रब्बी ज्वारीची पूर्वतयारी

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट व पूर्वमशागत करणे गरजेचे असते. यानंतर चौकोनी आकाराचे वाफे तयार करून घेतल्यास मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील किंवा परतीच्या पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे मुरते. त्याचा फायदा ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होतो.
पाणी मुरवण्यासाठी तयार केलेले १० बाय १० फुटाचे चौकोनी वाफे, व त्यात पावसानंतर साठलेले पाणी.
पाणी मुरवण्यासाठी तयार केलेले १० बाय १० फुटाचे चौकोनी वाफे, व त्यात पावसानंतर साठलेले पाणी.

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट व पूर्वमशागत करणे गरजेचे असते. यानंतर चौकोनी आकाराचे वाफे तयार करून घेतल्यास मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील किंवा परतीच्या पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे मुरते. त्याचा फायदा ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होतो. अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे नांगरणी केलेल्या शेतातील मातीची ढेकळे विरघळली असतील. काही ठिकाणी मातीची ढेकळे विरघळली नसल्यास ती फोडून घ्यावीत. त्यानंतर ३ ते ४ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन तयार करावी. शेवटच्या पाळी पूर्वी प्रति हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीवर पसरावे. जमिनीत पाणी मुरविण्याकरीता कुळवाच्या पाळ्या व इतर मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. यामुळे शेतात पडणाऱ्या पावसाचे पाणी मूलस्थानी जिरण्यास मदत होते. रब्बी ज्वारीच्या उत्पादन वाढीसाठी मूलस्थानी जल व्यवस्थापन हे पंचसूत्री तंत्रातील सर्वांत महत्त्वाचे आणि पहिले तंत्र आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे पाणी मुरविण्यासाठी जमिनीची बांधणी करावी.

  • त्यानंतर मजुरांच्या साह्याने १० × १० चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावे. किंवा
  • २.७० मीटर अंतरावर सारा यंत्राने सारे पाडून घ्यावेत. त्यानंतर दर २० मीटर अंतरावर बळिराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत. यामुळे वाफे तयार करण्यासाठी आवश्यक मजुरीत बचत होऊ शकते.
  • सोईस्कर अशा कोणत्याही तंत्राने वाफे तयार करून घेतल्यास पडणाऱ्या पावसाचे पाणी मुरण्यास मदत होईल.
  • - डॉ. सूरज गडाख, ७५८८०७९७९१ (ज्वारी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com