agricultural news in marathi Strategies to uplift rural economy from poultry farming | Page 2 ||| Agrowon

कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण उंचावण्यासाठी रणनीती

डॉ. एम. आर. वडे
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास होण्याकरिता उत्तम विक्री व्यवस्था आणि वाहतुकीच्या सुविधा असलेली बाजारपेठ असणे आवश्‍यक आहे. योग्य विपणन व्यवस्थांची उभारणी केल्यास ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल.
 

ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास होण्याकरिता उत्तम विक्री व्यवस्था आणि वाहतुकीच्या सुविधा असलेली बाजारपेठ असणे आवश्‍यक आहे. योग्य विपणन व्यवस्थांची उभारणी केल्यास ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल.

ग्रामीण भागामध्ये उत्पादित होणाऱ्या  कोंबडीच्या अंडी आणि मांसाची विक्री गावामध्येच केली जाते. किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांचा वापर केला जातो. खेड्यांमधील कुक्कुटपालन करणारे शेतकरी संघटित नसल्यामुळे अंडी आणि मांसाच्या विक्रीसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या खेड्यातील अंडी आणि मांस उत्पादन हे स्थानिक दुकानदार खरेदी करतात. काही ठिकाणी शहरी भागातील व्यापारी खेड्यातील स्थानिक विक्रेत्यांचा वापर अंडी आणि कोंबड्या खरेदी करण्यासाठी करतात. आणि पुढे त्यांची चढ्या दराने शहरामध्ये विक्री करतात. याचा ग्रामीण भागातील कुक्कुट उत्पादकांना फायदा होत नाही. 

ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास होण्याकरिता चांगली विक्री व्यवस्था आणि वाहतुकीच्या सुविधा असलेली बाजारपेठ असणे आवश्‍यक आहे. ग्रामीण ग्राहक शहरी भागांच्या तुलनेत कमी एकसंध आहेत. तसेच शहरी बाजारपेठेच्या तुलनेत ग्रामीण बाजारपेठांची प्रगती तुलनेने कमी झालेली दिसते. यासाठी खेड्यांचा भौगोलिक विस्तार आणि वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा कारणीभूत आहेत. योग्य विपणन व्यवस्थांची उभारणी केल्यास ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल.

विपणनातील अडचणी 
शहरी आणि निम-शहरी भागांमध्ये उत्पादनांच्या विक्रीसाठी जाहिरात, वितरण, विक्री व्यवस्था यांवर भर दिला जातो. ग्रामीण भागांमध्ये या सुविधांची पूर्तता करण्यासाठी विविध अडचणी येतात. 

 • बाजार विकासासाठी सुरुवातीला लागणारा उच्च खर्च.
 • पुरेशी पत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे लहान किरकोळ विक्रेते मालाचा साठा करण्यास असमर्थ.
 • जनसंवाद आणि जाहिरात समस्या.
 • बँकिंग आणि पत समस्या. 
 • व्यवसाय आणि विक्री व्यवस्थापन अनुभवाची कमतरता. बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याबाबतचे अपुरे ज्ञान.
 • पायाभूत सुविधांची कमतरता. विखुरलेले आणि कमी लोकवस्तीचे बाजार.
 • शहरी बाजारपेठ आणि ग्रामीण ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक अंतर.

नियमित विपणनासाठीची रणनीती 

 • ग्रामीण बाजारपेठेचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे शहरी बाजाराच्या तुलनेत ग्रामीण बाजाराला दुय्यम स्थान देणे चुकीचे आहे. शहरी बाजारपेठांचा विस्तार करण्याऐवजी ग्रामीण बाजारपेठांच्या विकासावर भर दिला पाहिजे.
 • ग्रामीण लोकांमध्ये विपणन संस्कृती निर्माण करण्यासाठी योजनांच्या आखणी करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मदत घेता येईल. या तरुणांना उत्पादनांच्या विक्रीसंबंधी प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.
 • शहरी भागापासून ग्रामीण बाजारपेठेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे.
 • ग्रामीण भागामध्ये खरेदी आणि विक्री व्यवस्थेमधील संवाद निर्माण करणे.
 • ग्रामीण लोकांना विपणन व्यवस्थेबाबत योग्य मार्गदर्शन दिले गेले पाहिजे. त्यामुळे त्यांना बाजाराचा कल समजेल. 
 • बँकिंग क्षेत्रांकडून सुशिक्षित तरुणांना पतपुरवठा होणे आवश्‍यक आहे. 
 • बाजार विकासासाठी योजनांची आखणी करून अंमलबजावणी केली गेली पाहिजे.
 • शेतकऱ्यांनी एकत्रित आणून शेतकरी गटांची स्थापना झाली पाहिजे. उत्पादित अंडी आणि मांसाची गटामार्फत एकत्रितपणे शहरी बाजारपेठेत विक्री करणे फायदेशीर ठरू शकते.

- डॉ. एम. आर. वडे,  ८६००६ २६४००
(सहायक प्राध्यापक, कुक्कुट संशोधन केंद्र, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)


इतर कृषिपूरक
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...
शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापरकृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून...
योग्य पशुधनाची निवड महत्त्वाचीदुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...