agricultural news in marathi Remedy by recognizing the symptoms of nutrient deficiency in the vineyard | Agrowon

द्राक्ष बागेत अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे ओळखून करा उपाययोजना

वासुदेव काठे, अशोक पाटील
गुरुवार, 18 नोव्हेंबर 2021

दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष वेलीत अन्नद्रव्यांचा समतोल राखणे गरजेचे असते. अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे उत्पादित द्राक्षाचा दर्जा घसरतो. याकरिता अन्नद्रव्यांची कमतरता व अधिकता यांची पाने, काडी व मण्यावरील लक्षणे ओळखून वेळीच योग्य उपाययोजना अवलंब करणे आवश्यक असते.

दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष वेलीत अन्नद्रव्यांचा समतोल राखणे गरजेचे असते. अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे उत्पादित द्राक्षाचा दर्जा घसरतो. याकरिता अन्नद्रव्यांची कमतरता व अधिकता यांची पाने, काडी व मण्यावरील लक्षणे ओळखून वेळीच योग्य उपाययोजना अवलंब करणे आवश्यक असते.

कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची एकत्रित कमतरता
कॅल्शिअम हे द्राक्ष वेलीला नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनंतर जास्त प्रमाणात लागणारे मूलद्रव्य आहे. विशेषतः फुलोऱ्यात येण्याआधी दहा ते बारा दिवसांपासून तर मण्यात पाणी शिरेपर्यंत कॅल्शिअमची गरज असते. मणी धरताना व मण्याची वाढ होताना (दोन ते सहा मि.मी.पर्यंत) कॅल्शिअमची जास्त गरज असते.

कॅल्शिअम कमतरतेचे परिणाम
कॅल्शिअम कमतरतेमुळे पानांच्या मुख्य शिरा पिवळसर होतात. मणी धरताना मणीगळ होते, मण्यात गराचे प्रमाण कमी राहते, मण्यांचा टिकाऊपणा कमी होतो, तयार होत असलेल्या मण्यांना तडे जातात.

उपाययोजना 

  • पोटॅशचे प्रमाण जास्त झाले तरीही कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते. नायट्रोजन जास्त झाले तरीही कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते. म्हणून गरजेनुसार पान देठ तपासणी करून पाहावी. कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी जमिनीतून कॅल्शिअम नायट्रेट एकरी दहा किलो दोन वेळा विभागून द्यावे. सिंगल सुपर फॉस्फेटमध्येही २१ टक्के कॅल्शिअम असतो. स्फुरद देण्यासाठी त्याचा वापर केला असल्यास कॅल्शिअमची कमतरता भरून निघते.
  • फवारणीद्वारे त्वरित कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे बाग फुलोऱ्यात येण्याअगोदर व मणी दोन ते सहा मि.मी. असताना दोन दोन फवारण्या द्याव्यात.

फेरस कमतरता 

  • छाटणीनंतर बाग फुटू लागल्यानंतर पुढील तीस दिवस फेरसची जास्त गरज बागेस असते. या काळात जमिनीत फेरस उपलब्ध नसल्यास फेरस कमतरतेची लक्षणे बागेवर दिसतात. फेरस कमतरतेमुळे पान कडेने पिवळे पडतानाच आतमध्येही पिवळेपणा वाढतो. तसेच पानाचे बाहेरील कडाकडून पिवळेपणा वाढतो, नंतर ते पांढरट पडण्यास सुरुवात होते.
  • फेरस हे हरितद्रव्यांच्या (क्लोरोफिल) निर्मितीला मदत करते. त्याची कमतरता असल्यास क्लोरोफील निर्मितीची प्रक्रिया कमी होऊन उत्पादनात घट येते.

उपाययोजना
फेरस कमतरता त्वरित भरून काढण्याकरिता चिलेटेड फेरस अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तीन ते चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. जमिनीतून फेरस सल्फेट एकरी २० किलो शेणाच्या रबडीत मिश्रण करून द्यावे.

झिंक कमतरता

  • छाटणीनंतर बाग फुटून आल्यावर पुढील महिनाभर झिंकची गरज जास्त असते. या काळात जमिनीत झिंक उपलब्ध नसल्यास झिंकची कमतरता भासते. पानामध्ये झिंकची कमतरता असल्यास पानांची अर्धी बाजू छोटी व अर्धी बाजू मोठी दिसते. तसेच पान पुढे लांब झालेले असते.
  • झिंकची कमतरतेमुळे शेंडा फारच हळू चालतो. लवकर थांबतो. दिलेल्या संजीवकाचे परिणाम कमी मिळतात. परिणामी, मण्यांची फुगवण कमी होऊन दर्जा व वजन कमी मिळते.

उपाययोजना
झिंकची कमतरता त्वरित भरून काढण्यासाठी चिलेटेड झिंक अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दोन ते तीन दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. जमिनीत झिंक सल्फेट एकरी ७ किलो या प्रमाणे सात ते दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा (एकूण २० किलो) द्यावे.

झिंक, फेरस व मॅग्नेशिअमची एकत्रित कमतरता

  • पानाच्या मधील शिरापासून पानाची अर्धी बाजू लहान व अर्धी बाजू मोठी आहे यावरून या पानात झिंकची कमतरता आहे.
  • पानाच्या कडापासून पिवळा रंग मधील बाजूकडे वाढत चालला आहे. पानांच्या कडा थोड्या प्रमाणात पांढरट व्हायला सुरुवात झाली आहे. ही फेरस कमतरतेची लक्षणे आहेत.
  • मॅग्नेशिअम कमतरता ही बाग छाटणीनंतर फुटू लागल्यापासून तर पुढील ५० दिवसांपर्यंत जास्त तीव्र प्रमाणात जाणवते. मॅग्नेशिअम कमतरतेत पानांच्या शिरा हिरव्या व शिरांच्या आतील भाग पिवळा होत जातो.

परिणाम
झिंक, फेरस कमतरतेचे परिणाम आपण आधीही पाहिले आहेत. मॅग्नेशिअम हा क्लोरोफिल निर्मितीमधील मुख्य घटक असून, त्याच्या कमतरतेमुळे क्लोरोफिलची निर्मिती कमी होते. मण्यांची फुगवण कमी होते. उत्पादनात मोठी घट येते.

उपाययोजना
झिंक व फेरस संबंधी वर सुचविल्या प्रमाणे उपाययोजना कराव्यात. मॅग्नेशिअम कमतरता भरून काढण्यास मॅग्नेशिअम सल्फेट अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे चार दिवसांचे अंतराने तीन वेळा फवारणी करावी. एकरी पंधरा किलो मॅग्नेशिअम सल्फेट दर सात दिवसांनी असे तीन वेळा द्यावे.

- वासुदेव चि. काठे, ९९२२७१९१७१
अशोक ना. पाटील, ९७६५२१९७९५

(दाभोलकर प्रयोग परिवार)


इतर कृषी सल्ला
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...
केवायसी : ओळख खातेदाराची...बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’...
घरगुती स्तरावर शेंगदाण्यातील...अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला...
कोरडवाहू क्षेत्रात किफायतशीर पीक शेवगाशेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बजमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे....
बटाटा पिकातील मूल्यवर्धन...शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते...
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...
झारखंड : लढा गरिबीसोबतच अनियमित पावसाशी...भारतीय संघराज्यातील २८ पैकी सर्वांत गरीब अशी ओळख...
कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी,...कापूस कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे....
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजनाउसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा...