agricultural news in marathi, prospects of production and export of maize, Agrowon, Maharashtra | Agrowon

मका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधी
डॉ. मधुकर बेडीस
रविवार, 22 एप्रिल 2018

मका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व होणाऱ्या जातींची लागवड व सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, आधारभूत किमतीने शासकीय खरेदी, मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन व त्यानुसार लागवड नियोजनाची गरज आहे. निर्यातीसाठी जागतिक नियमांची अंमलबजावणी आणि प्रचाराची आवश्‍यकता आहे.

मका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व होणाऱ्या जातींची लागवड व सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, आधारभूत किमतीने शासकीय खरेदी, मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन व त्यानुसार लागवड नियोजनाची गरज आहे. निर्यातीसाठी जागतिक नियमांची अंमलबजावणी आणि प्रचाराची आवश्‍यकता आहे.

मका पिकाचे मूळ स्थान मेक्सिको आहे. काही प्रजाती मध्य अमेरिकेत आढळून आल्या, त्यामुळे मक्‍याचे मूळ स्थान मेझोअमेरीकन असे ओळखले जाते. अँड्रूज शास्त्रज्ञाच्या मते मका पिकाचा शोध सन १४९२ मध्ये लागला. भारतात मक्‍याचा शोध १२ व १३ व्या ख्रिस्तपूर्व शतकात लागला आहे. पिकाचे शास्त्रीय नाव झी मेज अाहे. मक्याच्या ट्रायलोबेहेन, पॉलीटोका, ट्रीप्सॅकम, टीओसींट, झी पेरेनीस आदी जंगली जाती आहेत.

भारतापेक्षा इतर देशांच्या अधिक उत्पादकतेची कारणे

 • एकेरी संकरीत व अधिक कालावधीच्या जातींची लागवड.
 • थंड हवामान
 • १०० टक्के क्षेत्र बागायती लागवडीखाली.
 • लागवडीसाठी सर्वाधिक आर्थिक गुंतवणूक
 • सामू ७.५ ते ८.५ दरम्यान असणाऱ्या तसेच निचऱ्याच्या व सुपीक जमिनीत लागवड.
 • शासकीय खरेदी धाेरण उत्पादकांना अनुकूल. शासन शेतकऱ्यांकडून हमी दराने मका खरेदी करते. औद्योगिक उत्पादनात त्याचा पुरेपूर वापर केला जातो. परिणामी उत्पादक कायम आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहताे.
 • अमेरिका, ब्राझील या देशांत मक्‍यापासून ३५०० प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात. मूल्यवर्धित पदार्थांच्या गरजेनुसार मका उत्पादन घेतले जाते. अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यास शासकीय योजनांमधून प्रोत्साहन दिले जाते. मक्यापासून मूल्यवर्धित उत्पादनांच्या उद्योगासाठी आर्थिक सहाय्य व साधने उपलब्ध करून दिली जातात.
 • यांत्रिकी पद्धतीने मका शेतीस लागणारी यंत्रसामग्री, मनुष्यबळ पुरविले जाते.
 • प्रगत तंत्रज्ञान वापराबाबत प्रोत्साहन, उदा. बीटी मका, माती परीक्षणानुसार खतव्यवस्थापन  
 • समूह शेतीला चालना.
 • सुलभ पद्धतीने कर्ज वितरण प्रणाली.

भारताची अधिक उत्पादन क्षमता असलेल्या देशांबरोबर तुलना
उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा ७ वा क्रमांक. भारताची सरासरी उत्पादकता इतर देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. (२.४१ टन/ हेक्‍टरी). याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात मका हा कोरडवाहू तसेच खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो.

भारतात मका उत्पादनवाढीसाठी आवश्‍यक उपाययोजना

 • एकेरी संकरीत व उशिरा पक्व होणाऱ्या जातींची लागवड गरजेची.
 • बागायती क्षेत्रावर मका लागवड वाढविण्याची गरज.
 • माती परीक्षणानुसार खताची मात्रा देणे आवश्यक.
 • मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता.
 • शेतकऱ्यांना हमीभाव तसेच आधारभूत किंमत देऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी करणे.
 • मुक्त व्यापार पद्धतीला प्रोत्साहनाची गरज
 • औद्योगिकदृष्ट्या मक्‍याची मागणी वाढविणे.
 • शासनाने शेतकऱ्याकडून करार पद्धतीने मका घेतल्यास शेतकरी बागायती मका लागवडीकडे वळू शकतो.
 • बागायती क्षेत्र वाढविण्याकरिता नद्याजोड प्रकल्प किंवा जलयुक्त शिवारसारख्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविणे.

