सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्र

सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर योग्यरीत्या केल्यास बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते. तसेच उगवणशक्ती वाढवण्यास मदत होते.
Soybean harvesting, threshing, storage techniques
Soybean harvesting, threshing, storage techniques

सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर योग्यरीत्या केल्यास बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते. तसेच उगवणशक्ती वाढवण्यास मदत होते. महाराष्ट्रात दरवर्षी सोयाबीन क्षेत्र आणि उत्पादन वाढत असले तरी उत्पादकता मात्र कमी होत चालली आहे. सोयाबीन उत्पादकता कमी होण्यामागे काढणी आणि काढणीपश्‍चात अयोग्य पद्धतीने हाताळणी या बाबी कारणीभूत आहेत. त्यामुळे सोयाबीनची वेळेवर काढणी, योग्य माध्यमावर मळणी करून योग्य पद्धतीने साठवण करणे आवश्‍यक आहे. सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर योग्यरीत्या केल्यास बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते. तसेच उगवणशक्ती वाढवण्यास मदत होते. काढणी 

  • सोयाबीन पीक पेरणीनंतर साधारणतः ९५ ते १०५ दिवसांत काढणीसाठी तयार होते. पीक परिपक्व झाल्यानंतर पिकाची काढणी लवकर करणे फार महत्त्वाचे आहे. योग्य वेळी काढणी न केल्यास शेंगा तडकून उत्पादनात १५ ते २० टक्के घट येते.
  • पीक परिपक्व झाल्यानंतर ८५ ते ९० टक्के पाने देठासहित गळून पडतात. शेंगांचा रंग पिवळा ते काळसर होऊ लागतो. सोयाबीनचे उत्पादन आणि प्रत चांगली राखण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन पिकाची काढणी करावी. कारण, बियाणाला पक्वतेनंतर किचिंत ओलावा लागला तरी बियाण्याची उगवणक्षमता कमी होते.
  • बियाण्यातील ओलावा १४ ते १५ टक्के असताना कापणीला सुरवात करावी. वेळेवर कापणी केल्यास मळणीमध्ये बियांचे नुकसान होत नाही.
  • पिकाची काढणी धारदार कोयत्याने जमिनीलगत कापून करावी. झाडे उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी. काढणीनंतर सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करून ठेवू नये. यामुळे त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते.
  • काढणी केलेले पीक उन्हामध्ये चांगले वाळवावे. मळणीसाठी उशीर होणार असेल तरच वाळलेल्या सोयाबीनची गंजी करून ठेवता येईल.
  • मळणी 

  • मळणी यंत्राने मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्के पेक्षा कमी नसावी. मळणी यंत्राच्या फेऱ्याची गती प्रति मिनीट ४०० ते ५०० फेरे इतकी ठेवावी.
  • बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्याची गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट ठेवावी.
  • मळणीवेळी अधूनमधून बियाण्यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून त्याची डाळ होणार नाही. डाळ होण्याचे प्रमाण जास्त असल्यास वेग कमी करावा.
  • साठवण 

  • मळणीनंतर बियाणांची योग्य ठिकाणी साठवण करणे गरजेचे आहे. योग्य रीतीने साठवण न केल्यास उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.
  • साठवण करण्यापूर्वी बियाणे २ ते ३ दिवस उन्हामध्ये चांगले वाळवावे.
  • साठवण करतेवेळी बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के पेक्षा जास्त असू नये.
  • शक्यतो साठवणुकीसाठी पत्र्याच्या कणगीची वापर करावा.
  • पोत्यामध्ये साठवण केल्यास, पोते जमिनीवर सरळ उभे न ठेवता फळीवर ठेवावे. प्रत्येक पोते ८० किलोपर्यंत भरलेले असावे. पोती एकावर एक रचताना ४ पेक्षा पोते एकावर एक ठेवू नयेत.
  • - संजय बडे, ७८८८२९७८५९ (दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com