शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे निविष्ठा विक्री

नामांकित कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांकडे महामंडळाची राज्य कृषी, निविष्ठा वितरक म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. सदर संस्था समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एमसीडीसीने जून २०२० पासून रासायनिक खताचा पुरवठा सहकारी संस्था , शेतकरी उत्पादन कंपन्या, शेतकरी उत्पादक गट यांना पुरवठा करण्यास सुरुवात केलेली आहे.
Guidance to farmers on fertilizer use.
Guidance to farmers on fertilizer use.

नामांकित कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांकडे महामंडळाची राज्य कृषी, निविष्ठा वितरक म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. सदर संस्था समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एमसीडीसीने जून २०२० पासून रासायनिक  खताचा पुरवठा सहकारी संस्था , शेतकरी उत्पादन कंपन्या, शेतकरी उत्पादक गट यांना पुरवठा करण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या, पुणे ही शासनाची अंगीकृत कंपनी असून, महामंडळाचे माध्यमातून राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांचे क्षमता बांधणी, व्यवसाय वृद्धी व उत्पन्नात वाढ होण्यासाठी विविध योजना / उपक्रम व प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येते. महाराष्ट्रात एकूण ४००० शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी   झाल्या असून, ग्रामीण भागात सुमारे २३,६५४ पैकी आर्थिकदृष्टया सक्षम ८५०० विविध  कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यरत आहेत. सुमारे १,२५,००० नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट आहेत. सध्या महाराष्ट्रात या संस्था रासायनिक खते, कीडनाशके, बियाणे, शेतीचे  अवजारे याचा व्यवसाय फार कमी प्रमाणात करतात. सदर संस्थांची क्षमता बांधणी करून त्यांचे उत्पन्नात वाढ करण्यासाठी योजनांची आखणी करताना शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून नियोजन करण्यात येत आहे. सदर संस्थेचे उत्पन्नात वृद्धी करणे म्हणजेच पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ. यामुळे महामंडळामार्फत सदर संस्थांचे सभासद असलेल्या शेतकरी यांचे मार्फत उत्पादित शेतीमालाचे विक्री व्यवस्थापन करण्यासाठी थेट शेतीमाल विक्री व्यवस्थापन उपक्रम, कॉपशॉप, इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत.  कंपनीसाठी व्यवसाय उपक्रम 

  • शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाचे विक्री व्यवस्थापन करत असताना शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चात बचत करण्याबाबत महामंडळ स्तरावर विविध योजनांची आखणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना माती परीक्षणाच्या आधारे माफक दरात खते उपलब्ध झाल्यास त्यांचे उत्पादन खर्चात निश्‍चित स्वरूपात बचत होऊ शकते व त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते. 
  • महामंडळामार्फत राज्यातील विविध कार्यकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांच्यासाठी “माती परीक्षणाच्या आधारे कृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापन” उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी खरीप हंगामात आपल्या स्वतःच्या जमिनीतील माती नमुन्याचे परीक्षण करून घ्यावे. त्यानुसार खत किंवा अन्नद्रव्यांचे  व्यवस्थापन करावे. 
  • माती परीक्षण अहवालाच्या आधारे नियोजित पिकाकरिता आवश्यक खतांचे नियोजन हे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे, कृषी विभागाच्या सल्ल्याने करावे. 
  • उद्देश

  • महामंडळामार्फत स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या भागधारक शेतकऱ्यांच्या शेतात माती परीक्षण व पान देठ परीक्षण करून त्याद्वारे प्रत्यक्ष खताची मात्रा ठरवून उत्पादन खर्च कमी करणे व निविष्ठाच्या खर्चात बचत करणे. 
  • सर्व सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गटांना राष्ट्रीयस्तराच्या कंपन्यांकडून वितरक म्हणून नेमणूक होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या  कृषी निविष्ठांचा पुरवठा योग्य वेळी व योग्य दरात हंगाम सुरू करण्यापूर्वी करणे. 
  • एमसीडीसीतर्फे सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक कंपन्या, बचतगट, यांना खते बियाणे, औषधे यांचा परवाना काढण्यासाठी प्रशिक्षण देणे व प्रत्यक्ष परवाना काढून देण्यास सहकार्य करणे.
  • कृषी निविष्ठा उपक्रम  नामांकित कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांकडे महामंडळाची राज्य कृषी, निविष्ठा वितरक म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. सदर संस्था समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एमसीडीसीने जून २०२० पासून रासायनिक  खताचा पुरवठा सहकारी संस्था , शेतकरी उत्पादन कंपन्या, शेतकरी उत्पादक गट यांना पुरवठा करण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त  शेतकऱ्यांना खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे यांचा पुरवठा करण्यासाठी ज्या संस्था किंवा कंपन्या एमसीडीसीला संपर्क करतील  त्या संस्थांना संपूर्ण मार्गदर्शन करून व्यवसायात वाढ मदत करण्यात येईल. सहभागी होण्यास पात्र संस्था 

  • राज्यातील विविध कार्यकारी संस्था. 
  • नवीन नोंदणी होणाऱ्या व अस्तित्वात असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या.
  • शेतकरी गट, इतर संस्था
  • खरेदी विक्री संघ
  • कृषी निविष्ठा (खते, कीडनाशके व बियाणे) परवाना मार्गदर्शक सूचना 

  • गुगल या सर्च इंजिनमध्ये जाऊन e-parwana या संकेतस्थळाला भेट द्यावी.  
  • त्यानंतर खते/ कीडनाशके / बियाणे डीलर यापैकी जो आवश्यक आहे तो  पर्याय निवडण्यात यावा.
  • अर्जदाराची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर User ID आणि Password तयार करण्यात यावा. त्यानंतर submit हे बटण दाबावे. 
  • कृषी निविष्ठा फी e-Grass या चलनाद्वारे भरण्यासाठी पर्याय ः
  • खते : रिटेल ः ४५० रु.  होलसेल ः  २,२५० रु. कीडनाशके :  रिटेल ः७,५०० रु. (१०० रु. प्रति कीटकनाशक) बियाणे : रिटेल :  १,००० रु. - विकास खाडे,  ९८३४३२३९४९ (विभागीय व्यवस्थापक, कृषी निविष्ठा विभाग, महाराष्ट्र सहकार  विकास महामंडळ मर्या, शिवाजीनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com