agricultural news in marathi Sarpadoh is an enterprising village for sanitation, health, environmental development | Page 2 ||| Agrowon

स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण विकास असे उपक्रमशील गाव सरपडोह

सुदर्शन सुतार
शुक्रवार, 4 जून 2021

स्वच्छता, आरोग्य, पर्यावरणासह जलसंधारण अशा विविध आघाड्यांवर सरपडोह गावाने (जि. सोलापूर) शाश्‍वत विकास साधला आहे. ग्रामस्थांच्या एकीतून विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.  

स्वच्छता, आरोग्य, पर्यावरणासह जलसंधारण अशा विविध आघाड्यांवर सरपडोह गावाने (जि. सोलापूर) शाश्‍वत विकास साधला आहे. ग्रामस्थांच्या एकीतून विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. उपक्रमशील, आदर्श गाव असा लौकिक मिळवला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सरपडोह गाव (ता. करमाळा) हे सुमारे १९७ कुटुंबसंख्या आणि जेमतेम एक हजार लोकसंख्येचे गाव आहे. ग्रामपंचायत, निवडणूक, राजकारण आदी उद्दिष्टे न ठेवता गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास गावाने ठेवला आहे. या एकीतूनच जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन, स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. व्यसनमुक्ती, प्लॅस्टिकमुक्ती यासारखे सामाजिक उपक्रम प्रत्यक्ष कृतीत आणले.

माजी सरपंच सौ. आश्‍विनी घोगरे, मंदाकिनी भिताडे, किसन खरात, रमेश यादव आदींचे सहकार्य त्यामध्ये मोलाचे ठरले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, जिल्हा परिषदेचे करमाळा तालुका संपर्क अधिकारी सचिन सोनवणे यांचेही सहकार्य, मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्याचे सरपंच वाळके सांगतात.

पायाभूत सुविधांवर भर
सरपडोह गावाने सिमेंट रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छतागृह आदी पायाभूत सुविधांवर भर दिला. प्रमुख चौकात चार ठिकाणी हायमास्ट दिवे लावले. सांडपाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी त्या त्या घराजवळ शोषखड्डे घेण्यात आले. गटारमुक्त आणि शोषखड्डेयुक्त गावाचा सन्मानही आता मिळाला आहे. पुरेशी जागा असलेल्यांनी परसबागा घेतल्या आहेत.

स्वच्छतेसाठी पुढाकार
दोन वर्षांपूर्वी गाव आदर्श करण्याच्या ध्यासातून गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याचे पहिले पाऊल ग्रामस्थांनी उचलले. आज स्वच्छ भारत मिशनच्या (ग्रामीण) माध्यमातून पाणी व स्वच्छतेबाबतीत सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने सरपडोह ग्रामपंचायत आदर्श ठरली आहे. गावातील सर्व कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये तसेच सार्वजनिक शौचालयही उभारले आहे. गावातील रस्ते स्वच्छ सुंदर झाले. त्यासाठीचा निर्मलग्राम पुरस्कारही मिळाला.

जलसंवर्धन व संरक्षण
‘पाणी फाउंडेशन संस्थेच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून गावओढ्याचे खोली व सरळीकरण झाले. माथ्यावर सीसीटी, डीपसीसीटी, कंपार्टमेंट बंडिंग, लूज बोल्डर, कंटूर बांध, इनलेट- आउटलेट, विहीर आणि बोअर पुनर्भरण आदी कामे झाली. त्यातून १३ कोटी २५ लाख लिटर साठवणक्षमता तयार झाली. विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळेच तूर, बाजरी, ज्वारी अशा पारंपरिक पिकांव्यतिरिक्त केळी, ऊस, डाळिंब, पेरू आदी फळबागांचे क्षेत्र वाढते आहे. पाणी फाउंडेशनच्या पुरस्कारावरही मोहोर उमटवली. गावकऱ्यांचा उत्साह चांगलाच वाढला. त्यामुळेच विहीर, बोअर पुनर्भरणासह पाण्याच्या वापराबाबत जनजागृती झाली. जलसंवर्धन व संरक्षणाला प्राधान्य देण्यात आले.

वृक्षलागवडीची चळवळ
ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाला फळझाडांच्या पाच रोपांचे वाटप केले. ही झाडे चांगली जोपासली जात आहेत. वाढदिवसाचे झाड, स्मरणार्थ झाड, आनंदाचे, लेकीचे, आईचे, लग्नाच्या वाढदिवसाचे झाड असे उपक्रम राबवण्यात आले. सन २०१८ मध्ये ‘पाणी फाउंडेशन’कडून मिळालेल्या बक्षीस रकमेतून झाडांना पाणी देण्यासाठी टँकरची खरेदी करण्यात आली आहे. वृक्षलागवडीच्या या चळवळीतून
प्रत्येक घर आणि गावातील प्रमुख चौकात डेरेदार झाडे दिसतात.

