agricultural news in marathi Samrudhi Krishi Sakhi Mandal which makes women self reliant | Agrowon

महिलांना आत्मनिर्भर करणारे समृद्धी कृषी सखी मंडळ

कृष्णा जोमेगावकर
रविवार, 6 जून 2021

टेळकी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील वनिता साहेबराव मोरे यांच्या पुढाकारातून २०१२ मध्ये गावातील अकरा महिलांनी समृद्धी कृषी सखी महिला मंडळाची स्थापना केली. या महिलांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत डाळ मिल उद्योग, हळद, मिरची पावडर निर्मितीतून अर्थकारण सक्षम केले. 

टेळकी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील वनिता साहेबराव मोरे यांच्या पुढाकारातून २०१२ मध्ये गावातील अकरा महिलांनी समृद्धी कृषी सखी महिला मंडळाची स्थापना केली. या महिलांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत डाळ मिल उद्योग, हळद, मिरची पावडर निर्मितीतून अर्थकारण सक्षम केले. याचबरोबरीने विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेती विकासाला नवी दिशा दिली. 

ग्रामीण भागातील महिलांचे अर्थकारण सुधारून त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी टेळकी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील वनिता साहेबराव मोरे यांच्या पुढाकारातून २०१२ मध्ये गावातील अकरा महिलांनी समृद्धी कृषी सखी महिला मंडळाची स्थापना केली. प्रारंभी मासिक बचतीतून वैयक्तिक अडचणीसह शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठाची सोय झाली. यानंतर दर महिन्याला होणाऱ्या चर्चेतून विविध उपक्रमांना महिला गटाने टप्प्याटप्प्याने सुरुवात केली. सध्या गटामध्ये वनिता साहेबराव मोरे (अध्यक्षा), पार्वतीबाई दिंगबर मोरे(सचिव), कमलबाई लक्ष्मण मोरे, शांताबाई मारोती कानगुले, गिरिजा संभाजी पवार, सरस्वती सुभाष हंबर्डे, अल्का अनिल मोरे, शंकुतला दत्तराव मोरे, सुलोचना उत्तमराव मोरे आणि शंकुतला मारोती मोरे या महिला कार्यरत आहेत.

डाळ मिल उद्योगाला सुरुवात 
प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करण्याच्या उद्देशाने महिला गटाने २०१३ मध्ये मिनी डाळ मिलची सुरुवात केली. यासाठी सोनखेड येथील भारतीय स्टेट बॅंकेकडून दोन लाखांचे कर्ज मिळाले. बाजारात विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये वेगळेपण जपण्यासाठी गटाने सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या उडीद, मूग, तूर, हरभरा डाळनिर्मितीला सुरुवात केली. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने उत्पादित हळद व मिरचीवर देखील प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. सेंद्रिय शेतीमालाची मागणी लक्षात घेऊन स्वतंत्र विक्रीचे नियोजन या गटाने केले आहे. गटातील महिला स्वतःच्या शेतीमध्ये हळद, तूर, उडीद, मूग, हरभरा, मोहरी, तीळ, मिरची तसेच विविध ‍भाजीपाल्यांचे उत्पादन घेतात. या प्रयत्नांतून गटातील महिलांना उत्पन्नाचे नवे साधन तयार झाले आहे. महिला एकत्र आल्यानंतर झालेला बदल पाहण्यासाठी परिसरातील महिला गट टेळकी गावातील शेतीला भेट देत असतात.

डाळ, हळदीला वाढती मागणी
गटातील महिला स्वतःच्या शेतात विविध कडधान्य पिकांचे उत्पादन घेतात. गटाच्या माध्यमातून डाळनिर्मिती करून परिसरातील विविध गावांत विक्री केली जाते. प्रक्रिया उद्योगामुळे शेतीमालास चांगला दर मिळू लागला. तसेच ग्राहकांना चांगल्या प्रतीची डाळ मिळते. गेल्या वर्षी तूरडाळ १२० रुपये, मूगडाळ १५० रुपये, हरभराडाळ ८० रुपये किलो दराने विक्री झाली. ग्राहकांच्या मागणीनुसार अर्धा आणि एक किलो पॅकिंग केले जाते. गटातर्फे शेतकऱ्यांना देखील डाळ तयार करून दिली जाते. गटाने गेल्या वर्षी डाळ विक्रीतून सत्तर हजारांची उलाढाल केली.