भारतातील ‘स्टेक होल्डर्स’
भारतात सहकारी तत्त्वावर चालणारे अनेक शेतकरी संघ कार्यरत आहेत. उदा. शेतकरी संघ. कोल्हापूर, पुणे, सोलापूर. त्याचबरोबर कृषी पणन उद्योग, पीक संघ, एनआरसी, अपेडा, केंद्र व राज्य सरकार मका उद्योगात कार्यरत आहे. याशिवाय मका खरेदी करणाऱ्या अनेक खासगी कंपन्याही अाहेत.

जगभरातील प्रचलित जाती

 • अमेरिकेत उच्च उत्पादनक्षम अशा सीएमएल १८२, १८३ या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या जाती एकेरी संकरीत असून उत्पादनक्षमता १० टन प्रति हेक्टरी इतकी आहे.
 • प्रथिनयुक्त असल्याने मानवी आहारात वापरला जातो. स्टार्चचे प्रमाण भरपूर असल्याने उद्योगातही मागणी असते. याशिवाय बी.टी. मका १,२,३ या जातींचीही लागवड होते. या जाती खोडकिडीस प्रतिकारक असून इतर गुणधर्म सीएमएल जातींप्रमाणेच असतात.
 • भारतामध्ये अखिल भारतीय समन्वयित मका संशोधन प्रकल्प दिल्ली यांनी विविध संस्थांच्या सहकार्याने मका पिकाच्या २५० संकरीत जाती प्रसारीत केल्या आहेत. त्यामध्ये एचक्यूपीएम १ ते ७ , रणजित, आफ्रिकन टॉल , राजर्षी, एच.एम.-४, एच.एम.-५, एच.एस.सी-१, जवाहर पॉपकॉर्न, अंबर पॉपकॉर्न, माधुरी प्रिमा अशा अधिक उत्पादनक्षम एकेरी संकरीत जातींचा समावेश होतो.
 • महाराष्ट्रात अखिल भारतीय समन्वयित मका सुधार प्रकल्प कोल्हापूर यांनी पंचगंगा, मांजरी, आफ्रिकन टॉल, करवीर, राजर्षी, फुले मधू, महर्षी इत्यादी उच्च उत्पादनक्षम जाती प्रसारीत केल्या आहेत.

प्रक्रिया व मूल्यवर्धन
मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीत अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, मेक्‍सिको, चीन इत्यादी देश अग्रेसर.
भारतातही प्रक्रिया व मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होते.  

भारत : बलस्थाने आणि कमकुवत स्थाने
बलस्थाने

 • भारतात वर्षामध्ये बहुतांश काळ स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. मका पिकाच्या अधिक उत्पादनासाठी फायदेशीर.
 • लागवडीसाठी मैदानी प्रदेश जास्त फायदेशीर. कारण अशा जमिनीत सर्वत्र एकसमान अन्नद्रव्यांची उपलब्धता असते. भारतात अशा जमिनीची भरपूर उपलब्धता आहे.
 • भारतीय संशोधन संस्थांनी एकेरी संकरीत जातींची निर्मिती केली आहे. सुधारित तंत्रज्ञानाची उपलब्धता भारतीय संशोधन संस्थांकडे आहे.
 • भारतात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामात मका पिकाचे उत्पादन घेता येते.

कमकुवत स्थाने

 • लागवडीखालील ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू, केवळ २० टक्के क्षेत्र बागायती.
 • स्थानिक व संकरीत जातींची मोठ्या क्षेत्रावर लागवड
 • कृषी विस्तार यंत्रणेला चालना देण्याची गरज.
 • सुधारित तंत्रांची उपलब्धता होणे गरजेचे.

