agricultural news in marathi success story ‘Online’ sale of meat products | Agrowon

मांस उत्पादनांची ‘ऑनलाइन’ विक्री

डॉ. टी. एस. मोटे
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

औरंगाबाद शहरातील आकाश म्हस्के व आदित्य कीर्तने या दोन तरुण अभियंत्यांनी कल्पकता व हिंमत दाखवून ऑनलाइन पद्धतीने त्यांनी मांसयुक्त उत्पादनांची विक्री व ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली. चिकन, मांस अशा विविध प्रकारांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. 
 

कोरोना संकटाच्या कालावधीत अनेकांच्या नोकरीवर गदा आली. औरंगाबाद शहरातील आकाश म्हस्के व आदित्य कीर्तने या दोन तरुण अभियंत्यांवरही हीच वेळ आली. मात्र कल्पकता व हिंमत दाखवून ऑनलाइन पद्धतीने त्यांनी मांसयुक्त उत्पादनांची विक्री व ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली. चिकन, मांस अशा विविध प्रकारांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. 

मागील वर्षीपासून सारे जग कोरोनाच्या संकटाशी सामना करते आहे. अनेकांना या काळात आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. औरंगाबाद येथील ‘बीई मेकॅनिकल’ असलेल्या आकाश म्हस्के व ‘बीई सिव्हिल’ विषयाचे शिक्षण घेतलेल्या आदित्य कीर्तने या युवकांच्या नोकरीवर देखील गदा आली. मात्र खचून न जाता त्यांनी स्वत:चा ‘स्टार्ट अप’ सुरू करण्याचे ठरवले. कोरोना काळात मांस खाण्यापासून अनेक ग्राहक दूर जाऊ लागले होते. त्या काळात मांसाला म्हणावा तसा उठाव नव्हता. अशा परिस्थितीत स्वच्छतेचे सर्व निकष पाळून पॅकिंगद्वारे मत्स्योत्पादने उपलब्ध केली, तर ग्राहक त्याचा स्वीकार करतील ही कल्पना दोघा युवकांच्या मनात आली. त्यासाठी ‘मार्केट सर्व्हे’ केला. 

व्यवसायाची पायाभरणी 
मांसाची निवड, त्याची गुणवत्ता व स्वच्छता याबाबतची मानके याबाबतीत दोघांनाही जास्त माहिती नव्हती. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद येथील डॉ. अनिता जिंतूरकर व डॉ. किशोर झाडे यांचे मार्गदर्शन कामी आले. या व्यवसायातील बारकावे त्यातून माहीत झाले. पॅकिंगसाठी लागणारे व्हॅक्यूम मशिन व साठवणुकीसाठी फ्रिजरची खरेदी केली. पॅकहाउसची निर्मिती केली. औरंगाबाद शहरातील बंद पडलेला मांस प्रक्रिया प्रकल्प चालवण्यास घेतला. 

विविध प्रकारची उत्पादने 
ॲपॅटाइट या ब्रॅंडने सध्या ब्रॉयलर चिकन, सागरी उत्पादने, शेळ्यांचे मटण आदींची ऑनलाइन विक्री आता सुरू केली आहे. चिकनमध्ये लेगपीस, होल चिकन, थाय पिसेस, बोन्स असे विविध प्रकार आहेत. खाऱ्या व गोड्या पाण्यातील, तसेच माशांचे प्रकार आहेत. यात प्रॉन्स, पापलेट, सुरमई, कटला, रोहू आदींचा समावेश आहे. सागरी व गोड्या पाण्यातील खेकड्यांचीही विक्री होते. बुधवार व शुक्रवार हा ‘सीफूड डे’ म्हणून जाहीर केला जातो. या दिवशी मुंबईहून ताजे मासे, खेकडे येत असल्याने त्या वेळी चांगली विक्री होते. माशांच्या प्रकारानुसार दर वेगवेगळे असतात. 

रेडी टू कुक उत्पादने 
‘रेडी टू कूक’ प्रकारातील मांसाचीही ऑनलाइन विक्री होते. या उत्पादनांसाठी मसाल्यांचा वापर केलेला असतो. अर्थात, ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर काही वेळातच त्याचा पुरवठा होतो.   

