agricultural news in marathi The problem of the flower becoming ‌purple-pink‌ | Agrowon

फ्लॉवर ‌जांभळा-गुलाबी‌ होण्याची समस्या

डॉ.‌ ‌विनायक‌ ‌शिंदे-पाटील‌,‌ पूजा सूर्यवंशी
शुक्रवार, 5 मार्च 2021

‌वातावरणातील‌ ‌कमाल व किमान तापमानात वाढ होते. या काळात ‌सकाळच्या‌ ‌वेळी‌ ‌वाढलेल्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश‌ ‌फ्लॉवरच्या‌ ‌गड्ड्यावर पडल्यामुळे ‌पांढऱ्या ‌रंगाच्या‌ ‌गड्ड्यामध्ये ‌गुलाबी‌ ‌रंगाची‌ ‌छटा‌ ‌विकसित‌ ‌होते.‌ ‌

आनुवांशिकदृष्ट्या‌,‌ फ्लॉवर ‌पांढऱ्या,‌ ‌जांभळ्या‌,‌ ‌लाल‌,‌ ‌‌हिरव्या‌ ‌किंवा‌ ‌निळ्या‌ ‌रंगाचे‌ ‌असतात‌.‌  फ्लॉवर ‌ही‌ ‌एक‌ ‌थंड‌ ‌हवामानातील ‌भाजी‌ ‌आहे.‌ ‌वातावरणातील‌ ‌कमाल व किमान तापमानात वाढ होते. या काळात ‌सकाळच्या‌ ‌वेळी‌ ‌वाढलेल्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश‌ ‌फ्लॉवरच्या‌ ‌गड्ड्यावर पडल्यामुळे ‌पांढऱ्या ‌रंगाच्या‌ ‌गड्ड्यामध्ये ‌गुलाबी‌ ‌रंगाची‌ ‌छटा‌ ‌विकसित‌ ‌होते.‌ ‌फ्लॉवरतील‌ ‌जांभळा-गुलाबी‌ ‌रंग‌ ‌हा‌ ॲन्थोसायनिन ‌या‌ ‌अपायकारक‌ ‌रंगद्रव्यामुळे‌ ‌निर्माण‌ ‌होत‌ ‌असतो.‌ ‌ ‌

उपाययोजना‌ 
वातावरणातील‌ ‌थंडी‌ ‌कमी‌ ‌होण्याअगोदर‌,‌ ‌उष्णता- उन्हे‌ ‌वाढण्याअगोदर‌ ‌फ्लॉवरची‌ ‌काढणी‌ ‌होईल.‌ ‌याप्रमाणे‌ ‌लागवडीचे‌ ‌नियोजन‌ ‌करावे.‌ ‌लागवडीकरिता‌ ‌अधिक‌ ‌उष्ण‌ ‌वातावरण‌ ‌सहन‌ ‌करणाऱ्या‌ ‌जातींची‌ ‌निवड‌ ‌करावी.‌ ‌ फ्लॉवरमध्ये‌ ‌ब्लांचिंग‌ ‌करावी.‌

फ्लॉवर ‌काढणी‌चा आदर्श‌ ‌काळ

  • फ्लॉवरच्या‌ ‌काढणीचा ‌आदर्श‌ कालावधी हा ‌हंगामाप्रमाणे ‌जातींवरही‌ ‌अवलंबून‌ ‌असतो.‌ ‌
  • हळव्या‌ ‌जाती‌ ‌(अर्ली)‌‌ - पुनर्लागवडीनंतर‌ ‌‌६०‌ ते ७०‌‌ ‌दिवस‌ ‌
  • निमगरव्या‌ ‌जाती‌ ‌(मीडियम)‌‌ - पुनर्लागवडीनंतर‌ ‌‌९० ते ‌१००‌‌ ‌दिवस‌ ‌
  • गरव्या‌ ‌जाती‌ ‌(लेट)‌‌ -‌ ‌‌‌पुनर्लागवडीनंतर ‌‌११० ते ‌१२०‌‌ ‌दिवस‌ ‌

ब्लांचिंग‌ ‌म्हणजे‌ ‌काय‌?‌ ‌

  • सूर्यप्रकाशाचा-उष्णतेचा‌ ‌फ्लॉवरच्या‌ ‌गुणवत्तेवर‌ ‌व पांढऱ्या रंगावर विपरीत परिणाम‌ ‌होऊ नये. यासाठी ‌फ्लॉवरचा‌ ‌गड्डा‌ ‌
  • पिकाच्या‌ ‌विकसित‌ ‌पानांच्या‌ ‌साह्याने ‌झाकून‌ ‌घ्यावा.‌ ‌पाने‌ ‌बंद‌ ‌ठेवण्यासाठी‌ ‌रबर‌ ‌बँड, दोऱ्या, ‌सुतळी ‌किंवा‌ ‌चिमट्याचा‌ ‌वापर‌ ‌करावा.‌ ‌

ब्लांचिंग केव्हा करावे?

  • फ्लॉवरचा गड्डा ७०-८५ टक्के विकसित झाल्यानंतर.
  • रोपांच्या पुनर्लागवडीनंतर सुमारे ३०-५०-७० (जातीनिहाय) दिवसांनी. 

- डॉ.‌ ‌विनायक‌ ‌शिंदे-पाटील‌,‌ ७०७१७७७७६७‌ ‌
(‌‌दादासाहेब‌ ‌पाटील‌ ‌कृषी‌ ‌महाविद्यालय‌,‌ ‌‌दहेगाव‌,‌ ‌‌ता.‌ ‌वैजापूर‌,‌ ‌‌जि.‌ औरंगाबाद‌)

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...