विविध पुरस्कारांवर मोहोर

 • सलग १५ वर्षांपासून स्पर्धेत गावाचा सहभाग
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात २००८-०९ ते २०११-१२ सलग ४ वर्षे तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार
 • शाहू फुले आंबेडकर दलित वस्ती विकास सुधारणा अभियान- सन २००८-०९ व २०१२-१३ तालुकास्तरीय प्रथम.
 • २०१२-१३- जिल्हास्तरीय प्रथम.
 • साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धा अभियान- २००८-०९- तालुकास्तरीय प्रथम.
 • स्व.दिगंबरराव बागलजी प्रतिष्ठान करमाळा- आदर्श गाव
 • २०१०-१२ पर्यावरण विकास रत्न पुरस्कार
 • २०१०, २०११-१२ व २०१२-१३- सलग तीन वर्षे- पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना यशस्वी राबविली.
 • जिल्हा परिषद- २०१७-१८- शोषखड्डेयुक्त व गटारमुक्त- जिल्हास्तरीय.

गावातील उपक्रम

 • ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाइन, सुसज्ज सभागृह
 • मालमत्तेची पुरुषासह महिलांच्या नावाने संयुक्तरीत्या नोंदणी
 • सुसज्ज वाचनालय
 • कलापथक, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पोस्टर, वॉल पेंटिंग, घडीपत्रिका, स्टिकर, गुड मॉर्निंग पथक, कलापथक यांच्या माध्यमातून पाणी व स्वच्छतेबाबत जागृती
 • गाव १०० टक्के हागणदारीमुक्त.
 • ठिकठिकाणी कचराकुंड्या, प्लॅस्टिक मुक्त, कापडी पिशव्यांचा वापर
 • १०० टक्के घनकचरा व्यवस्थापन, १०९ कंपोस्ट खड्डे
 • सलग पाच वर्षे ‘ग्रीन कार्ड’. अजूनपर्यंत साथीचे रोग नाहीत.
 • ग्रामपंचायत, जि.प.शाळा व अंगणवाडीची ‘आयएसओ’कडे वाटचाल

प्रतिक्रिया
बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करून गावविकासात त्यांचा सहभाग वाढवणार आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याला प्राधान्य देत ग्रामस्वच्छतेत सातत्य ठेवले आहे.
-सौ. मालन पांडुरंग वाळके, सरपंच

भविष्यात आठवणींचे झाड ही ग्रामपंचायतीची योजना सर्व युवक मित्रांना सोबत घेऊन प्रभावी राबवणार आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनचे वाढलेले महत्त्व पाहता माणशी पाच झाडे लावण्याचे नियोजन आहे.
-नाथराव रंदवे, उपसरपंच

निरोगी, स्वच्छ, सुंदर, सर्वांगीण शाश्‍वत विकास हेच आमचे ध्येय कायम राहील.
-महेश काळे, ग्रामसेवक, सरपडोह

युवकांसाठी आधुनिक व्यायामशाळा, सुसज्ज मैदान, स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फळबाग मार्गदर्शन यासाठी प्रयत्नशील आहोत.
-अरुण चौगुले, ग्रामस्थ

संपर्क ः महेश काळे, ९७६३०६९६९१
ग्रामसेवक


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
एकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षमरेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी...
गुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी...खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम...
पडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर)...
गांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मितीसातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय...
साहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्राचे...सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने...
आदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत...नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात...
नांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू...नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी...
प्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्शमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता...
पीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला)...
कुक्कुटपालन, भाजीपाला लागवडीतून तयार...लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील आश्‍विनी...
तुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली...बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित...
डाळी, बेसनपीठ निर्मितीतून ७०...हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन...
गोरव्हाच्या ग्रामस्थांनी घडवली...अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) या...
कांकरेड गोपालनासह मूल्यवर्धित उत्पादनेहीनाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांनी...
बारमाही उत्पन्न देणारी व्यावसायिक शेतीवनोली (जि..जळगाव) येथील युवराज चौधरी यांनी...
डाळिंब, भाजीपाला पिकात केले यांत्रिकीकरणआटपाडी (जि.. सांगली) येथील किशोरकुमार देशमुख...
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...