agricultural news in marathi Public participation is the foundation of development | Agrowon

लोक सहभाग हाच विकासाचा पाया

व्यंकटेश शेटे
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

कुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास आणि सार्वजनिक संसाधनांचा विकास म्हणजे गावातील उपलब्ध जल, जमीन, जंगल, जनावर आणि  ग्रामस्थ यांचा विकास होय.
 

कुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास आणि सार्वजनिक संसाधनांचा विकास म्हणजे गावातील उपलब्ध जल, जमीन, जंगल, जनावर आणि  ग्रामस्थ यांचा विकास होय.

ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी लोकसहभागातून कामे झाली, त्याचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे पाहावयास मिळतो. सामाजिक, आर्थिक आणि भौतिक विकास झाला तरच सर्वांगीण विकास झाला असे आपणास म्हणता येईल. कुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास आणि सार्वजनिक संसाधनांचा विकास म्हणजे गावातील उपलब्ध जल, जमीन, जंगल, जनावर आणि  ग्रामस्थ यांचा विकास होय. ज्या विकासकामांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग दिसतो, ती कामे परिणामकारक होतात. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल, तर पुढील १५ वर्षांमध्ये खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. 

ग्राम विकासाचे धोरण 

  • वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या अडचणीमुळे नैसर्गिक संसाधनाचा विकास होणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक, व्यवस्थापन व योग्य वापरावर भर द्यावा लागेल.
  • जमिनीची सुपीकता आणि शेतीमालाची गुणवत्ता वाढविण्यासाठी रसायन अवशेषमुक्त शेती व्यवस्थापनाकडे लक्ष दिले पाहिजे. याचबरोबरीने पीक उत्पादकता वाढ, पीक बदल हे देखील महत्त्वाचे मुद्दे आहेत. स्वयंचलित हवामान केंद्राच्या साह्याने पीकनुकसान कमी करणे शक्य आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा.  
  • शेती विकासाकरिता गावामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतीमालास योग्य दर मिळविण्यासाठी साठवणूक सुविधा, मूल्यवर्धन व बाजारपेठ निर्मितीसाठी भर द्यावा.
  • शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालनावर भर द्यावा. याचबरोबरीने प्रक्रिया उद्योगालाही चालना देण्याची आवश्यकता आहे. 
  • शेतीमालाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री जसे डाळ मिल, राइस मिल, ऑइल मिल, कांदा मिरची/ हळद कांडप यंत्राच्या प्रसारावर भर दिला पाहिजे. गावामध्ये एक व्यवसाय सुरू झाला, की तेथे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.  
  • कौशल्य विकासावर भर दिल्यास गावामध्ये तरुण मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करता येईल. यामध्ये इलेक्ट्रिशयन, प्लंबर, नर्स असिस्टंट, गारमेंट, मोबाइल दुरुस्ती, हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था अशा अनेक व्यवसायांना चालना देण्याची गरज आहे.

लुपिन फाउंडेशनचा उपक्रम 
गेली ३२ वर्षे लुपिन फाउंडेशन ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नऊ राज्यांतील सुमारे ५,४३१ गावांमध्ये कार्यरत आहे.  लोकसहभागातून विविध विकासकामांना संस्थेने चालना दिली आहे. २०१४ मध्ये बुचकेवाडी (ता.जुन्नर, जि. पुणे) येथे संस्थेने नाबार्ड अर्थसाह्याने लोकसहभागातून पाणलोट विकास कार्यक्रम राबविला. संस्थेने शेतकरी प्रोड्यूसर कंपन्यांची स्थापना करून गुणवत्तापूर्ण खते, कीडनाशके, जनावरांच्या खाद्याचा शेतकऱ्यांना स्वस्त दरात पुरवठा केला जातो. शेतीमालास योग्य दर मिळविण्यासाठी शेतकरी कंपनीमार्फत विविध व्यवसाय सुरू करण्यात येत आहेत.     

- व्यंकटेश शेटे, ९७६४००३७३६
(प्रकल्प व्यवस्थापक, लुपिन फाउंडेशन, पुणे)


इतर ग्रामविकास
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
शेती, पूरक उद्योगावर दिला भरकुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे...
महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकाससामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी...
पाणीपुरवठा, जलपुनर्भरणाच्या कामांना आता...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
लोक सहभाग हाच विकासाचा पायाकुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा...
ग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालनालोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे ...
पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मातजालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या...
गावामध्ये असावी संयुक्त कुरण व्यवस्थापन...शेती परिवार कल्याण संस्था गावशिवारातील माळरानावर...
गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्नतीन वर्षांपासून मनारखेड गावाचे सरपंचपद सांभाळत...
शिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...
दुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...