भारतातून मका निर्यात वाढीसाठी आवश्‍यक बाबी

 • वेअर हाऊसची मोठ्या प्रमाणात उपलब्धतेची गरज.
 • वातावरण बदलाला सामोरे जाणाऱ्या नव्या जातींची निर्मितीची आवश्यकता.
 • अधिक उत्पादनक्षम एकेरी संकरीत जाती निर्मितीसाठी केंद्र व राज्य स्तरावर संशोधनासाठी पायलट प्रकल्पाची निर्मिती.
 • शेतकरी, शास्त्रज्ञांना प्रगत देशातील मद्यनिर्मिती व मद्य उद्योगासाठीच्या प्रशिक्षणाची गरज.
 • प्रगत देशांशी मका निर्यातीसाठी सामंजस्य करार करणे.
 • भारतीय वाणांत ट्रीप्टोफॅनचे प्रमाण ०.६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे परदेशी बाजारपेठात भारतीय वाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांचा प्रचार करण्याची गरज
 • निर्यातक्षम मूल्यवर्धित मका प्रक्रिया उत्पादनांसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज

जागतिक उत्पादन व उत्पादकता
अमेरिका, चीन, ब्राझील, मेक्सिको व भारत आदी देश लागवड क्षेत्राबाबत आघाडीवर.
उत्पादनात अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना, भारत, मेक्सिको, इंडोनेशिया, नायजेरिया, टांझानिया आदी देश आघाडीवर.
प्रतिहेक्टरी उत्पादकतेत अमेरिका, चीन, अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिया देश भारताच्या पुढे.

                                 विविध देशांची हेक्‍टरी उत्पादकता  

देश        पीक उत्पादकता (टन/ हे.)
अमेरिका    ९.७०
चीन    ५.६०
अर्जेंटिना     ६.५०
ब्राझील     ४.१०
इंडोनेशिया     ४.१०
मेक्‍सिको    ३.३०
भारत     २.४१
नायजेरिया  १.९०
टांझानिया     १.२०

अमेरिकेतील मका उत्पादन तंत्रज्ञान

 • एकेरी संकरीत व उशिरा पक्व होणाऱ्या जातींची लागवड, परिणामी अधिक व एकसमान दर्जा असलेले उत्पादन.
 • शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, हिरवळीचे खतांचा प्रतिहेक्टरी २० टन इतका वापर. संपूर्ण बागायत पद्धतीने लागवड
 • औद्योगिक क्षेत्राच्या मागणीप्रमाणे मका उत्पादन उदा. स्टार्चसाठी नारंगी मका; पोल्ट्री फीडसाठी - पिवळा मका, अधिक प्रथिनांसाठी - गुणात्मक प्रथिनयुक्त मका उत्पादन. परिणामी दर जास्त मिळतो व उत्पादकाचा फायदा होतो.  सर्व हंगामात उत्पादन
 • वेळेवर पीक संरक्षण उपाययोजनांचा अवलंब  
 • यांत्रिक पद्धतीने शेती : यंत्राद्वारे नांगरटीपासून मळणीपर्यंत कामे केली जातात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी.
 • उत्पादन : प्रतिहेक्टरी उत्पादनात अमेरिका सर्वात आघाडीवर, प्रतिहेक्टरी उत्पादन  ९.७ टन.

जागतिक निर्यातीत अमेरिका आघाडीवर

 • जागतिक बाजारपेठेत निर्यातीमध्ये अमेरिका, चीन, अर्जेंटिना, ब्राझील, मेक्‍सिको इत्यादी देश अाघाडीवर.
 • जागतिक स्तरावरील मका निर्यातीत अमेरिका ३५.९ टक्के, अर्जेंटिना १४. ५ टक्के, ब्राझील १३ टक्के, युक्रेन ८.४ टक्के, भारत ०.५ टक्के वाटा.
 • मका निर्यातीत भारताचा २० वा क्रमांक. भारताकडून इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम, बांगलादेश, श्रीलंका, ओमान, सिंगापूर, तैवान, संयुक्त अरब अमिराती आदी देशांत मका निर्यात.
 • मका विक्रीसाठी अमेरिका व मेक्‍सिको यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार.
 • प्रगतिशील देशांमध्ये ज्यांना जास्त मका उत्पादन होते अशा देशांनी दुसऱ्या देशांशी आयात निर्यातीचे करार धोरण कायमस्वरूपी केले आहे. उदा. अमेरिका आणि मेक्‍सिको. त्यामुळे अमेरिका, मेक्सिको यांचा जागतिक निर्यातीत अधिक वाटा.

संपर्क : डाॅ. मधुकर बेडीस, ८७८८०३६४१४
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत.)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर कृषी प्रक्रिया
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...