द्विदल पिकांसाठी रायझोबिअम जीवाणू संवर्धक

पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे.पेरणीच्या एक तास अगोदर अशी बीजप्रक्रिया करावी.साधारणत: १० ते १२ किलो बियाण्यासाठी २५० ग्रॅम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते.
द्विदल पिकांच्या जोमदार वाढीसाठी रायझोबियम जिवाणू संवर्धक फायदेशीर ठरते.
द्विदल पिकांच्या जोमदार वाढीसाठी रायझोबियम जिवाणू संवर्धक फायदेशीर ठरते.

पेरणीपूर्वी  बीजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे.पेरणीच्या एक तास अगोदर अशी बीजप्रक्रिया करावी.साधारणत: १० ते १२ किलो बियाण्यासाठी २५० ग्रॅम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते.  रब्बी पेरणीचा हंगाम जवळ आला आहे. रब्बी हंगामात हरभरा,वाटाणा लागवड केली जाते.  द्विदल पिकांच्या मुळांवरती गाठी असतात. या गाठींमध्ये  रायझोबिअम जिवाणू असतात.वातावरणामध्ये नत्राचे प्रमाण विपुल (७८ टक्के) आहे. नत्र हा सर्वच पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक घटक,पण हाच विपुल नत्र पिकांना सरळपणे घेता येत नाही. रायझोबिअम हे जिवाणू हवेतील नत्र स्थिर करून गाठी असलेल्या पिकांना उपलब्ध करून देतात. रायझोबिअम जिवाणू संवर्धक हे फक्त शेंगवर्गीय पिकासाठी वापरावे.एकाच प्रकारचे रायझोबिअम जिवाणू संवर्धक हे सर्वच शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाहीत.विशिष्ट गटाचे रायझोबिअम जिवाणू ठराविक शेंगवर्गीय द्विदल पिकांच्या मुळावर ग्रंथी (गाठी) तयार करतात. नत्र स्थिरीकरणाचे कार्य करतात. त्यामुळे या गटानुसारच द्रवरूप किंवा घनरूप रायझोबिअमचा वापर करावा. संवर्धक वापरावयाची पद्धत

  • पेरणीपूर्वी  बीजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे.पेरणीच्या एक तास अगोदर अशी बीजप्रक्रिया करावी.साधारणत: १० ते १२ किलो बियाण्यासाठी २५० ग्रॅम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. 
  • जिवाणू संवर्धक पुरेशा पाण्यामध्ये मिसळून त्याचे द्रावण तयार करावे. हे द्रावण बियाण्यावर  शिंपडून नंतर हाताने हळूवारपणे बियाण्यास अशा पद्धतीने लावावे की, जेणेकरून जिवाणू खताचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल. बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही.जिवाणू खत लावलेले बियाणे त्यानंतर स्वच्छ किलतानावर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.
  • ज्या शेतकऱ्यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया पेरणी अगोदर करावी.
  • रायझोबिअम जिवाणूसोबत स्फुरद विरघळवणारे जिवाणू आणि पालाश विरघळवणाऱ्या करणाऱ्या जिवाणूंची बीज प्रक्रिया केली तर जास्त फायदेशीर ठरते.
  • रायझोबिअम जिवाणू खतांचा गट     या पिकासाठी उपयुक्त 
    चवळी      चवळी, भुईमूग, तूर, मूग, उडीद, वाल, मटकी, गवार, ताग, धैचा, कुलथी, इ.
    हरभरा गट   हरभरा
    वाटाणा गट   वाटाणा, मसूर.
    घेवडा गट   फ्रेंचबीन, लाईमा बीन, श्रावण घेवडा व इतर घेवडे 
     सोयाबीन गट सोयाबीन
    अल्फा-अल्फा गट मेथी ,लसूणघास
    बरसीम गट बरसीम.

      रायझोबिअम जिवाणू संवर्धकाचे फायदे 

  • बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते.
  • जिवाणू संवर्धकाच्या वापरामुळे पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्याने रोपावस्थेपासूनच  पिकाची जोमदार वाढ होते.
  • पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
  • जमिनीतील कर्ब : नत्राचे प्रमाण समतोल राखून जमिनीचा पोत सुधारतो.
  • रासायनिक नत्र खताची २० ते २५ टक्के बचत होते.
  • द्विदल पिकांचे उत्पन्न १५ ते २० टक्क्यांनी वाढते.
  • दुबार पिकास चांगला फायदा होतो.
  • - श्रीमती. एस. आर. सालके,  ९०४९६४६७६३ - डॉ.श्रद्धा वाबळे,  ७८८८०३९२२४ - डॉ. एस. एन. हसबनीस,  ७५८८०३४०६८ (कृषी महाविद्यालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com