agricultural news in marathi Processed foods from lemon | Page 2 ||| Agrowon

लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

चंद्रकला सोनवणे
शनिवार, 21 ऑगस्ट 2021

लिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. पण चवीला कडू असल्यामुळे साल जास्त खाल्ली जात नाही. त्यासाठी लिंबाच्या सालीपासून जॅम, मार्मलेड आणि कॅण्डीसारखे विविध पदार्थ बनवून त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

लिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. पण चवीला कडू असल्यामुळे साल जास्त खाल्ली जात नाही. त्यासाठी लिंबाच्या सालीपासून जॅम, मार्मलेड आणि कॅण्डीसारखे विविध पदार्थ बनवून त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

आपल्‍या सर्वांना परिचित असलेल्या लिंबामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. लिंबाप्रमाणेच लिंबाच्या सालीही अत्यंत फायदेशीर असते. सामान्यतः निरुपयोगी म्हणून लिंबाची साल फेकून दिली जाते. लिंबाच्या सालीमध्ये जीवनसत्त्व, पोटॅशिअम, कॅल्शिअम, तंतुमय पदार्थ यांसारखे अनेक पोषक घटक असतात. शास्त्रीयदृष्ट्या लिंबाच्या रसापेक्षा साल अधिक उपयुक्त असते.

लिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. पण चवीला कडू असल्यामुळे साल जास्त खाल्ली जात नाही. त्यासाठी लिंबाच्या सालीपासून जॅम, मार्मलेड आणि कॅण्डीसारखे विविध पदार्थ बनवून त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

सालीमधील आरोग्यदायी गुणधर्म 

  • सालीमध्ये कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व ‘क’ भरपूर प्रमाणात असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
  • लिंबाची साल त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.
  • रोगप्रतिकार शक्ती तसेच त्वचेच्या कर्करोगावर गुणकारी मानले जाते.
  • ह्रदयाच्या आजारांवर फायदेशीर.
  • सालीमधील खनिजे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. रक्ताभिसरण चांगले राहते.
  • काही लोकांच्या तोंडातून दुर्गंधीयुक्त वास येतो. त्यांच्यासाठी लिंबाची साल फायदेशीर ठरते.
  • मधुमेह, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत.

जॅम 
जॅम बनविण्यासाठी पूर्ण परिपक्व झालेली पिवळ्या रंगाची लिंबे निवडावेत. निवडलेली लिंबे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर चाकूच्या साह्याने कापून त्यातील बिया वेगळ्या कराव्यात. कापलेल्या फोडी मिक्सरमधून बारीक करून त्याचा लगदा तयार करावा. लगद्याच्या प्रमाणापेक्षा दुप्पट साखर घालून मंद आचेवर शिजण्यास ठेवावे. मिश्रणामध्ये वेलची पूड टाकून व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की गॅस बंद करून घ्यावा. तयार जॅम निर्जंतुक बाटलीमध्ये भरून ठेवावा.

मार्मलेड 
प्रथम लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. नंतर सुरीच्या साह्याने सालीचे काप करून बिया वेगळ्या कराव्यात. या फोडी ज्यूसरमध्ये टाकून ज्यूस तयार करून घ्यावा. नंतर लिंबाच्या सालीचे बारीक लांब काप करावेत. एका पातेल्यामध्ये साखर, पाणी, लिंबू रस आणि सालीचे काप एकत्रित करून घ्यावे. हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. मार्मलेड व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवून द्यावे.

कॅण्डी 
कॅण्डी तयार करण्यासाठी परिपक्व लिंबू निवडावेत. लिंबे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. सुरीच्या साह्याने लिंबाचे काप करावेत. बिया आणि रस वेगळा करून घ्यावा. नंतर साली मिक्सरमध्ये घालून त्याचा लगदा तयार करावा. लगद्यामध्ये साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यावे. मिश्रणामध्ये आवडीनुसार साखर, मीठ, काळे मीठ, जिरे पावडर आणि काळी मिरी टाकून व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण चांगले घट्ट झाल्यानंतर उष्णता देणे बंद करावे. घट्ट झालेले मिश्रण थंड होण्यास ठेवून द्यावे. घट्ट मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या करून पीठी साखरेमध्ये घोळवून घ्याव्यात. तयार कॅण्डी हवाबंद बरणीमध्ये भरून पॅक करावी.

- चंद्रकला सोनावणे, ७९७२९९९४६४
(के.एस.के. काकू अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

 


इतर कृषी प्रक्रिया
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....
टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरीटोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच...
आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइलव्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ...
अंड्यापासून जॅम, पनीर निर्मितीसर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ...
बहुगुणी राळाराळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या...
लसणापासून लोणचे, जेली, चटणीलसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग...
लिंबू प्रक्रियेतील संधी लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता...
अळिंबी स्पॉन निर्मिती तंत्रज्ञानअळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
खरबुजापासून पावडर, सरबतखरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात...
आरोग्यवर्धक लसूण लसणाचा उपयोग स्वयंपाकात अन्न स्वादिष्ट होण्यासाठी...
अळिंबीची मूल्यवर्धित उत्पादनेपारंपरिक पदार्थांमध्ये वाळलेल्या आणि पावडर धिंगरी...
शास्त्रोक्त पद्धतीने हळद बियाण्याची...निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी...
चिंचेपासून प्रक्रिया केलेले पदार्थचिंच चवीला आंबट, तुरट व थोडीशी गोडसर असते. विविध...
आरोग्यदायी किवी फळकिवी  हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड...
बेलफळाच्या प्रक्रिया उद्योगाला संधीबेलापासून जेली, जॅम, सरबत निर्मिती करता येते. या...