agricultural news in marathi Rabbi Sorghum advisory | Page 2 ||| Agrowon

रब्बी ज्वारीची पूर्वतयारी

डॉ. सूरज गडाख, डॉ. दीपक दुधाडे
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट व पूर्वमशागत करणे गरजेचे असते. यानंतर चौकोनी आकाराचे वाफे तयार करून घेतल्यास मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील किंवा परतीच्या पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे मुरते. त्याचा फायदा ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होतो.
 

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट व पूर्वमशागत करणे गरजेचे असते. यानंतर चौकोनी आकाराचे वाफे तयार करून घेतल्यास मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील किंवा परतीच्या पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे मुरते. त्याचा फायदा ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होतो.

अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे नांगरणी केलेल्या शेतातील मातीची ढेकळे विरघळली असतील. काही ठिकाणी मातीची ढेकळे विरघळली नसल्यास ती फोडून घ्यावीत. त्यानंतर ३ ते ४ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन तयार करावी. शेवटच्या पाळी पूर्वी प्रति हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीवर पसरावे. जमिनीत पाणी मुरविण्याकरीता कुळवाच्या पाळ्या व इतर मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. यामुळे शेतात पडणाऱ्या पावसाचे पाणी मूलस्थानी जिरण्यास मदत होते.

रब्बी ज्वारीच्या उत्पादन वाढीसाठी मूलस्थानी जल व्यवस्थापन हे पंचसूत्री तंत्रातील सर्वांत महत्त्वाचे आणि पहिले तंत्र आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे पाणी मुरविण्यासाठी जमिनीची बांधणी करावी.

  • त्यानंतर मजुरांच्या साह्याने १० × १० चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावे. किंवा
  • २.७० मीटर अंतरावर सारा यंत्राने सारे पाडून घ्यावेत. त्यानंतर दर २० मीटर अंतरावर बळिराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत. यामुळे वाफे तयार करण्यासाठी आवश्यक मजुरीत बचत होऊ शकते.
  • सोईस्कर अशा कोणत्याही तंत्राने वाफे तयार करून घेतल्यास पडणाऱ्या पावसाचे पाणी मुरण्यास मदत होईल.

- डॉ. सूरज गडाख, ७५८८०७९७९१
(ज्वारी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


इतर कृषी सल्ला
इच्छा तेथे मार्ग मिळतोच...वातावरण बदलाच्या लढ्याविरुद्धचा पराभव शोकांतिकेत...
राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यताआज अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात...
शेतकरी नियोजन : हापूस आंबाशेतकरी ः तुकाराम घवाळी गावः शिरगाव जि. रत्नागिरी...
नाव बदलणाऱ्या देशा... भाताच्या देशा !साध्या सरळ माणसांनी भरलेला कंबोडिया, भाताच्या...
शेतकरी नियोजन ः पीक वांगीशेतकरी : योगेश तोडकरी गाव : नारायणगांव...
हळदीमध्ये आंतरमशागतीचे महत्त्वतापमान कमी-जास्त झाले तर कीड-रोगांचा प्रादुर्भाव...
द्राक्ष बागेतील अन्नद्रव्यांच्या...दर्जेदार द्राक्ष उत्पादन व वजनासाठी द्राक्ष वेलीत...
गुलाब फुलांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानफूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे....
अन्न सुरक्षेसाठी गव्हाचे पोषणयुक्त वाणभारतीय कृषी संशोधन संस्थेच्या संशोधन केंद्राने...
हरितगृहात गुलाब लागवडीनंतर घ्यावयाची...हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची...
अन्नद्रव्यांचा ब्रिकेट्स स्वरूपात वापरकोकण कृषी विद्यापीठाने मुखत्वे भात पिकाचे उत्पादन...
ढगाळ हवामान; थंडीवर परिणामयेत्या दोन दिवसांत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र तसेच...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा...बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण...
शेतकरी नियोजन- पीक डाळिंबमी मागील २० वर्षांपासून बागेमध्ये हस्त आणि आंबिया...
शेतकरी नियोजन : केसर आंबाशेतकरी ः कल्पेश रवींद्र जैन गाव : नागद, ता....
राज्यभरात थंडीची चाहूल...गुरूवार आणि शुक्रवार (ता.४, ५) रोजी महाराष्ट्रावर...
शेतकरी नियोजन : रेशीम शेतीशेतकरी ः श्रीधर सोलव गाव ः बरबडी, ता. पूर्णा, जि...
कंबोडियातील भारतीय सण!कंबोडियात फिरताना भारताशी जुळलेली त्यांची नाळ सतत...
अटल इनक्युबेशन सेंटर : ज्ञान, संशोधनाचे...बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या...