agricultural news in marathi Reasons for premature maturation of Finger millet | Page 2 ||| Agrowon

उन्हाळी नाचणी अकाली पक्वतेची कारणे

पराग परीट 
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

सध्या राज्यातील काही भागांत नाचणीच्या मुख्य रोपांना फुलोरा अवस्थेत कणसे येऊ लागली आहेत. पंचवीस दिवसांहून जास्त वयाच्या रोपांची लागवड, हवामान बदलामुळे हे दिसून येत आहे.
 

सध्या राज्यातील काही भागांत नाचणीच्या मुख्य रोपांना फुलोरा अवस्थेत कणसे येऊ लागली आहेत. पंचवीस दिवसांहून जास्त वयाच्या रोपांची लागवड, हवामान बदलामुळे हे दिसून येत आहे.

नाचणीचे आहारातील महत्त्व, बाजारात वाढलेला खप आणि दुभत्या जनावरांना ऐन उन्हाळ्यात उपलब्ध होणारा हिरवा सकस चारा या हेतूने नाचणीची उन्हाळी लागवड वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राबविलेल्या उन्हाळी नाचणी उत्पादन प्रात्यक्षिकांच्या यशस्वितेनंतर या वर्षी राज्यात बऱ्याच ठिकाणी प्रयोगशील शेतकऱ्यांनी उन्हाळी नाचणीची लागवड केली. 

सध्या राज्यातील काही भागांत नाचणी रोपांची लागवड झाल्यावर अल्पावधीतच मुख्य रोपे फुलोरा अवस्थेत येत असल्याचे किंवा रोपांना कणसे येऊ लागल्याचे दिसून येत आहे. पिकाची उंची, फुटवे, पालेदार वाढ, पेरांची संख्या हे अपेक्षेप्रमाणे न येता अगदी पाच ते सात इंच उंचीची रोपेच अकाली पक्व होत असल्याचे काही भागातील चित्र आहे. उन्हाळी हंगामात नाचणी अकाली पक्व होण्यामागे काही कारणे आहेत. त्याकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना केल्यास पुढे चांगले उत्पादन मिळू शकते.

पीक व्यवस्थापनाचे मुद्दे 

  •  रोपाद्वारे उन्हाळी नाचणीची लागवड करण्यासाठी डिसेंबरच्या वीस तारखेपर्यंत बियाण्याची रोपवाटिकेत पेरणी करणे आवश्यक असते. रोपे २१ ते २५ दिवसांची असताना त्याची मुख्य शेतात लागवड झाली पाहिजे. पंचवीस दिवसांहून जास्त वयाच्या रोपांची लागवड केल्यास फुटव्यांची संख्या कमी मिळते. या रोपाला कमी कालावधीमध्ये अपेक्षेपेक्षा लवकर लहान कणीस बाहेर पडते. हेच कणीस रोपावर वाढू दिल्यास फुटव्यांची वाढ चांगली होत नाही. उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होतो. 
  •  रोप लागवड करताना मुख्य शेतात आधी पाणी देऊन शेत भिजवून घेतले असल्यास उपलब्ध ओलाव्याच्या स्थितीत रोपांची मुळे अंगठ्याच्या साह्याने साधारण अर्धा इंच खोलीपर्यंत रुतवून रोपांची मुळे मातीआड करणे अपेक्षित असते. पण जर रोपांची मुळे जास्त खोलीवर रुतवली गेली असतील, तर मात्र फुटवे फुटायला वेळ लागतो. अपेक्षित फुटव्यांची संख्या मिळत नाही आणि रोप अकाली पोटरी अवस्थेत येते. 
  •  जमिनीतून नत्राची उपलब्धता कमी झाली तर पिकाची शाखीय वाढ रोडावते, उंचीदेखील कमी राहते. 
  •  रोपवाढीच्या काळात रात्रीच्या वेळी थंडी आणि दिवसा कडक ऊन असे वातावरण जास्त काळ राहिले, तर रोपांवर वातावरणातील बदलांचा परिणाम होऊन अकाली पोसवतात. 
  •     तणनाशकांचा अतिवापर  रोपांच्या खुरट्या वाढीस कारणीभूत ठरतो. 

(टीपः कोल्हापूर भागात अकाली पक्वतेला पोसवणे हा शब्द वापरला जातो.)

उपाययोजना 

  • सध्या नाचणीच्या प्रक्षेत्रावरील दहा टक्के पीक अकाली फुलोरा किंवा कणसे भरण्याच्या अवस्थेत आले असेल तर हे नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. पण प्रमाण यापेक्षा जास्त असेल तर ज्या रोपांना सध्या कणसे आली आहेत, ती धारदार विळ्याने कापून घ्यावीत.
  • कणसे कापल्यानंतर प्रती लिटर पाण्यात पाच ग्रॅम १९:१९:१९ आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास फुटव्यांची जोमदार वाढ होण्यास सुरुवात होते.
  • जमिनीतून एकरी बारा किलो नत्र दिल्यास फुटवे वाढण्यासाठी चांगला उपयोग होतो. 
  • अधूनमधून पिकावर दशपर्णी अर्काची फवारणीदेखील उपयुक्त ठरते.

(टीप : लेखातील माहिती गेल्या दोन वर्षांत पन्हाळा तालुक्यात राबविलेल्या उन्हाळी नाचणी उत्पादनविषयक प्रयोगातील निरीक्षणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आलेल्या अनुभवांवरून दिली आहे.)

संपर्क ः पराग परीट, ९९२११९०६७१, (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, गगनबावडा, जि. कोल्हापूर)


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...