agricultural news in marathi Raising of crossbred calves | Page 3 ||| Agrowon

संकरित वासरांचे संगोपन

डॉ.बी.सी.घुमरे, डॉ.विकास कारंडे
शनिवार, 7 ऑगस्ट 2021

जन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक पाजावा. कारण चिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती व विविध जीवनसत्वे असतात.वयाच्या सहा महिन्यानंतर वासरांना लसीकरण करून घ्यावे.
 

जन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक पाजावा. कारण चिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती व विविध जीवनसत्वे असतात.वयाच्या सहा महिन्यानंतर वासरांना लसीकरण करून घ्यावे.

वासरांच्या संगोपनावर आपल्या पुढील व्यवसायाचे यश अवलंबून असते. दुभत्या जनावरांमध्ये वासरांचा मृत्यू झाल्यास काही प्रमाणात दूध उत्पादनात घट येते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी वासराचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

वासरू जन्माला येण्यापूर्वी घ्यावयाची काळजी 

 • वासराची काळजी ही त्यांच्या जन्मापूर्वीच सुरु होते. सुदृढ गायीच्या पोटी सुदृढ वासरू जन्मते. अशक्त गायीच्या पोटी अशक्त वासरू जन्मते. अशी वासरे आजाराला लवकर बळी पडतात. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते.
 • गाय ६ ते ९ महिन्यांची गाभण असतानाच्या कालावधीत वासराची वाढ अधिक प्रमाणात होत असते. म्हणून गाईस रोजच्या चाऱ्या व्यतिरिक्त २.५ ते ३ किलो एवढे वाढीव पशू खाद्य द्यावे. मुबलक प्रमाणात हिरवा चारा द्यावा.

वासरू जन्मताना घ्यावयाची काळजी 

 • गाईस प्रसूती यातना सुरु झाल्यानंतर काही वेळानंतर वासराचे पुढील पाय बाहेर येताना दिसतात. वासरू सहज बाहेर येते. परंतु वासराचे पाय आडवे झाल्यास किंवा डोके वाकडे झाल्यास जाणकार व्यक्तीने हात स्वच्छ पाण्याने धुऊन वासरू सरळ करून ओढून घ्यावे.
 •  वासरू बाहेर आल्याबरोबर त्याच्या तोंडावरील व नाकातील बळस किंवा चिकट पदार्थ काढून घ्यावा.
 • वासरू गाई समोर ठेवावे, म्हणजे गाय त्याला जिभेने चाटून पुसून स्वच्छ करते.
 • गाईने वासराला न चाटल्यास वासराला कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे.
 • वासराची नाळ त्याच्या शरीरापासून २ ते २.५ से.मी. अंतरावर नवीन ब्लेडने कापावी. नंतर त्यावर आयोडीन लावावे.

वासराच्या जन्मापासून तीन महिन्यापर्यंत घ्यावयाची काळजी:

 • जन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक पाजावा. कारण चिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती व विविध जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे वासरांची पचन संस्था साफ होते. वासरू निरोगी राहण्यास मदत होते.
 • वासराच्या शिंग काळ्या नष्ट कराव्यात, कारण बीन शिंगाच्या वासरांना गोठ्यात जागा कमी लागते. त्यांची हाताळणी सोपी असते. शिंगे जाळण्यासाठी रासायनिक पद्धतीचा किंवा उपकरण पद्धतीचा उपयोग करणे.
 • नर वासराचे खच्चीकरण करावे, कारण त्यांचे संगोपन करणे सोपे जाते.

कालवडीतील जास्त असणारे सड काढणे 
दूध व्यवसायात गाय सर्वदृष्टीने योग्य असणे आवश्यक असते. कालवडींना चारपेक्षा अधिक सड असतील तर ते काढून घ्यावेत.

कालवडी वाढविण्याच्या पद्धती 

 • वासराला गायी बरोबर ठेवणे. दूध काढण्याअगोदर वासराला दूध पिण्यास सोडणे.
 • वासराच्या जन्मानंतर वासराला गायी पासून वेगळे करणे.
 • या दोन्ही पद्धती पैकी दुसरी पध्दत अधिक दूध देणाऱ्या संकरित गाई मध्ये वापरली जाते. या पद्धतीमध्ये वासरू गायीला दूध पिण्यासाठी सोडत नाहीत. वासराला बाटलीने किंवा भांड्यात दूध ओतून पाजले जाते.

गोठे 

 • वासराचे गोठे गाईच्या शेजारीच असावेत.
 •  वासरांच्या व्यवस्थापनात सुलभता येण्यासाठी त्यांचे वयोगटात विभाजन करावे.
 •  वासरांच्या व्यायामासाठी वेगळी मोकळी जागा सोडावी, त्यासाठी एका वासराला १० चौ.फूट या प्रमाणात बांधकाम करावे.
 • आजारी वासरे वेगळ्या गोठ्यात बांधावीत.
 • वासरांच्या संगोपनात ०-३ महिने वायोगटाकडे अधिक लक्ष द्यावे.
 • वासरांच्या गोठ्यांना तार,सळई या प्रकारचे साहित्य वापरू नये कारण यामुळे त्यांना इजा होऊ शकते.

संसर्गजन्य आजार 

 • बुळकांडी,लाळ्या खुरकूत, घटसर्प,फऱ्या.
 • हे आजार वासरांना होऊ नयेत म्हणून वयाच्या सहा महिन्यानंतर लसीकरण करून घ्यावे.

जतांपासून वासराचे संरक्षण 

 • लहान वयात वासरांना जतांचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो. त्यामुळे वासरे अशक्त बनतात. वासरांची वाढ खुंटते.
 • वासरांना गोलकृमी,पर्णकृमींचा प्रादुर्भाव होतो.
 • वासराचे गोचीड, गोमाशा यांच्यापासून संरक्षण करावे.

संपर्क-डॉ.बी.सी.घुमरे, ९४२१९८४६८१
डॉ.विकास कारंडे ९४२००८०३२३
(क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि.सातारा येथे कार्यरत आहेत.)


इतर कृषिपूरक
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...
शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापरकृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून...
योग्य पशुधनाची निवड महत्त्वाचीदुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....