agricultural news in marathi Proper use of antibiotics is important ... | Agrowon

प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...

डॉ. आकाश राऊत, डॉ. प्रतीक जाधव, डॉ. काकासाहेब खोसे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन ते स्वतःमध्ये बदल करतात. त्यांची नवीन पिढी प्रतिजैविकांना दाद देत नाहीत, यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये ‘प्रतिजैविकांचा प्रतिरोध’ म्हणतात. हे टाळण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
 

प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन ते स्वतःमध्ये बदल करतात. त्यांची नवीन पिढी प्रतिजैविकांना दाद देत नाहीत, यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये ‘प्रतिजैविकांचा प्रतिरोध’ म्हणतात. हे टाळण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

जिवाणू, बुरशी आणि प्रोटोझोआसारख्या सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. प्रतिजैविकांचा शोध ही एक जागतिक क्रांती आहे. सर्वांत प्रथम पेनिसिलीन प्रतिजैविकाचा शोध लुईस पाश्‍चर या शास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या आजारांवर उपचार करणे सोयीचे झाले. मनुष्य आणि प्राण्यांमध्ये होणाऱ्या आजारांवर उपचार करणे शक्य झाले.

अलीकडच्या काळात प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापर वाढला आहे. त्यामुळे प्रतिजैविकांच्या विरोधात सूक्ष्मजंतूंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली तसेच प्रतिजैविकांची परिणामकारकता ढासळली. प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे जंतूंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन ते स्वतःमध्ये बदल करतात. त्यांची पुढील पिढी प्रतिजैविकांना दाद देत नाहीत, यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये ‘प्रतिजैविकांचा प्रतिरोध’ (अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स) असे म्हणतात.

हे टाळण्यासाठी प्रतिजैविके वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार, प्रतिजैविकांच्या अयोग्य वापरावर वेळेवर निर्बंध न घातल्यास पुढील काळात जिवाणूंच्या संसर्गाने रोग्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिजैविके तज्ज्ञांच्या सल्लानेच घ्यावीत.

प्रतिजैविके वापराच्या अयोग्य पद्धती 
मानवामध्ये वापर 

 • साधा ताप किंवा थोड्या फार अंगदुखीमध्ये गरज नसताना प्रतिजैविक घेणे.
 • डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या प्रतिजैविकांचा संपूर्ण कालावधी पूर्ण न करणे.
 • एक-दोन दिवसांत बरे वाटल्यानंतर प्रतिजैविक न घेणे.
 • सांगितलेली पूर्ण प्रतिजैविके न घेणे. औषधांची अर्धीच मात्रा घेणे.
 • फरक पडत नाही म्हणून वारंवार डॉक्टर बदलणे.
 • घरातील उरलेल्या औषधांचा इतर व्यक्तींसाठी वापर करणे.
 • आपण घेत असलेल्या प्रतिजैविकांची नोंद न ठेवणे.

जनावरांमध्ये वापर 

 • पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गरज नसताना प्रतिजैविक वापरणे.
 • एका दिवसात फरक पडला नाही म्हणून तज्ज्ञ बदलणे किंवा औषध बदलणे.
 • चुकीच्या पद्धतीने औषध टोचणे.
 • कमी क्षमता किंवा बनावट कंपनीचे औषध वापरणे.
 • एका दिवसात फरक पडला म्हणून औषध न देणे, तज्ज्ञांना न बोलवणे.
 • जनावरांना दिलेल्या औषधांच्या नोंदी न ठेवणे. त्याबाबत तज्ज्ञांना कोणतीही कल्पना न देणे.

उपाययोजना

 • प्रतिजैविकांचा वापर कमी करण्यासाठी जंतुसंसर्ग रोखण्याचे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.
 • योग्य स्वच्छता, नियमित आरोग्य देखरेख आणि लसीकरण यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे गरजेचे आहे.
 • डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची मात्रा पूर्ण करणे. तसेच सांगितलेल्या मात्रेमध्ये औषध घेणे.
 • वापरात असणाऱ्या प्रतिजैविकांची नोंद ठेवणे. यामुळे त्यांचा वारंवार होणारा वापर टाळला जाईल.
 • पशुवैद्यकाकडून दिलेल्या औषधांची माहिती घेणे. औषधांची योग्य मात्रा, दिवसातून किती वेळा आणि किती दिवसांसाठी घेणे याबाबत विचारणा करावी.
 • नवीन डॉक्टरांचा सल्ला घेताना आपण घेत असलेल्या प्रतिजैविकांबद्दल त्यांना माहिती द्यावी.
 • विथड्रॉवल पीरियड पाळणे. सामान्यपणे प्रत्येक प्रतिजैविकांच्या बाटल्यांवर विथड्रॉवल पीरियड लिहिलेला असतो.
 • सर्वसाधारणपणे प्रतिजैविके किमान ३ ते ५ दिवसांसाठी घेतली जातात.
 • जनावरांमध्ये प्रतिजैविके एकदा दिल्यावर ३ दिवसांसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे.
 • प्रतिजैविकांचा वापर गरजेवेळीच आवश्‍यकतेनुसार करावा.
 • विथड्रॉवल परियड म्हणजेच जनावरांच्या उपचाराच्या काळात त्यापासून मिळणारे दूध, अंडी व मांस आदी उत्पादनांचा वापर करणे टाळावा.

संपर्क : डॉ. आकाश राऊत, ९८२२९६२२५०
डॉ. प्रतीक जाधव, ९८९०९९७७९५
(पीएच. डी. स्कॉलर, पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्‍वविद्यालय एवं गो-संशोधन संस्था (दुवासु), मथुरा. डॉ. खोसे हे परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत.)


इतर कृषिपूरक
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्याकासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब...
कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्तगाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत...
कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्रकोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती...
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...
आसडीवर वनस्पतिजन्य तेल फायदेशीर...जनावरांना होणाऱ्या जखमेवर तत्काळ उपचार नाही केले...
वेळेवर उपचार करा, कासदाह टाळाकासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सह्याने...
त्वचाविकारावर कडुलिंब, करंज उपयुक्तसंक्रमित त्वचा विकाराच्या आजारांमुळे हे...
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...
जनावरांतील गर्भाशयाचा दाहगर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी...
प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे...
जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त...उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे...
मत्स्यशेतीतील फसवणुकीचे नवनवीन फंडेसुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने नव्या...
मत्स्यपालन व्यवसायाची महत्त्वाची सूत्रेमत्स्य संवर्धन करताना मातीची पोत, पाणी धरून...
खूर समस्येवर योग्य पोषण हाच उपायआवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल...
जनावरांमधील पोटफुगीवर जिरे, हळद, बडीशेप...पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते....
मत्स्यबीजांमधील फसवणूक जाणून नुकसान टाळाशेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध...