agricultural news in marathi ,remidies for risiness , leaf tip burn and blindness deformities in cabbage class crops,,AGROWON,Maharashtra | Agrowon

कोबीवर्गीय पिकातील रायसीनेस, ब्लाइंडनेस, लीफ टीप बर्न विकृती
ए.टी. दौंडे, डॉ. डी. एन. धुतराज, डॉ. के. टी. आपेट
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कोबीवर्गीय पिकांत अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रांचा वापर, वेळेवर लागवड आदी बाबी चुकल्यानेच केवळ विकृती निर्माण होत नाहीत. गड्ड्यांची उशिरा काढणी, योग्य हंगामात योग्य त्या जातींचा वापर न करणे आदी बाबींमुळेही विकृती निर्माण होतात.

कोबीवर्गीय पिकांत अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रांचा वापर, वेळेवर लागवड आदी बाबी चुकल्यानेच केवळ विकृती निर्माण होत नाहीत. गड्ड्यांची उशिरा काढणी, योग्य हंगामात योग्य त्या जातींचा वापर न करणे आदी बाबींमुळेही विकृती निर्माण होतात.

ठराविक हंगामासाठी योग्य जातीचा वापर न करणे, तापमानातील चढउतार , मशागत करताना झालेल्या जखमा आदी कारणांमुळेही विकृती निर्माण होते.  
 
रायसीनेस : 
ही विकृती फ्लाॅवर आणि ब्रोकोलीवर दिसते.
कारणे : कोबी हे पीक तापमान आणि आर्द्रतेतील चढउतारास फारच संवेदनशील आहे. अस्थिर आणि प्रतिकूल तापमानाशिवाय, उच्च आर्द्रता, नत्रयुक्त खताचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केल्याने रायसिनेस होतो. गड्ड्यांची काढणी उशिरा केल्यावरदेखील ही विकृती निर्माण होते.
लक्षणे : गड्ड्यावर फुलांच्या बारीक कळ्या पसरून मखमलीसारखे आवरण दिसते. कोबीचा पृष्ठभाग एकसमान न दिसता खडबडीत व मोकळा दिसतो. त्यामुळे कोबीच्या गड्ड्याची प्रत खालावते.

उपाय:

  • लागवडीच्या ठराविक हंगामासाठी योग्य वाणांची निवड करावी.
  • तापमानात जास्त चढउतार असणाऱ्या भागात प्रतिकारक जातींची निवड करावी उदा- पूसा शुभ्रा, पुसा दीपाली.
  • कोबीच्या गड्ड्याची काढणी योग्य वेळी करावी.

ब्लाइंडनेस (वांझ रोप) :
ही विकृती कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते.
कारणे : फ्लॉवरच्या रोपाचा शेंडा विकसित होत नाही. कमी तापमान, शेंडा खुडला गेल्यास किंवा कीड-रोगांमुळे त्याला इजा झाल्यास अशा रोपाला गड्डा धरत नाही.
लक्षणे : रोपांची पाने रुंद, मोठी, गडद हिरवी आणि जाडसर राठ असतात.

उपाय:

  • लागवडीसाठी निरोगी जोमदार आणि शेंडा असलेली रोपे निवडावीत.
  • रोपांची पुनर्लागवडीच्या वेळी काळजीपूर्वक हाताळणी करावी.
  • कमी तापमान असल्यास पुनर्लागवड टाळावी. योग्य तापमान करावे.
  • वांझ रोपे शेतातून काढून टाकून त्यांचा त्वरित नायनाट करावा.  

लीफ टिपबर्न :
ही विकृती कोबी आणि फ्लॉवर या पिकांवर दिसते.
कारणे : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लीफ टिपबर्न होतो.
लक्षणे : नवीन पानाची टोके तपकिरी होतात. जमिनीमध्ये जरी कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असले तरी पाण्याचा ताण किंवा असमान पाणी यामुळे स्थानिक कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन लीफ टिपबर्न विकृती होते.

उपाय :

  • पिकास पाण्याचा ताण न पडू देता सिंचनाद्वारे समान आर्द्रता कायम राखावी.
  • कॅल्शियम क्लोराइड २५ ग्रॅम प्रति१० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • जमिनीत नत्र या अन्नद्रव्याची मात्रा देताना कॅल्शियम अमोनियम नायट्रेट या खताद्वारे द्यावी.

संपर्क :  ए.टी.दौंडे, ७५८८०८२००८
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प भाजीपाला पिके,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

फोटो गॅलरी

इतर विदेशी भाज्या
‘एक्झॉटिक’ भाजीपाला शेतीतून वेगळी वाट...सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) येथील...
कोबीवर्गीय पिकातील रायसीनेस, ब्लाइंडनेस...कोबीवर्गीय पिकांत अन्नद्रव्यांच्या संतुलित...
अॅस्परॅगस लागवड तंत्रज्ञान आपल्या देशातील शतावरी वनस्पतीच्या कुळातील...
लीक लागवड तंत्रज्ञान लीक हे कांदा कुळातील पीक आहे. याचे शास्त्रीय नाव...
ब्रुसेल्स स्प्राऊट लागवड तंत्रज्ञान ब्रुसेल्स स्प्राऊटचे शास्त्रीय नाव ‘ब्रासिका...
लेट्यूस लागवड तंत्रज्ञान लेट्युस हा युरोपियन सॅलेडचा प्रकार आहे. फिकट...
झुकिनी लागवड तंत्रज्ञान झुकिनी या परदेशी भाजीचे उगमस्थान अमेरिका असले,...
सुधारित तंत्राने करा ब्रोकोली लागवडब्रोकोली या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी मध्यम...