निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणी

दुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य वनस्पतिजन्य पदार्थातील सेल्यू्लोजचे पचन करणारी विकरे (एंझाइम्स) या जिवाणूमार्फत तयार केली जातात. प्रसंगी रोगकारक घटकांशी लढण्याचेही कामही ते करतात. जिवाणूंची संख्या संतुलित राखण्यासाठी दुधाळ प्राण्यांमध्ये पिण्यासाठी दिले जाणारे पाणी निर्जंतुक असणे गरजेचे असते.
Pure, sterile water for healthy livestock
Pure, sterile water for healthy livestock

दुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य वनस्पतिजन्य पदार्थातील सेल्यू्लोजचे पचन करणारी विकरे (एंझाइम्स) या जिवाणूमार्फत तयार केली जातात. प्रसंगी रोगकारक घटकांशी लढण्याचेही कामही ते करतात. जिवाणूंची संख्या संतुलित राखण्यासाठी दुधाळ प्राण्यांमध्ये पिण्यासाठी दिले जाणारे पाणी निर्जंतुक असणे गरजेचे असते. गाय, म्हैस, शेळी यांसारखे रवंथ करणाऱ्या सस्तन प्राण्यांच्या पचनसंस्थेमध्ये निसर्गत: लाखो उपयुक्त जिवाणू असतात. रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये चयापचय आणि किण्वतेमध्ये उपयुक्त जिवाणू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य वनस्पतिजन्य पदार्थातील सेल्यू्लोजचे पचन करणारी विकरे (एंझाइम्स) या जिवाणूमार्फत तयार केली जातात. प्रसंगी रोगकारक घटकांशी लढण्याचेही कामही ते करतात. जिवाणूंची संख्या संतुलित राखण्यासाठी दुधाळ प्राण्यांमध्ये पिण्यासाठी दिले जाणारे पाणी निर्जंतुक असणे गरजेचे असते. अस्वच्छ, रोगकारक सूक्ष्मजीवयुक्त पाण्यामुळे आतड्यांमधील उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी होते. परिणामी जनावरांमध्ये हगवण, ताप, ॲलर्जी यांसारखे आजार वाढतात. बऱ्याचदा बाह्य लक्षणे आढळली नाहीत, तरी दूध उत्पादनात हमखास घट दिसून येते. प्राण्यांची रोग प्रतिकारक्षमता खालावल्याने कासदाहासारखे दुर्धर आजारांना ती बळी पडतात. पशुपालकास कमी उत्पन्न, उपचाराचा खर्च असा दुहेरी भुर्दंड पडतो.  नैसर्गिक स्रोतांतून वाहत येताना पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जिवाणू, विषाणू, एकपेशीय जीव-जंतू, जंत, बीजाणू, जंतांची अंडी इ.ही वाहून येतात. साठवणूक केलेल्या पाण्यात यांची संख्या अधिकच वाढते. पाइपलाइनमधून अंतर्गत शेवाळ व अन्य बाबींमुळे अशा प्रदूषणाचे प्रमाण वाढते.  पाण्यातील रोगकारक घटक

  • जिवाणू - ई-कोलाय, कोलफार्म, सॅलमोन्नेला, स्युडोमोनास इ.
  • एकपेशीय जीव (प्रोटोझोआ) - अमिबा, जियार्डिया, क्रिप्टोस्पोरिडियम, नेओस्पोरा इ.
  • विषाणू - रोटा विषाणू, हेपॅटायटिस विषाणू इ. 
  • शेवाळ - सायनोबॅक्टरीया वर्गीय शेवाळ विषारी पदार्थ तयार करतात.
  • जनावरांच्या पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे निर्जंतुकीकरणाच्या चाचण्या पूर्ण केलेले स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे असावे. कारण एका अर्थी दुधाळ जनावरांमध्ये या पाण्याच्या प्रमाणावरच दुधाचे प्रमाण ठरत असते. दूध हे मुख्यतः ८७ टक्के पाणी असून, उर्वरित घटकांमध्ये काही फॅट्स (स्निग्ध पदार्थ), प्रोटिन्स (प्रथिने),आणि लॅक्टोज यांनी बनलेले असते. या ८७ टक्के पाण्यातील सुमारे ७५ ते ७७ टक्के पाणी हे जनावरांच्या प्यायलेल्या पाण्यातून उपलब्ध होते, तर केवळ ८ ते १० टक्के पाणी शरीराच्या चयापचय क्रियांतून येते. दुधाळ जनावरांइतकेच वासरांच्या आरोग्यासाठी व सुदृढ वाढीसाठी त्यांच्या जन्मापासून निर्जंतुक पाणी आवश्यक ठरते. कारण अशुद्ध पाण्यातून शरीरात रोगकारक सूक्ष्मजीवांनी शिरकाव केला तर त्यांचे कायमचे बस्तान बसू शकते. ते उपयुक्त जिवाणूंच्या वाढीला हानिकारक ठरतात. विशेषतः रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये पचनसंस्थेमध्ये उपयुक्त उपयुक्त जिवाणूंची वाढ सुरवातीच्या काळापासून होणे पुढील आयुष्यासाठी निर्णायक ठरते. सातत्याने अशुद्ध, अस्वच्छ पाणी हे दुधाळ जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी करते. असे प्राणी (गाय/ म्हैस/ शेळी) कासदाहाच्या संसर्गाला बळी पडल्याचे निदर्शनास येते. सौम्य ते तीव्र स्वरूपाचा हा रोग जनावरांच्या आरोग्यावर परिणाम करतो. प्रसंगी प्राणी दगावू शकतो. ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध, सुरक्षितता’ हेच महत्त्वाचे. गायीच्या, म्हशीच्या, शेळीच्या दुधात त्यांच्या शरीराच्या पेशी दूध काढताना येतात. प्रति मि.लि. दुधात असणारे पेशींचे (सोमॅटिक सेल्स) प्रमाण जितके जास्त तितका दुधाचा दर्जा वाईट असे समीकरण आहे. असे दूध पिण्यास योग्य मानले जात नाही. दुधातील सोमॅटिक सेल्सचे प्रमाण भारतीय मानकांनुसार १ लाखापेक्षा कमी असावे. हे अनेकदा २ लाखांपेक्षा जास्त दिसून येते. हे लक्षात घेता दुधाळ प्राण्यांसाठी शुद्ध, स्वच्छ, निर्जंतुक पाणी प्यायला देणे आवश्यक ठरते.  शुद्ध पाण्याचे फायदे

  • निरोगी रवंथप्रक्रिया 
  • सुधारित चयापचय क्रिया
  • उत्तम रोग प्रतिकारक्षमता. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण  
  • दूध उत्पादनात व गुणवत्तेत वाढ 
  • निरोगी आणि कार्यक्षम प्राणी
  • आर्थिक लाभात वाढ.
  • - भावना भारंबे, ९३७३२५२२४८ (लेखिका खासगी कंपनीत कार्यरत सूक्ष्म जीवशास्र विषयक तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com