agricultural news in marathi Strengthening of agricultural production companies | Agrowon

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण

मिलिंद आकरे, सचिन सरसमकर
शुक्रवार, 5 मार्च 2021

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरणासाठी पॉपी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रामध्ये २६ जिल्ह्यांमध्ये ३० शेतकरी उत्पादक कंपन्यांची अंमलबजावणी सुरु आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरणासाठी पॉपी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रामध्ये २६ जिल्ह्यांमध्ये ३० शेतकरी उत्पादक कंपन्यांची अंमलबजावणी सुरु आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरणासाठी पॉपी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रामध्ये २६ जिल्ह्यांमध्ये ३० शेतकरी उत्पादक कंपन्यांची अंमलबजावणी सुरु आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये कृषी व्यवसाय वृद्धी कक्ष म्हणून जबाबदारी पाहत आहे. जसे की, शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी, त्याचे रजिस्टर ऑफ कंपनीकडे वैधानिक प्रतिपूर्ती (ROC Compliance) करून देणे, शासकीय चलना व्यतिरिक्त महामंडळाच्या माध्यमातून २५,००० रुपये आकारून सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी पश्चात करावयाच्या वैधानिक प्रतिपूर्ती करताना वेगवेगळ्या सेवा पुरवठादार यांच्याकडून भरमसाट रक्कम आकारण्यात येते. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सुरवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच याबाबत महामंडळामार्फत सेवापुरवठादार यांची ईटेंडर द्वारे नेमणूक करून माफक दरामध्ये सेवा उपलब्ध आहेत. 

विविध उपक्रमांना चालना

 • नवीन नोंदणी झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीला विविध कृषी व कृषी आधारित उद्योगांसाठी लाभाच्या योजना प्राप्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रकल्प अहवाल तयार करून देण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पोकरा, पीएमएफएमई, एमआयडीएच, एसएफएसी इत्यादी योजना तसेच वित्तीय साहाय्य घेण्यासाठी साहाय्य महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
 • कृषी व कृषी संलग्न शेतकरी उत्पादक कंपनीच्या लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून मार्गदर्शन व पाठपुरावा केला जात आहे. या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीस प्राथमिक प्रक्रिया उद्योग उभा करून व्यवसायाची सुरवात करून सभासंदाना सेवा देण्यात मदत होत आहे. 
 • शेतकरी उत्पादक कंपनीसाठी योजनेचा लाभ घेत असताना बँक फायनान्सची अट असते म्हणून महामंडळामार्फत बनविण्यात येणारे प्रकल्प अहवाल हे क्रेडीट लिंकेज व योजनेचा लाभ मिळविण्यासाठी उपयोगी होतात. याचा फायदा शेतकरी उत्पादक कंपनीस होत आहे.
 • बँक फायनान्स घेताना टर्म लोन व खेळते भागभांडवल याबाबत शेतकरी उत्पादक कंपनीचा व्यवसाय आराखडा तयार करून योजनेचा लाभ घेण्याबाबत मदत करण्यात येते. 
 • शेतकरी उत्पादक कंपनीचा व्यवसाय आराखडा हा महत्त्वपूर्ण बाब असून किमान पाच वर्षासाठी तयार करून दिला जातो. बँक लोन मिळवून देण्याच्या दृष्टीने महामंडळाच्यावतीने पाठपुरावा केला जातो. 
 • शेतकरी उत्पादक कंपनीची विविध उत्पादने  विक्री करण्याच्या दृष्टीने पुणे येथे गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देऊन विविध शेतकरी उत्पादक कंपनी आणि  महिला गटांची उत्पादने पुणे येथे उपलब्ध करून देण्याबाबत मदत केली जाते. जेणेकरून विविध उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होतात. शेतकरी उत्पादक कंपनी,शेतकरी गट, महिला बचत गट यांना विक्रीद्वारे उत्पन्नाचे दालन उपलब्ध होत आहे. याचे पूर्ण नियोजन शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे केले जाते. यासाठी पुणे शहरामध्ये पायलट प्रकल्प १० ठिकाणी सुरु करण्यात आले आहेत. 
 • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून कोवीड लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पुणे, मुंबई व ठाणे येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये भाजीपाला पुरवठ्याचे नियोजन यशस्वीरीत्या राबविण्यात आले.  संपूर्ण कालावधीमध्ये महामंडळाची यंत्रणा सतत कार्यरत होती. 
 • शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रायव्हेट खरेदीदार यांचेसोबत शेतीमाल विक्रीबाबत कार्यवाही करण्याच्या दृष्टीने खरेदीदार व विक्रेता संमेलन आयोजन करण्यात येत आहे. तसेच याबाबत   शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी व खरेदीदार यांचे मध्ये सामंजस्य करार होऊन याबाबत पुढील दिशा ठरविली जात आहे. तसेच नाफेडमार्फत किमान आधारभूत किंमतीच्या धान्यखरेदी योजनेमध्ये प्रकल्पातील शेतकरी उत्पादक कंपनी यांना सहभागी होणेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. 
 • शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत विविध उत्पादने विक्रीसाठी प्रामुख्याने थेट विक्री  तसेच आठवडी बाजार व इतर माध्यमातून विक्रीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जात आहेत. 
 • शेतकरी उत्पादक कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक परवाने जसे की, थेट पणन, प्रदूषण महामंडळ, अन्न सुरक्षा, कृषी निविष्ठा  इत्यादी परवाने प्राप्त करून देण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. 
 • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने देशपातळीवरील खत पुरवठादार (इफको, क्रिबको, आरसीएफ) राष्ट्रीयकृत पुरवठादार म्हणून नोंदणी केली आहे. शेतकरी उत्पादक कंपनी यांना रास्त दरामध्ये खते जागा पोहोच देण्यात येत आहेत. निविष्ठा विक्रीमुळे शेतकरी उत्पादक कंपनी यांना व सभासदांना आर्थिक फायदा होत असून खते रास्त दरामध्ये उपलब्ध होत आहेत. याबाबत महामंडळाशी संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. 
 • शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक, सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची क्षमताबांधणी होण्याच्या दृष्टीने गरजेनुसार व शेतकरी उत्पादक कंपनीच्या मागणीवर आधारित निवासी प्रशिक्षण कार्यक्रम महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. यामध्ये संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रशिक्षण, मार्केट लिंकेज, वित्तीय व्यवस्थापन, व्यवसाय आराखडे, कृषी पर्यटन इत्यादी बाबीवर शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन वर्षभर केले जात आहेत. याबाबत जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी यांनी याचा लाभ घ्यावा.
 • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे नाबार्ड पॉपी प्रकल्पांतर्गत कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांचे बळकटीकरणासाठी रिसोर्स सपोर्ट एजन्सी म्हणून कार्य करीत आहेत. 