गटातील महिलांनी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन हळदीच्या सेलम जातीच्या लागवडीस सुरुवात केली. गटातर्फे हळकुंडाची विक्री न करता हळद पावडरनिर्मिती केली जाते. हळदीचे अर्धा, एक किलो पॅकिंग करून वेगवेगळ्या धान्य महोत्सवात विक्री केली जाते. गटातील महिला हळदीच्या बरोबरीने गावरान मिरचीची लागवड करतात. मिरची पावडर २५० रुपये आणि मिरची २०० रुपये किलो या दराने विक्री होते. प्रक्रिया उद्योगातून महिलांनी आर्थिक नफा वाढविला आहे. 

वनिता मोरे या दरवर्षी एक एकर शेतीमध्ये हळद लागवड करतात. हळकुंडे विकण्यापेक्षा त्यांनी पावडर निर्मितीकरून विक्रीला सुरुवात केली. बाजारपेठेत प्रति किलो २०० रुपये दराने हळद पावडरची विक्री होते. हळद पावडर विक्रीतून गेल्यावर्षी त्यांना दीड लाखाचे उत्पन्न मिळते. वनिता मोरे यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण केले आहे. 

निंबोळी अर्क, जिवामृत निर्मिती
महिला गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांचे उत्पादन केले जाते. गटातील  महिला निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जिवामृताची निर्मिती करतात. याचा पीक उत्पादनासाठी चांगला परिणाम दिसून आला 
आहे. 

नवी दिल्लीमध्ये उत्पादनांची विक्री
सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण केल्यानंतर वनिता मोरे यांनी दिल्ली येथील धान्य महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवामध्ये सेंद्रिय हळद पावडर, तूर, उडीद, मूग, हरभरा डाळ, मोहरी, तीळ तसेच मिरची पावडरची विक्री केली. याठिकाणी १४ दिवसांत विक्रीतून ८५ हजारांची उलाढाल केली.

पुरस्कारांनी सन्मान 
शेती आणि प्रक्रिया उद्योगातील प्रगतीची दखल घेत वनिता मोरे यांना केंद्र शासनातर्फे महिला किसान अॅवॉर्ड, याचबरोबरीने ऊर्जा सखी पुरस्कार, कृषिरत्न तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत गौरविण्यात आले आहे.

धान्य महोत्सवात सहभाग
नांदेड येथे दरवर्षी कृषी विभागातर्फे धान्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये महिला मंडळातील सदस्या सहभागी होऊन सेंद्रिय पद्धतीने उत्पादित विविध शेतीमालाची विक्री करतात. यासोबत माळेगाव यात्रा, सगरोळी कृषी तंत्रज्ञान महोत्सव, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही गटातर्फे शेतीमालाची विक्री केली जाते. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषी विभागाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था उभी केली होती. यामध्ये महिला गटातील सदस्यांनी  हळद, मिरची, विविध डाळींची विक्री केली. यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. पडवळ यांनी महिला गटातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले होते.

मार्गदर्शन शिबिरात सहभाग
गटातील महिला शेतीमधील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विविध मार्गदर्शक शिबिरात सहभागी होतात. गटातील महिलांनी माती परीक्षण, संतुलित खतांचा वापर, उताराला आडवी पेरणी, अवर्षण काळात पिकांचे व्यवस्थापन या चर्चासत्रामध्ये सहभाग घेऊन प्रत्यक्ष शेती व्यवस्थापनात या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यासोबतच गटातील महिला हिरवळीचे खत, गांडूळ खत, जिवाणू संवर्धकांचा देखील वापर करतात. 

- वनिता मोरे,  ९२८४६२९९८५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
मानवलोक... ग्रामीण पुनर्रचनेसाठी...शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रियांसाठी कल्याणकारी...
पदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय...पुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी)...
बहुमजली, शाश्‍वत, नैसर्गिक शेती पद्धती...मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने...
फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेतीभावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई...
सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...