कृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापनाची कार्यपद्धती

कृषी निविष्ठा परवाना प्रक्रिया उपक्रमांतर्गत सहभागी होण्यासाठी पात्र असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व इतर संस्था यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून कृषी निविष्ठा परवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक माहिती महामंडळामार्फत देण्यात येईल.
The farmer producer company has a special scheme to sell agricultural inputs.
The farmer producer company has a special scheme to sell agricultural inputs.

कृषी निविष्ठा परवाना प्रक्रिया उपक्रमांतर्गत सहभागी होण्यासाठी पात्र असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट  व इतर संस्था यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून कृषी निविष्ठा परवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक माहिती महामंडळामार्फत देण्यात येईल.  महामंडळामार्फत राज्यातील विविध कार्यकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांच्यासाठी “माती परीक्षणाच्या आधारे कृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापन” उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. महामंडळामार्फत सदर संस्थांचे सभासद असलेल्या शेतकरी यांचे मार्फत उत्पादित शेतीमालाचे विक्री व्यवस्थापन करण्यासाठी थेट शेतीमाल विक्री व्यवस्थापन उपक्रम, कॉपशॉप, इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. कृषी निविष्ठा परवाना प्रक्रिया उपक्रमांतर्गत सहभागी होण्यासाठी पात्र असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट  व इतर संस्था यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून कृषी निविष्ठा परवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक माहिती महामंडळामार्फत देण्यात येईल.  तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (मूळ नस्ती २ प्रती)

  •  खालीलपैकी सर्व कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज यांची झेरॉक्स काढून दोन प्रतींमध्ये तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावी.
  • विक्रेत्यांचा विहित नमुन्यातील अर्ज (आवक क्रमांकासह झेरॉक्स प्रत)
  • ऑनलाइन भरलेला लायसन्स अर्ज फोटोसहित
  • मूळ चलन खते,कीडनाशके, बियाणे परवान्यासाठी आवश्यक
  • ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र/स्वयं घोषणापत्र (ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका)
  • जागेचा उतारा (भाडेकरार)
  • जागा मालकीचा पुरावा (लाइट बिल/इंडेक्स -२ इत्यादी)
  • जागा मालकीचे संमतिपत्र
  • विक्रेत्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स प्रत
  •  नवीन परवान्यासाठी शैक्षणिक अर्हता ः
  •  खते विक्री- बी.एस.सी (कृषी)/ बी.एस.सी केमिस्ट्री) / कृषी डिप्लोमा
  • कीडनाशक विक्री - बी.एस.सी (कृषी)/ बी.एस.सी. केमिस्ट्री) 
  • शेतकरी उत्पादक कंपनी - नोंदणी प्रमाणपत्र, MoA, AoA 
  • रुपये १०० स्टॅम्पपेपरवर गुणवत्ता हमीबाबत प्रमाणपत्र
  • जागेचा नकाशा
  • उगम प्रमाणपत्र (दोन स्वतंत्र संचामध्ये) / प्रिन्सिपल सर्टिफिकेट (“O” Form)
  • नवीन प्रस्तावास तालुका कृषी अधिकारी यांचा जागा पाहणी अहवाल
  • रुपये १०० स्टॅम्पपेपरवर खते नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड २४ नुसार विहित नमुन्यातील जबाबदार व्यक्तीबाबतचे नेमणुकीच्या आदेशाच्या प्रतीसह.तालुका कृषी अधिकारी यांच्या शिफारशीसह अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. 
  • ​महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत खते/ कीडनाशके / बियाणे  विक्रीसाठी O form फक्त शेतकरी  उत्पादक कंपनी व विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनाच देण्यात येईल. प्राप्त  संस्थांच्या  यादी मधील शासकीय  नियमानुसार कृषी  निविष्ठा  विक्री  करण्यात  आवश्यक Mobile Fertilizer Managment System(MFMS) ID, Point of sale (POS) Machine, GST No  व इतर  कागद पत्रांची   पडताळणी  महामंडळाचे  विभागीय  व्यवस्थापकांच्या मार्फत करण्यात येईल. 

    कृषी निविष्ठा मागणी नोंदणी प्रक्रिया 

  • महामंडळाकडे  राज्यातील नोंदणीकृत  विविध कार्यकारी  सहकारी संस्था, शेतकरी  उत्पादन कंपनी ,शेतकरी  गट / इतर संस्था, खरेदी विक्री  संघ कृषी  निविष्ठाची  मागणी  नोंदवू  शकतात.
  • संस्थांनी  व्यवस्थापकांच्यामार्फत  कृषी  निविष्ठा  पुरवठ्याची  मागणी  नोंदवावी. संस्थांनी त्यांच्या सभासदांची मागणी एकत्रितकरून, त्यानुसार  महामंडळाकडे  लेखी स्वरूपात / इ. मेल द्वारे  विभागीय व्यवस्थापकांच्यामार्फत  कृषी निविष्ठा  पुरवठ्याची  मागणी  नोंदवावी. 
  • संस्थांच्या  मागणीनुसार  उपलब्धता  निश्चित  झाल्यानंतर  प्रत्यक्ष  पुरवठा  करण्यासाठी  संबंधित  संस्थांनी  देयकाची  पूर्ण  रक्कम  DD ,NEFT,  & RTGS  यांचे  मार्फत  देयकाची  रक्कम  महामंडळाच्या  खात्यामध्ये  वर्ग  झाल्यानंतर संबंधित संस्थांना कृषी निविष्ठा पुरवठा करण्यात येईल. 
  • कृषी निविष्ठाचे वितरण 

  • शासकीय नियमानुसार मागणी नोंदवून संबंधित संस्थांनी कृषी निविष्ठा गावस्तरावर प्राप्त करून घ्याव्यात. निविष्ठाचे वितरण करावे.
  • राज्यातील सर्व सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांच्यापर्यंत व राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माती परीक्षणानुसार वेळेत व वाजवी दरात खताची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने महामंडळाची कृषी निविष्ठा पुरवठा योजना अत्यंत उपयुक्त असल्याने सर्व संस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्यामार्फत करण्यात येत आहे.
  • - विकास खाडे,  ९८३४३२३९४९ (विभागीय व्यवस्थापक, कृषी निविष्ठा विभाग, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या, शिवाजीनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com