्यबीज खातात.
  • किटकांचे निर्मूलन करताना शेततळ्यातील पाणी शांत असावे. वारा, पाऊस नसेल त्यावेळी खालील पद्धतींचा मत्स्यबीज संचयनाच्या किमान २४ तास आधी वापर करावा.
  • मोहरी किंवा खोबरेल तेल ५६ किलो व डिटर्जन्ट पावडर १८ किलो प्रति हेक्टर याप्रमाणात मिश्रण बनवून तलावावर पसरावे.
  • डिझेल ७५ लिटर प्रति हेक्टर
  • रॉकेल १०० लिटर प्रति हेक्‍टर
  • गॅमेग्झन ०.६ ते १.०० पीपीएम
  • पाणी गुणवत्ता तपासणी  मत्स्यबीज सोडण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता मापदंडे  

    बाब श्रेणी
    पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन ४ मिलिग्रॅम/लिटर
    सामू ७.५ ते ८.३
    तापमान २७-३२अंश सेल्सिअस
    फॉस्फरस ०.२ ते ०.३ मिलिग्रॅम/लिटर
    नायट्रोजन ०.५ ते १.० मिलिग्रॅम/लिटर
    पारदर्शकता २५-३० सेंमी

      ( टीप :  वर नमुद मशागतीपैकी पानवनस्पती व मत्स्यबीज भक्षक मासे यांच्या निर्मूलनाची आवश्‍यकता असेल तरच वापर करावा. सर्व मशागती आवश्‍यक असून तज्ञ्जांचे मार्गदर्शन घ्यावे. - अभिनव वायचळकर, ९९२३३३९३१७ (सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, धारणी जि. अमरावती) सय्यद हामजा, ८०८७८४६६०४ (सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, नंदुरबार)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com