सूक्ष्म हिरव्या भाज्यांवर सुरू आहे संशोधन

गेल्या काही वर्षांमध्ये सूक्ष्म हिरव्या वनस्पती (मायक्रोग्रीन्स) यांची लोकप्रियता वाढत आहे. हे मायक्रोग्रीन्स पोषकतेने भरपूर असून, त्यात आरोग्यवर्धक अॅण्टिऑक्सिडेंट संयुगाचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पोषकतेची गरज भागविण्याची क्षमता या छोट्या हिरव्या वनस्पतींमध्ये असल्याचे मत पेनसिल्वानिया राज्य विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली.
Small but mighty: Microgreens go from trendy vegetables to functional food
Small but mighty: Microgreens go from trendy vegetables to functional food

गेल्या काही वर्षांमध्ये सूक्ष्म हिरव्या वनस्पती (मायक्रोग्रीन्स) यांची लोकप्रियता वाढत आहे. हे मायक्रोग्रीन्स पोषकतेने भरपूर असून, त्यात आरोग्यवर्धक अॅण्टिऑक्सिडेंट संयुगाचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पोषकतेची गरज भागविण्याची क्षमता या छोट्या हिरव्या वनस्पतींमध्ये असल्याचे मत पेनसिल्वानिया राज्य विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली. आजवर आहारामध्येही पालेभाज्यांना आरोग्यवर्धक मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नवा ट्रेंड येत असून, सूक्ष्म हिरव्या वनस्पती (मायक्रोग्रीन्स) यांची लोकप्रियता वाढत आहे. हे मायक्रोग्रीन्स पोषकतेने भरपूर असून, त्यात आरोग्यवर्धक अॅण्टिऑक्सिडेंट संयुगाचे प्रमाण अधिक आहे. भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या पोषकतेची गरज भागविण्याची क्षमता या छोट्या हिरव्या वनस्पतींमध्ये असल्याचे मत पेनसिल्वानिया राज्य विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले. त्यामुळे या भाज्यांची वाढ घरगुती पद्धतीने करण्यासाठी संशोधनाचे प्रमाण वाढले आहे. सध्या ‘आपत्तिमय जागतिक घटनांना सामोरे जाताना अन्नाची लवचिकता’ या विषयावर एक प्रकल्प सुरू असून, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट संशोधन करत आहे. घर, कार्यालये येथील कमी जागेमध्ये कृत्रिम प्रकाश किंवा प्रकाशाच्या अभावामध्ये मातीरहित स्थितीमध्ये वाढणाऱ्या वनस्पतींसंदर्भात अभ्यास केला जात आहे. सध्याच्या कोविडच्या महामारीमुळे अन्न पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाल्यामुळे लोकांचे झालेले हाल लक्षात घेता अशा प्रकल्पाची आवश्यकता वाढली होती. पेन स्टेट येथील कृषिशास्त्र महाविद्यालयातील सहायक प्रा. फ्रान्सेस्को डी गोईआ यांनी सांगितले, की मायक्रोग्रीन्स म्हणजे सूक्ष्म किंवा लहान हिरव्या वनस्पती. अन्नाची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी त्यांची वाढ व वापर करणे शक्य आहे. भविष्यामध्ये कोणत्याही अडचणीच्या स्थितीमध्ये त्यांची वाढ करून आपली पोषकतेची गरज भागविणे सर्वसामान्यांना शक्य होईल. कारण या वनस्पतींमध्ये रंग, आकार, पोत, चव यांची विविधता आणि पोषकतेचे प्रमाण प्रचंड आहे. या वनस्पतीमध्ये खाद्य हिरव्या वनस्पती, औषधी वनस्पती, वनौषधी आणि जंगली वनस्पती यांचा समावेश आहे.

  • वाढीचा कालावधी कमी असलेल्या, वेगाने वाढणाऱ्या वनस्पतींचा या मध्ये विचार करण्यात येत आहे.
  • या वनस्पतीसाठी खते किंवा अन्नद्रव्येही अल्प प्रमाणात लागतील. यातील कामे किंवा व्यवस्थापनही कमीत कमी असेल.
  • आहारातील सर्व घटकांची पूर्तता किंवा एकाच विशिष्ट सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत.
  • तीव्र किंवा आव्हानात्मक वातावरणामध्ये वाढण्याची क्षमता हा गुणधर्म तपासला जात आहे.
  • व्यक्ती आपल्या स्वयंपाकघरातील उपलब्ध साधनांद्वारे त्यांची वाढ करू शकला पाहिजे. जास्तीत जास्त त्यांची बिया, वाढवण्यासाठी ट्रे आणि वाढीचे माध्यम (पीट, कॉमन पीट आणि पर्लाईट माध्यम) यांची खरेदीवर काम भागले पाहिजे.
  • अशा वैशिष्ट्यामुळे अवकाश संशोधन संस्था (नासा आणि युरोपीय) ताजे अन्न व पोषकतेच्या पूर्ततेसाठी मायक्रोग्रीन्सकडे लक्ष देत आहे. सर्वसामान्य लोकांसाठी या घटकांचे बिया, माध्यम व अन्य गरजेच्या बाबी यांचे एक कीट बनवता येईल. ते त्यांना कधीही वापरता येईल. ज्यांना अन्नद्रव्यांची कमतरता भासत आहे, अशा लोकांसाठी त्यांचे वाटपही करता येईल. लेमेसोस (सायप्रस) येथे झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमामध्ये आपल्या संशोधनाचे निष्कर्ष डी गोईया यांनी मांडले. ते अॅक्टा हॉर्टिकल्चर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मायक्रोग्रीन आणि मोड आणणे यातील फरक

    मायक्रोग्रीन मोड
    ७ ते १४ दिवस ३ ते ५ दिवस
    हायड्रोपोनिक्स किंवा मातीमध्ये वाढ हायड्रोपोनिक्स
    याला पाने येतात यांना केवळ मोड किंवा मुळे फुटतात.
    यातील मुळे शक्यतो खाल्ली जात नाहीत. हे मोडसह खाणेच फायदेशीर असते.
    याला कमी अधिक प्रकाशाची गरज असते प्रकाशाची आवश्यकता नाही.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com