- गणेश जगदाळे,  ७५८८०७०४७३
( व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे)


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात एक लाख १७ हजार टन...परभणी ः ‘‘जिल्ह्याला यंदाच्या (२०२१) खरीप...
मोहोळमध्ये खरेदी, विक्रीदारांना कोरोना...मोहोळ, जि. सोलापूर ः ‘‘मोहोळ येथील दुय्यम निबंधक...
अडीच लाख क्विंटल चंद्रपुरात धान खरेदीचंद्रपूर : शासनाने या वर्षी हमीभावा सोबतच सातशे...
‘पोकरा’चे सुमारे १४ कोटींचे अनुदान...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील वसमत तालुक्यात...
नाशिकमध्ये लोकसहभागातून 'कोरोनामुक्त...नाशिक : ‘‘कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला...
दर्जेदार शिवभोजन थाळीचे वितरण करा : ...मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्या...
भंडाऱ्यातील ६३ प्रकल्प गाठत आहेत तळभंडारा : सरासरी बरसलेला मॉन्सून, त्यानंतर अवकाळी...
खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळतीबाजारभोगाव, जि. कोल्हापूर : जांभळी नदीवरील...
शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला प्रतिसाद...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत...बुलडाणा ः कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी...
पुणे विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच...
सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी...पातुर्डा, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळवण्यासाठी...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
कृषी विभागात कोरोनामुळे आत्तापर्यंत २८...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या काही...
‘पंदेकृवि’ने दीक्षान्त सोहळा पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने...
कुर्जा खरेदी केंद्रावर धान मोजणीविना...भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक...
कापूस पिकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ः...अकोला ः देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख...
कृषी विभागातील पाच पुरस्कार्थींचे कौतुक पुणे : राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे...
विमा उतरवा, अन्यथा बाजार समित्या बंद...पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व...
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...