agricultural news in marathi Quality animal feed for increasing milk production | Page 3 ||| Agrowon

दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहार

डॉ. मनोजकुमार आवारे, डॉ. वर्षा थोरात
शनिवार, 8 मे 2021

चारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार महत्त्वाचा आहे. स्टार्च आणि स्निग्ध पदार्थांची आहारातील पातळी योग्य प्रमाणात ठेवावी.जनावरांच्या आहारातील चारा आणि पशुखाद्याच्या प्रमाणावर दुधाची प्रत अवलंबून असते.
 

चारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार महत्त्वाचा आहे. स्टार्च आणि स्निग्ध पदार्थांची आहारातील पातळी योग्य प्रमाणात ठेवावी.जनावरांच्या आहारातील चारा आणि पशुखाद्याच्या प्रमाणावर दुधाची प्रत अवलंबून असते.

जनावरांना दिला जाणारा आहार दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम करतो. जनावरांच्या गरजेनुसार आहाराचे योग्य नियोजन केल्यास दुधाची प्रत सुधारण्यास मदत होते. जनावरांच्या आहारातील चारा आणि पशुखाद्याच्या प्रमाणावर दुधाची प्रत अवलंबून असते. चारा कुट्टीचा योग्य आकार महत्त्वाचा आहे. जो दुधाची प्रत ठरवण्यास कारणीभूत असतो.आहारामध्ये स्टार्चचे प्रमाण हा महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे दुधाची प्रत ठरवता येते.आहारामधून दिल्या जाणाऱ्या स्निग्ध पदार्थावर दुधाची प्रत अवलंबून असते.पशू आहारातील स्निग्धांश आणि प्रथिने यांची मात्रा दुधाची प्रत वाढवण्यास वाढण्यास मदत करते.

आहाराचे ग्रहण 

 • खाद्यातून पौष्टिक घटक मिळतात. जे की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुधातील घन पदार्थाचे मुख्य घटक वाढवितात.
 • वाढीव आहाराचे ग्रहण सहसा जास्त दूध उत्पादनावर परिणाम करते. सामान्यतः स्निग्धांश, प्रथिने आणि शर्करा उत्पादन हे वाढत्या दुधाप्रमाणे वाढते.
 • व्यायल्यानंतर वेताच्या सुरुवातीच्या काळात आहार ग्रहण करण्याचे प्रमाण वाढविल्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा भरून काढण्यास मदत होते. अधिक प्रमाणात ग्रहण केलेल्या ऊर्जेमुळे वजन भरून काढण्यास मदत होते.
 •  शरीर स्थिती गूण (BCS) कमी होतो. परिणामी, गाय चांगल्या स्निग्धांश आणि प्रथिनांचे (वाढीव ०.२ ते ०.३ टक्का) दूध निर्माण करते.

 रुमेनचे कार्य 
रुमेनचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी काही पूरक घटक खाद्यामध्ये दिले पाहिजेत. त्यामुळे दूध उत्पादन आणि प्रत वाढण्यास मदत होते.

चारा आणि पशुखाद्याचे प्रमाण 
चारा आणि पशुखाद्याचे प्रमाण (४० : ६०) कमीत कमी असणे हे दुधाचा स्निग्धांश वाढवण्यास गरजेचे असते. हे प्रमाण ठेवल्यामुळे ओटीपोटातील आम्लता कमी होते, प्रोपियोनिक आम्ल निर्मिती वाढते, जे दुधाचा स्निग्धांश वाढवायला मदत करते.

धान्ययुक्त आहार 

 • योग्य पशुखाद्य खाऊ घालताना चारा आणि पशुखाद्याचे प्रमाण आणि तंतुमय पदार्थ विरहित कार्बोदकांचे प्रमाण महत्त्वाचे ठरते.
 • तंतुमय पदार्थ विरहित कर्बोदके यांचे प्रमाण एकूण शुष्क पदार्थाच्या आहारावर ३६ ते ३८ टक्के इतके असावे. योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ विरहित कर्बोदके खाऊ घातल्यास दुधाचा स्निग्धांश आणि प्रथिने वाढण्यास मदत होते. परंतु अति प्रमाणात खाऊ घातल्यास दुधाचा स्निग्धांश (१ युनिट) कमी होतो. परंतु प्रथिने ०.२ ते ०.३ युनिटने वाढते.

धान्य प्रक्रिया 

 • धान्याचा प्रकार आणि त्यावर करावयाची प्रक्रिया यांचा महत्त्वाचा परिणाम आहारामधील स्टार्च पचनियता, दूध वाढ तसेच दुधाची प्रत वाढवण्यास मदत होते.
 • सामान्यतः दळलेले, रोल केलेले, गरम केलेले, स्टीम फ्लेक्ड, वाफवलेले किंवा गोळी पेंड स्वरूपात धान्य खाऊ घातल्यास त्यामधील स्टार्चची पचनियता आणि प्रोपियोनिक आम्ल निर्मिती वाढते, जे दुधाचा स्निग्धांश वाढवायला मदत करते.
 • स्टीम फ्लेक्ड मका किंवा ज्वारी तुलनेने वाफवलेला मका किंवा ज्वारीपेक्षा सातत्यपूर्ण दूधनिर्मिती आणि दुधाचे प्रथिने वाढवते. परंतु दुधाच्या स्निग्धांशामध्ये बदल होत नाही.
 • काही धान्ये जसे की गव्हामध्ये वेगाने किण्वीत होणारी कर्बोदके असतात. यांचा आणि त्यांच्यावरील अति प्रमाणातील प्रक्रिया, विस्तृत प्रमाणात वापराचा परिणाम दुधाचा स्निग्धांश आणि दूधनिर्मिती कमी होण्यावर होतो.
 • कर्बोदके आणि प्रथिनांचे माध्यम, तसेच तंतुमय पदार्थ विरहित कर्बोदकांचे आहारातील प्रमाण यांचे निरीक्षण करावे. जेणेकरून योग्य किण्वन पद्धतीची खात्री होते. त्यामुळे दूध आणि प्रत वाढण्यास मदत होते.

