agricultural news in marathi Soybean harvesting, threshing, storage techniques | Page 2 ||| Agrowon

सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्र

संजय बडे, गणेश घुगे, पूजा सूर्यवंशी
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर योग्यरीत्या केल्यास बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते. तसेच उगवणशक्ती वाढवण्यास मदत होते.

सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर योग्यरीत्या केल्यास बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते. तसेच उगवणशक्ती वाढवण्यास मदत होते.

महाराष्ट्रात दरवर्षी सोयाबीन क्षेत्र आणि उत्पादन वाढत असले तरी उत्पादकता मात्र कमी होत चालली आहे. सोयाबीन उत्पादकता कमी होण्यामागे काढणी आणि काढणीपश्‍चात अयोग्य पद्धतीने हाताळणी या बाबी कारणीभूत आहेत. त्यामुळे सोयाबीनची वेळेवर काढणी, योग्य माध्यमावर मळणी करून योग्य पद्धतीने साठवण करणे आवश्‍यक आहे. सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर योग्यरीत्या केल्यास बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते. तसेच उगवणशक्ती वाढवण्यास मदत होते.

काढणी 

 • सोयाबीन पीक पेरणीनंतर साधारणतः ९५ ते १०५ दिवसांत काढणीसाठी तयार होते. पीक परिपक्व झाल्यानंतर पिकाची काढणी लवकर करणे फार महत्त्वाचे आहे. योग्य वेळी काढणी न केल्यास शेंगा तडकून उत्पादनात १५ ते २० टक्के घट येते.
 • पीक परिपक्व झाल्यानंतर ८५ ते ९० टक्के पाने देठासहित गळून पडतात. शेंगांचा रंग पिवळा ते काळसर होऊ लागतो. सोयाबीनचे उत्पादन आणि प्रत चांगली राखण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन पिकाची काढणी करावी. कारण, बियाणाला पक्वतेनंतर किचिंत ओलावा लागला तरी बियाण्याची उगवणक्षमता कमी होते.
 • बियाण्यातील ओलावा १४ ते १५ टक्के असताना कापणीला सुरवात करावी. वेळेवर कापणी केल्यास मळणीमध्ये बियांचे नुकसान होत नाही.
 • पिकाची काढणी धारदार कोयत्याने जमिनीलगत कापून करावी. झाडे उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी. काढणीनंतर सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करून ठेवू नये. यामुळे त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते.
 • काढणी केलेले पीक उन्हामध्ये चांगले वाळवावे. मळणीसाठी उशीर होणार असेल तरच वाळलेल्या सोयाबीनची गंजी करून ठेवता येईल.

मळणी 

 • मळणी यंत्राने मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्के पेक्षा कमी नसावी. मळणी यंत्राच्या फेऱ्याची गती प्रति मिनीट ४०० ते ५०० फेरे इतकी ठेवावी.
 • बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्याची गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट ठेवावी.
 • मळणीवेळी अधूनमधून बियाण्यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून त्याची डाळ होणार नाही. डाळ होण्याचे प्रमाण जास्त असल्यास वेग कमी करावा.

साठवण 

 • मळणीनंतर बियाणांची योग्य ठिकाणी साठवण करणे गरजेचे आहे. योग्य रीतीने साठवण न केल्यास उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.
 • साठवण करण्यापूर्वी बियाणे २ ते ३ दिवस उन्हामध्ये चांगले वाळवावे.
 • साठवण करतेवेळी बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के पेक्षा जास्त असू नये.
 • शक्यतो साठवणुकीसाठी पत्र्याच्या कणगीची वापर करावा.
 • पोत्यामध्ये साठवण केल्यास, पोते जमिनीवर सरळ उभे न ठेवता फळीवर ठेवावे. प्रत्येक पोते ८० किलोपर्यंत भरलेले असावे. पोती एकावर एक रचताना ४ पेक्षा पोते एकावर एक ठेवू नयेत.

- संजय बडे, ७८८८२९७८५९
(दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)


इतर टेक्नोवन
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारीखरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
आवळा प्रक्रियेसाठी उपयुक्त उपकरणेआवळा फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असून...
बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त...ज्या बिया दीर्घकाल सुप्तावस्थेत राहतात, त्यांच्या...
पाण्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण...ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्श...
कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे...गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलांची मोठी...
नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (...नारळाचे झाड हे सावकाश वाढणारे असून, त्याची पैदास...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल ...विनामशागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये...
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जागोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी...
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...