agricultural news in marathi Ramdas Ghotekar from Kolgaon (Tal. Niphad) in Nashik district made continuous changes in the dairy business | Agrowon

अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध व्यवसायातील आदर्श

मुकुंद पिंगळे
मंगळवार, 11 मे 2021

नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील  रामदास घोटेकर यांनी दुग्ध व्यवसायात व्यावसायिक दृष्टिकोन रुजवीत सातत्यपूर्ण बदल केले. जातिवंत गायींचे संगोपन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चारा पिकांत स्वयंपूर्णता, गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, शेणखतातून पूरक उत्पन्न ही त्यांच्या यशस्वी व्यवसायामागील वैशिष्ट्ये सांगता येतील.
 

नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील अल्पभूधारक रामदास घोटेकर यांनी दुग्ध व्यवसायात व्यावसायिक दृष्टिकोन रुजवीत सातत्यपूर्ण बदल केले. जातिवंत गायींचे संगोपन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चारा पिकांत स्वयंपूर्णता, मुरघास, गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, शेणखतातून पूरक उत्पन्न ही त्यांच्या यशस्वी व्यवसायामागील वैशिष्ट्ये सांगता येतील.

नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील दशरथ भीमाजी घोटेकर यांची अवघी अडीच एकर जमीन होती. क्षारयुक्त पाणी व जमिनीमुळे पीकबदल व शेती करण्यावर मर्यादा होत्या. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दोन वर्षे सालगडी म्हणून त्यांनी काम केले. मुलगा रामदास यांनाही नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. रोजंदारी व पुढे शिवणकाम करून त्यांनी घराला आर्थिक आधार दिला.

दुग्ध व्यवसायात चालना
वडिलांनी २००५ मध्ये होल्स्टिन फ्रिजियन (एचएफ) गायीच्या दोन कालवडी खरेदी करून दुग्ध व्यवसाय सुरू केला. व्यवसायात रामदास मदत करीत. पुढे वडिलांच्या गुडघेदुखीच्या त्रासानंतर एकुलते एक असल्याने संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. पशुसंवर्धन विभागाचे शास्त्रीय मार्गदर्शन लाभले. व्यवसायात हुरूप आला. कामकाजात नावीन्यपूर्णता आणत २००७ मध्ये मुक्तसंचार गोठा तयार केला.

तंत्रज्ञान आधारे समस्यांवर मात
पाणी शुद्धीकरण युनिट

 • क्षारयुक्त पाण्यामुळे रेतनपश्‍चात समस्या, डायरिया, अशक्तपणा, पचनक्रिया बिघाड आदींमुळे पशुवैद्यकीय खर्च वाढला.
 • पर्याय म्हणून २० हजार लिटर क्षमतेची सिमेंट पाणी टाकी बांधली. सलग १० वर्षे पाणी विकत घेतले.
 • खर्च आवाक्याबाहेर गेल्यानंतर ताशी एक हजार लिटर क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला. त्याद्वारे पाणीप्रश्न कायमचा सुटला.

स्वयंचलित दूध काढणी यंत्र
दररोज सरासरी २२५ लिटरपर्यंत दूध काढण्यासाठी मनुष्यबळ नव्हते. स्वयंचलित यंत्र खरेदी केले. त्यामुळे वेळेवर दूधकाढणीबरोबर श्रमबचत झाली.

बल्क मिल्क कुलर

 • दूध पुरवठ्यासाठी १५ किलोमीटरवरील विंचूरला जावे लागे. खर्च, वेळ व श्रम अधिक लागायचे.
 • उपाय म्हणून ३०० लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कूलरची खरेदी.
 • शीतकरणाद्वारे दूध दिल्याने बाजार भावापेक्षा एक रुपया दर अधिक मिळू लागला.
 • दुधाची टिकवणक्षमता वाढली. नुकसान शून्यावर आले.
 • गुजरात राज्यातील पंचमहल दूध संघाद्वारे दहा वर्षांपासून थेट घरून दूध नेण्यात येते.
 • विद्युतपुरवठा खंडित झाल्यास ७.५ अश्‍वशक्तीच्या जनरेटरची सुविधा.

चाऱ्यात स्वयंपूर्णता

 • एक एकरांत लसूण घास, अर्धा एकर गिन्नी गवत.
 • यंदा चिकातील हिरवा मका खरेदी करून ६० टन मुरघासनिर्मिती.
 • हवाबंद करून साठवणुकीसाठी बंकर तयार केले.
 • गव्हाचा भुस्सा, कांडी पेंड यांचाही वयानुसार वापर.

शेणखत विक्रीतून खर्च कमी

 • मुक्तसंचार गोठा पद्धतीत वर्षाला २५ ट्रॉली दर्जेदार शेणखत मिळते.
 • परिसरातील शेतकऱ्यांकडून आगाऊ नोंदणी
 • प्रति ट्रॉली पाच हजारंप्रमाणे अतिरिक्त उत्पन्न. त्यातून बराच खर्च कमी होतो.

दुग्ध व्यवसायातील बाबी

 • १०० बाय १०० फूट मुक्त संचार गोठा
 • चारा-पाण्यासाठी १०० बाय १४ फूट आकाराचे दोन शेड्‌स
 • एकूण गायी...३२, दुभत्या १५
 • गायींची दूध देण्याची क्षमता दररोज- १८ ते ३२ लिटर
 • दैनंदिन दूध संकलन- २०० ते २२५ लिटर
 • सरासरी दर- प्रति लिटर २६ रुपये.
 • मासिक नफा- उत्पन्नाच्या ३० टक्के

मुख्य गुंतवणूक (रू.)

