कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण उंचावण्यासाठी रणनीती

ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास होण्याकरिता उत्तम विक्री व्यवस्था आणि वाहतुकीच्या सुविधा असलेली बाजारपेठ असणे आवश्‍यक आहे. योग्य विपणन व्यवस्थांची उभारणी केल्यास ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल.
Poultry farming in rural areas can be boosted by setting up proper infrastructure.
Poultry farming in rural areas can be boosted by setting up proper infrastructure.

ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास होण्याकरिता उत्तम विक्री व्यवस्था आणि वाहतुकीच्या सुविधा असलेली बाजारपेठ असणे आवश्‍यक आहे. योग्य विपणन व्यवस्थांची उभारणी केल्यास ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल. ग्रामीण भागामध्ये उत्पादित होणाऱ्या  कोंबडीच्या अंडी आणि मांसाची विक्री गावामध्येच केली जाते. किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांचा वापर केला जातो. खेड्यांमधील कुक्कुटपालन करणारे शेतकरी संघटित नसल्यामुळे अंडी आणि मांसाच्या विक्रीसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या खेड्यातील अंडी आणि मांस उत्पादन हे स्थानिक दुकानदार खरेदी करतात. काही ठिकाणी शहरी भागातील व्यापारी खेड्यातील स्थानिक विक्रेत्यांचा वापर अंडी आणि कोंबड्या खरेदी करण्यासाठी करतात. आणि पुढे त्यांची चढ्या दराने शहरामध्ये विक्री करतात. याचा ग्रामीण भागातील कुक्कुट उत्पादकांना फायदा होत नाही.  ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास होण्याकरिता चांगली विक्री व्यवस्था आणि वाहतुकीच्या सुविधा असलेली बाजारपेठ असणे आवश्‍यक आहे. ग्रामीण ग्राहक शहरी भागांच्या तुलनेत कमी एकसंध आहेत. तसेच शहरी बाजारपेठेच्या तुलनेत ग्रामीण बाजारपेठांची प्रगती तुलनेने कमी झालेली दिसते. यासाठी खेड्यांचा भौगोलिक विस्तार आणि वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा कारणीभूत आहेत. योग्य विपणन व्यवस्थांची उभारणी केल्यास ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल. विपणनातील अडचणी  शहरी आणि निम-शहरी भागांमध्ये उत्पादनांच्या विक्रीसाठी जाहिरात, वितरण, विक्री व्यवस्था यांवर भर दिला जातो. ग्रामीण भागांमध्ये या सुविधांची पूर्तता करण्यासाठी विविध अडचणी येतात. 

  • बाजार विकासासाठी सुरुवातीला लागणारा उच्च खर्च.
  • पुरेशी पत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे लहान किरकोळ विक्रेते मालाचा साठा करण्यास असमर्थ.
  • जनसंवाद आणि जाहिरात समस्या.
  • बँकिंग आणि पत समस्या. 
  • व्यवसाय आणि विक्री व्यवस्थापन अनुभवाची कमतरता. बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याबाबतचे अपुरे ज्ञान.
  • पायाभूत सुविधांची कमतरता. विखुरलेले आणि कमी लोकवस्तीचे बाजार.
  • शहरी बाजारपेठ आणि ग्रामीण ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक अंतर.
  • नियमित विपणनासाठीची रणनीती 

  • ग्रामीण बाजारपेठेचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे शहरी बाजाराच्या तुलनेत ग्रामीण बाजाराला दुय्यम स्थान देणे चुकीचे आहे. शहरी बाजारपेठांचा विस्तार करण्याऐवजी ग्रामीण बाजारपेठांच्या विकासावर भर दिला पाहिजे.
  • ग्रामीण लोकांमध्ये विपणन संस्कृती निर्माण करण्यासाठी योजनांच्या आखणी करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मदत घेता येईल. या तरुणांना उत्पादनांच्या विक्रीसंबंधी प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.
  • शहरी भागापासून ग्रामीण बाजारपेठेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे.
  • ग्रामीण भागामध्ये खरेदी आणि विक्री व्यवस्थेमधील संवाद निर्माण करणे.
  • ग्रामीण लोकांना विपणन व्यवस्थेबाबत योग्य मार्गदर्शन दिले गेले पाहिजे. त्यामुळे त्यांना बाजाराचा कल समजेल. 
  • बँकिंग क्षेत्रांकडून सुशिक्षित तरुणांना पतपुरवठा होणे आवश्‍यक आहे. 
  • बाजार विकासासाठी योजनांची आखणी करून अंमलबजावणी केली गेली पाहिजे.
  • शेतकऱ्यांनी एकत्रित आणून शेतकरी गटांची स्थापना झाली पाहिजे. उत्पादित अंडी आणि मांसाची गटामार्फत एकत्रितपणे शहरी बाजारपेठेत विक्री करणे फायदेशीर ठरू शकते.
  • - डॉ. एम. आर. वडे,  ८६००६ २६४०० (सहायक प्राध्यापक, कुक्कुट संशोधन केंद्र, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com