अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
यशोगाथा
साठे यांचे लोकप्रिय पेढे
लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील जयवंत साठे यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसाय चालवताना खवा, पेढानिर्मिती सुरू केली आहे. माहूर हे जागृत देवीचे संस्थान. येथून जवळ असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांकडून पेढ्याला मागणी मिळवण्यात साठे यशस्वी झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील जयवंत साठे यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसाय चालवताना खवा, पेढानिर्मिती सुरू केली आहे. माहूर हे जागृत देवीचे संस्थान. येथून जवळ असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांकडून पेढ्याला मागणी मिळवण्यात साठे यशस्वी झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील जयवंत साठे कुटुंबीयांचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे. जयवंत यांचे वय आज ५७ वर्षे आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी देखील या व्यवसायात सातत्य राखले.
लोणबेहळपासून मराठवाड्यातील माहूर हे जागृत देवीचे संस्थान अवघ्या २२ किलोमीटरवर आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिंकाची संख्या मोठी आहे. जयवंत याच भागातील हॉटेल व्यवसायकांना दुधाचा पुरवठा करायचे. सुरुवातीला त्यांच्याकडे १५ म्हशी होत्या. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली. तब्बल २७ वर्षे त्यांनी बसद्वारे व्यावसायिकांना दूध पुरवले. त्यातील उत्पन्नातून दुचाकी खरेदी करून दूध पुरवठ्याचे काम सुरू ठेवले.
व्यवसायाचा विस्तार
दूध विक्रीतून रोज खेळता पैसा हाती राहायचा. चाऱ्यासाठी पैसा वेगळा काढत उर्वरित पैसे कुटुंबीयांच्या भविष्यासाठी जोडण्यात येत होते. त्यातूनच पुढे चार एकर शेती खरेदी केली. त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. आज जनावरांची संख्या ४० पर्यंत आहे. त्यात देशी व मुऱ्हा म्हशी आहेत.
दररोज सरासरी ८५ ते ९० लिटर दूध संकलन होते. मात्र दुधाची विक्री करण्याऐवजी श्रीखंड, पेढा, खवा, तूप असे उपपदार्थ तयार करण्यावर भर दिला आहे. पेढा व खवा यांच्या निर्मितीवर मुख्य भर आहे. पेढा ३२० रुपये, तर खवा ४०० रुपये किलो दराने विक्री होतो. दररोज १५ किलोपर्यंत पेढा, श्रीखंड दोन किलोपर्यंत, तर महिन्याला २५ किलो तुपाची विक्री होते.
माहूर रस्त्यावर विक्री केंद्र
साठे यांनी पदार्थांच्या विक्रीसाठी नागपूर-तुळजापूर महामार्गावर ‘आउटलेट’ सुरू केले आहे. दत्त पेढा भंडार नावाने त्यांचा हा व्यवसाय आहे. नागपूर मार्गावरील भाविक माहूरला जाताना या ठिकाणी हमखास थांबत प्रसाद म्हणून पेढ्यांची खरेदी करतात. दर पौर्णिमेला भाविकांची मोठी मांदियाळी माहूरला राहते. त्या वेळी पेढ्याला खूप मागणी राहते. कोरोनामुळे मागील वर्षापासून व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. पर्यायाने उत्पन्नावर प्रभाव पडला. मध्यंतरी रस्ता रुंदीकरणात गोठा हटवण्यात आला. मात्र येत्या काळात त्यास गती देणार असल्याचे साठे यांनी सांगितले.
संपर्क : जयवंत साठे ९५२७८५८८५८
- 1 of 94
- ››