agricultural news in marathi Selection of purebred milch buffaloes | Page 2 ||| Agrowon

निवड जातिवंत दुधाळ म्हशींची

डॉ. सागर जाधव
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

दूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना कोणताही आजार नसल्याची खात्री करून घ्यावी. दुग्धोत्पादनासाठी जातिवंत म्हशींची निवड करावी.
 

दूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना कोणताही आजार नसल्याची खात्री करून घ्यावी. दुग्धोत्पादनासाठी जातिवंत म्हशींची निवड करावी.

म्हैसपालन यशस्वी होण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्‍यक असते. म्हशींचे संगोपन प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केले जाते. त्यासाठी जातिवंत म्हशींची निवड करणे गरजेचे असते. म्हशींची खरेदी करताना स्थानिक परिस्थितीनुसार योग्य जातीची निवड, वय, वेताची संख्या, दूध देण्याची क्षमता आणि आरोग्य या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

म्हशींच्या जाती 

नागपुरी म्हैस 
आढळ 
  मध्य आणि दक्षिण भारतात एलिचपुरी किंवा नागपुरी जातीच्या म्हशी आढळतात.
  नागपूर, वर्धा आणि वऱ्हाडामधील इतर जिल्हे तसेच आंध्र प्रदेशातील काही भाग.

वैशिष्ट्ये 

 •   रंग काळा, काही वेळा तोंडावर पांढरे ठसे असतात.
 •   काही प्रकारात शिंगे मागे खांद्यापर्यंत असतात.
 •   दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते.

दूध उत्पादन 

 •   सरासरी ५ ते ७ लिटर प्रति दिन दूध उत्पादन.
 •   १००० लिटर प्रति वेत.

पंढरपुरी म्हैस 
आढळ 

सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव.

शारीरिक वैशिष्ट्ये 

 •   आकाराने मध्यम पण अतिशय काटक.
 •   लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे वैशिष्ट्ये.
 •   वजनः साधारण ४०० किलो. रेड्यांचे वजन ५०० किलो.
 •   पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात. ३५ ते ४० महिन्यांत पहिल्यांदा वितात.
 •   मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य.
 •   एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध उत्पादन.

मुऱ्हा म्हैस 

 • रंग गडद काळा असून शिंगे डोक्यावर एकड्यासारखी गुंडाळलेली असतात. 
 • शरीरबांधा मोठा, भारदस्त आणि कणखर असतो. 
 • ही भारतातील अधिक दूध देणारी जात असून दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण अधिक असते.
 • एका वेतामध्ये दुधाचे प्रमाण ३ हजार ते साडेतीन हजार लिटर इतके असते. 
 • या म्हशींचे मूळस्थान हरियाना राज्यातील मुख्यत्वे रोहतक व दिल्ली तसेच उत्तर प्रदेशमधील मीरत.
 • भारतात स्थानिक गावठी जातींच्या म्हशींची सुधारणा करण्यासाठी मुऱ्हा रेड्यांचा कृत्रिम रेतनासाठी वापर केला जातो. 
 • या जातींच्या रेड्यांची रेतनासाठी अधिक मागणी आहे.

जाफराबादी म्हैस 
आढळ 

 • गुजरात राज्यातील अमरेली, भावनगर, जामनगर, जुनागड, पोरबंदर आणि राजकोट.  
 • या जातीच्या म्हशी आकाराने आणि वजनाने मोठ्या असतात. 
 • अंगावरील कातडी ढिली आणि लोंबलेली असते. 
 • शिंगे मुळात जाड आणि चपटी, मुळापासून पाठीमागे आणि खालच्या बाजूने वळलेली असतात.
 • या जातीच्या म्हैस एका वेतामध्ये १८०० ते २५०० लिटर दूध देते. दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाणे ६ ते ७ टक्के असते. 

- डॉ. सागर जाधव,  ९००४३६१७८४
(पशूपोषण शास्त्र विभाग, बारामती ॲग्रो लिमिटेड,बारामती,जि.पुणे)


इतर कृषिपूरक
जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार...किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध...
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...