आहारातील तंतुमय पदार्थांची मात्रा 

 • आहारातील तंतुमय पदार्थांची मात्रा आणि त्या तंतुमय पदार्थांचा आकार हे माध्यमाची परिणामकारकता ठरवते जसे की, रवंथ करणे, लाळ निर्मिती करणे, सामान्य दूधनिर्मिती आणि प्रत टिकवून ठेवणे (स्निग्धांश, प्रथिने) इत्यादी.
 • अति प्रमाणात बारीक केलेला चारा अपुऱ्या प्रमाणात रवंथ आणि लाळ निर्मितीला उत्तेजित करते. याचा परिणाम म्हणून रुमेनमधील किण्वन प्रक्रियेचा नमुना तयार होतो. ज्यामुळे प्रोपिओनिक आम्ल जास्त प्रमाणात तयार होते. दुधाचा स्निग्धांश कमी होतो. चाऱ्याची कुट्टी करताना १.५ इंचाचे तुकडे करावेत.

प्रथिनांचे सेवन 

 • - सामान्यतः आहारातील प्रथिनांची मात्रा दूध उत्पादनावर परिणाम करते. परंतु जोपर्यंत त्या आहारात प्रथिनांची कमतरता जाणवत नाही, तोपर्यंत दुधाच्या प्रथिनांवर त्याचा परिणाम दिसत नाही.
 • आहारातील प्रथिनांमधील बदल सातत्याने दुधाच्या स्निग्धांशावर परिणाम करत नाही. रुमेनमध्ये विघटित होणाऱ्या प्रथिनांचा अपुऱ्या प्रमाणातील पुरवठा कदाचित दुधाचा स्निग्धांश कमी करू शकते. जर रुमेनमधील अमोनिया तंतुमय पदार्थांचे पचन आणि सूक्ष्म जिवाणूंची वाढ यांना मदत करू शकत नसेल, तर असे दिसून येते.

दुधाची प्रत (स्निग्धांश) वाढवण्याचे उपाय 

 • चांगल्या गुणवत्तेचा चारा द्यावा.
 • दुधाळ जनावरांना व्यवस्थित मिसळलेला पशू आहार द्यावा.
 • तंतुमय पदार्थ आणि त्यांची पचनीयता यांचा ताळमेळ राखावा.
 • स्टार्च आणि स्निग्ध पदार्थांची आहारातील पातळी योग्य प्रमाणात ठेवावी.
 • अमिनो आम्ल: लायसीन आणि मेथिओनिन याचा समतोल राखावा.
 • कमी तंतुमय पदार्थ आणि जास्तीचा धान्ययुक्त आहार वारंवार खाऊ घातल्यास दुधाचा स्निग्धांश वाढण्यास मदत होते.
 • ४५ टक्यांपेक्षा कमी चारा आणि धान्ययुक्त विभाजित आहार जास्तीचा स्निग्धांश वाढविण्यास मदत करते.
 • उन्हाळ्यामध्ये वारंवार खाऊ घातल्यामुळे भूक आणि खाण्याची आवड वाढते. त्याचा परिणाम दुधाच्या स्निग्धांश वाढण्यावर होतो.

दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाय 

 • व्यवस्थित भाकड काळ ठरवावा.
 • वेताच्या पहिल्या आठवड्यात दुधाचा ताप (रक्तातील कॅल्शिअम कमी होणे) येणार नाही, याची काळजी घ्यावी.
 • व्यायल्यानंतर आहाराचे प्रमाण व्यवस्थित असावे.
 • व्यायल्यानंतर गाईची निगा राखावी.
 • ओटी पोटातील आरोग्य आणि आम्लता प्रतिबंधित करावी.
 • चयापचयाचे आजार ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करावी.
 • वेताच्या वेळी शरीर स्थिती गुण (BCS) ३.० ते ३.२५ या दरम्यान ठेवावा.

पशुआहार पूरक घटक 

 • खाद्यामध्ये अपौष्टिक घटक नसावेत.
 • अँटिऑक्सिडंट्सचा वापर (उदा. जीवनसत्त्व ई आणि सेलेनियम) ऑक्सिटेटिव्ह ताण कमी होतो.
 • सोमॅटिक सेल काऊंट वाढला, तर कासदाह होण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे दुधाची गुणवत्ता कमी होते.

संपर्क : डॉ. मनोजकुमार आवारे ः ९४२१००७७८५
(डॉ.आवारे हे बाएफ संस्थेमध्ये पशुआहार व पशुपोषण विभाग प्रमुख आणि डॉ. वर्षा थोरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे सहायक प्राध्यापिका आहेत.)


इतर कृषिपूरक
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...