 • विना उसनवार, विना कर्ज, पूर्णपणे उत्पन्नातून.
 • शेड बांधकाम- ३ लाख
 • पाणी शुद्धीकरण युनिट- साडेतीन लाख
 • स्वयंचलित दूध काढणी यंत्र- १ लाख ३० हजार
 • बल्क कुलर युनिट- एक लाख

शास्त्रीय पैदास कार्यक्रम

 • सुरुवातीला दोनच गायी होत्या. चार वर्षांपासून जातिवंत कालवडीसाठी शास्त्रीय पैदास कार्यक्रम.
 • कृत्रिम रेतनासाठी स्वयंसेवी संस्था, एनडीडीबी, डेन्मार्क आदींकडील ‘इंपोर्टेड सिमेन्स’चा वापर.
 • गायींची आनुवंशिकता, पौष्टिक चारा यामुळे गुणवत्तापूर्ण दूध व उत्पादकता वाढ.
 • त्यामुळे ३० लिटरहून अधिक दूध देणाऱ्या जातिवंत गायींचे संगोपन करण्याकडे कल.
 • पुढील काळात जातिवंत कालवडी विक्रीचे नियोजन.

हिरकणी प्रकल्पामुळे उभारी

 • सन २०२० मध्ये ‘इंडियन डेअरी फार्मर्स असोसिएशन’ने ‘हिरकणी प्रकल्प’ हाती घेतला.
 • जातिवंत कालवड पैदास, दूध उत्पादकता वाढ, काटेकोर व्यवस्थापन व जातिवंत वंशावळ निर्मिती हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश. त्यात राज्यातील १०० दुग्ध व्यावसायिकांमध्ये रामदास यांची निवड.
 • डॉ. शैलेश मदने, डॉ. दिनेश भोसले, डॉ.रवींद्र नवले, डॉ.नितीन सदाशिव, डॉ.समाधान सोनवणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन.

विना कामगार नियोजन
आई मीराबाई, वडील दशरथ, पत्नी ज्योती व रामदास असे कुटुंबातील चौघेजण दुग्धव्यवसायात राबतात. एकही कामगार तैनात केलेला नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळून एकोप्याने व्यवसाय वृद्धी केली आहे.

व्यवसायाची वैशिष्ट्ये

 • बहुतांश सर्व गायींची गोठ्यातच पैदास.
 • दर महिन्याला एक गाय विण्यासाठी येईल असे नियोजन
 • वासरू मिळण्यासाठी गाय व्यायल्यानंतर अडीच ते तीन महिन्यात रेतन
 • खर्च, दूध उत्पादन-विक्री, गाय माजावर आल्याची व भरल्याची तारीख, रेतन नोंद, वासरांचा जन्म, वजन आदींच्या अचूक नोंदीसाठी ‘पॉवर गोठा अॅप’चा वापर, त्यातील सल्ल्यानुसार व्यवस्थापन
 • वर्षातून एकदा गायींच्या रक्ताच्या तपासणीसाठी पुणे येथे नमुने पाठवून रोगनिदान
 • गोठ्यात स्वच्छता, निर्जंतुकीकरण, वेळेवर शुद्ध पाणी.
 • वर्षातून एकदा तज्ज्ञांकडून खुरसाळणी
 • सर्व रोगांसाठी वेळेत तसेच ४ ते ५ महिने वयाच्या कालवडीला ब्रुसिलेसिस लसीकरण.
 • १४ महिन्यांच्या वयोमनात ३५० किलो वजन झाल्यानंतर रेतन

अभ्यासपूर्ण कामातून प्रगती
सुरुवातीच्या काळात आर्थिक पत नसल्याने कुणी मदत करीत नव्हते. मात्र पोटाला चिमटा घेऊन एकेक रुपया जोडला. आज आर्थिक शिस्त व अनुभवाच्या बळावर व्यवसाय विस्तारला. आजवर कधीही उसनवार वा कर्ज घेतलेले नाही. दोन मुलींसाठी ४० लाख रुपयांची ‘सुकन्या भविष्य निर्वाह योजना’ सुरू करून प्रति महिना ८ हजार रुपये भरतात. कष्टाला प्रतिष्ठा मिळाल्याने अनेक मान्यवर, शेतकरी व्यवसायास भेट देतात. फोनद्वारेही सखोल मार्गदर्शन करतात.

संपर्क : रामदास घोटेकर, ९१५८७८७२०८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने...
फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेतीभावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई...
सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच...पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक...
भातशेतीत राज्यात टिकवला क्रमांकसुधारित, संकरित वाणांचा वापर, सुयोग्य...
अल्पभूधारकाला आधार रेशीम शेतीचाअल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीसारखे पूरक...
महिलांना आत्मनिर्भर करणारे समृद्धी कृषी...टेळकी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील वनिता साहेबराव...
शहर, गाव शिवारांमध्ये ‘निसर्ग’चा जागरनिसर्ग वाचायला शिकविले तरच नवीन पिढी निसर्ग...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी १८ क्विंटल...उत्कृष्ट व्यवस्थापनातून सोयाबीन बीजोत्पादन शेतीचा...