वाढत्या तापमानाचा भात उत्पादनावर होतोय विपरीत परिणाम

उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठात भातावरील उष्ण वातावरणाच्या परिणामांचा दीर्घकालीन अभ्यास केला गेला.दर चार ते पाच वर्षांनी तापमानात वाढ होत असताना भाताच्या उत्पादनामध्ये होणारी घट किंवा वाढ यांचा परिणाम तपासण्यात आला. वातावरणातील परिणामांविषयी सातत्याने बोलले जात असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेताशी संबंध जोडण्यात या संशोधनातून यश आले आहे.
A long-term study has concluded that rice production is declining due to rising temperatures.
A long-term study has concluded that rice production is declining due to rising temperatures.

उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील कृषी आणि स्रोत अर्थशास्त्राचे प्रो. रोडेरिक रिजेसस व सहकाऱ्यांनी भातावरील उष्ण वातावरणाच्या परिणामांचा दीर्घकालीन अभ्यास केला आहे. त्यांनी मध्य लुझॉन येथील १९६६ ते २०१६ या काळातील तापमानाची माहिती आणि भाताच्या उत्पादनाची माहिती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. दर चार ते पाच वर्षांनी तापमानात वाढ होत असताना भाताच्या उत्पादनामध्ये होणारी घट किंवा वाढ यांचा परिणाम तपासण्यात आला. वातावरणातील परिणामांविषयी सातत्याने बोलले जात असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेताशी संबंध जोडण्यात या संशोधनातून यश आले आहे. फिलिपिन्स येथील उष्ण वातावरण आणि भाताचे उत्पादन यातील संबंधाचा दीर्घकालीन अभ्यास करण्यात आला आहे. वाढत्या तापमानाचा विपरीत परिणाम भाताच्या उत्पादनावर पडत असल्याचे दिसून आले आहे. वातावरणातील उष्णतेसारख्या ताणाला सहनशील अशा पैदास केलेल्या खास भात जातींचे उत्पादन हे पारंपरिक आणि नव्याने विकसित अन्य संकरित जातींच्या तुलनेमध्ये अधिक मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या अभ्यासामध्ये खास उष्णतेला सहनशील जातींच्या उत्पादनामध्येही काही प्रमाणात घट होत असल्याचे आढळले आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. फिलिपिन्स हा देश भात उत्पादनामध्ये जागतिक पातळीवर पहिल्या दहा देशामध्ये असूनही येथील भाताची मागणी मोठी आहे. परिणामी, फिलिपिन्स हा पहिल्या दहा भात आयातदार देशांच्या यादीमध्येही आहे. उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील कृषी आणि स्रोत अर्थशास्त्राचे प्रो. रोडेरिक रिजेसस व सहकाऱ्यांनी भातावरील उष्ण वातावरणाच्या परिणामांचा दीर्घकालीन अभ्यास केला आहे. त्यांनी मध्य लुझॉन येथील १९६६ ते २०१६ या काळातील तापमानाची माहिती आणि भाताच्या उत्पादनाची माहिती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. दर चार ते पाच वर्षांनी तापमानात वाढ होत असताना भाताच्या उत्पादनामध्ये होणारी घट किंवा वाढ यांचा परिणाम तपासण्यात आला. वातावरणातील परिणामांविषयी सातत्याने बोलले जात असले तरी त्याचा प्रत्यक्ष शेताशी संबंध जोडण्यात या संशोधनातून यश आले आहे. हरितक्रांतीनंतर अधिक उत्पादनक्षम सुधारित आणि संकरित जाती विकसित करण्यात आल्या. जगभर त्याचा फायदाही उत्पादनवाढीसाठी झाला. पुढे उत्पादन क्षमतेसोबतच कीड, रोग प्रतिकारकता आणि वातावरणातील अजैविक ताणांना सहनशील जातींच्या विकासाला चालना मिळाली. मात्र ज्या वेगाने तापमानामध्ये वाढ होत चालली आहे, त्या आव्हानाला खास त्यासाठी विकसित केलेल्या नसूनही काही सुधारित बुटक्या आणि अर्धबुटक्या जातींनी काही प्रमाणात चांगला प्रतिसाद दिला. त्याविषयी माहिती देताना रिजेसस यांनी सांगितले, की एकंदरीत विचार केला असता दोन परिणाम दिसून येतात.

  • शेताच्या पातळीवर उत्पादनामध्ये फरक पडत असल्याचे दिसून येते. पर्यावरणातील ताणांसाठी खास विकसित केलेल्या सहनशील जातीही अपेक्षित तितका प्रतिसाद देत नसल्याचे आढळले. विशेषतः जुन्या व पारंपरिक जातींशी या जातींची संख्याशास्त्रीय पद्धतीने तुलना केली असता नव्या बाबी पुढे येतात.
  • भाताच्या पैदास कार्यक्रमांचे परिणाम त्यांच्या पूर्ण क्षमतेइतके मिळालेले नसावेत. किंवा नव्या जातीच्या विकासामध्ये संभाव्य क्षमतांइतक्या पातळीवर पोचणे शक्य होऊ शकते.
  • या बाबींकडे हवे अधिक लक्ष 

  • या संशोधनामध्ये अन्य भात उत्पादक देश - व्हिएतनाम येथील स्थितीही अंतर्भूत होते. कारण येथेही फिलिपिन्स प्रमाणेच नव्या विविध जातींचा विकास आणि पैदास करण्यात आली आहे. नव्या पीक जातींच्या विकासामध्ये कार्यरत संस्थांना या नव्या विश्लेषणाचा नक्कीच फायदा होऊ शकेल. वाढत असलेल्या तापमानाला सहनशील जातींच्या विकासासाठी आवश्यक ते संशोधन झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक होणे गरजेचे आहे. त्यासाठी धोरणकर्त्यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे, असे रिजेसस यांनी सांगितले.
  • पुढील टप्प्यांमध्ये पिकाच्या उत्पादनावर परिणाम करणाऱ्या विविध कृषी पद्धतींचाही अभ्यास करण्यात येणार आहे. उदा. आच्छादन पिके, बिगरहंगामी लागवड किंवा लागवडीच्या वेळेमध्ये तापमानानुसार काही बदल करणे इ.
  • पीक उत्पादनाप्रमाणेच जमिनीची सुपीकता टिकून राहण्याकडेही अधिक लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com