खरेदी निकष 
कच्चा माल खरेदी शेतकऱ्यांकडून होते. उत्पादनांची गुणवत्ता व स्वाद या दोन्ही बाबी टिकवण्यासाठी या माल खरेदीचे निकष ठरविले आहेत. ब्रॉयलर चिकन महिन्यापेक्षा जास्त वयाचे नसावे. दोन किलोपेक्षा जास्त वजनाचे नसावे, लेगपीस छोटे, कोवळे व गुलाबी रंगाचे असावेत अशी ही मानके आहेत.

प्रक्रिया व आकर्षक पॅकिंग 
प्रक्रिया केंद्रात उत्पादनांवर आवश्‍यक प्रक्रिया केल्यानंतर स्वतःच्या पॅक हाउसमध्ये ती आणली जातात. तेथेही गरजेनुसार स्वच्छता व अन्य प्रक्रिया होते. अर्धा किलो वजनात फूड ग्रेड प्लॅस्टिकमध्ये व्हॅक्यूम मशिनद्वारे ‘पॅकिंग’ होते. त्यामुळे त्याची टिकाऊ क्षमता वाढते. पॅकिंगमधील उत्पादन डीफ्रीजरमध्ये ठेवून त्याचे तापमान खाली आणले जाते. ‘ऑर्डर’ मिळाल्यानंतर या पिशव्या तयार केलेल्या आकर्षक खोक्यात ठेवल्या जातात. यामुळे त्याचे सादरीकरण मूल्य (प्रेझेंटेशन व्हॅल्यू) वाढते. गरजेनुसार बॉक्स ‘इन्सुलेटेड’ बॅगमध्ये ठेवून ग्राहकांना पुरवठा केला जातो. उत्पादनाची किंमत जवळपास बाजारभावाप्रमाणेच असते. परंतु डिलिव्हरी व पॅकिंग शुल्क वेगळे घेतले जातात. सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत व दुपारी ५ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुरवठा केला जातो. 

उत्पादनांचे ‘मार्केटिंग’ 
मार्केटिंगसाठी इन्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूब आदी माध्यमांचा वापर केला जातो. ‘ऑर्डर्स’ स्वीकारण्यासाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर ही तयार केले आहे. अलीकडे तीन हॉटेल व एका छोट्या मॉलला पुरवठा सुरू केला आहे. या मॉलने तीन महिन्यांत ४५ हजार रुपयांची विक्री केली आहे. सोमवार ते बुधवार या काळात मिळून ३० किलोपर्यंत, तर अन्य दिवशी प्रति दिन ५० किलोपर्यंत विक्री होते. महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत एकूण उलाढाल होत आहे. सध्या एक हजार ते बाराशे ग्राहकांचे ‘नेटवर्क’ तयार केल्याचे आकाश यांनी सांगितले. 

संपर्क: आकाश म्हस्के  ८९८३३८८२०५  
(लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
संघर्षातून उभारली ‘तिने’शेतकरी उत्पादक...नाशिक : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने...
जिद्द अन् प्रयोगशीलतेतून निर्माण केली...पती निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली. जवळ...
शेतीमध्येही रंगवितो प्रयोगशीलतेचे धडेपरभणी येथील गांधी विद्यालयामध्ये कला शिक्षक...
चिकाटीतून नावारूपाला आणला गूळ उद्योगहिंगोली जिल्ह्यातील देवजणा येथील कैलासराव...
धान्यासहित कडब्यासाठी दादर ज्वारी आश्‍...कमी पाणी व अल्प खर्चात सकस धान्य, पशुधनासाठी...
नागज- जुनोनी... बेदाणानिर्मितीचे जणू ‘...सांगली- सोलापूर राज्यमार्गावर नागज ते जुनोनी या...
सैनिकाने केले बीजोत्पादनाचे तंत्र...भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर तांभेरे (ता....
उत्पादन, दर्जावाढीसाठी आंबा पुनरुज्जीवन...चांदोर (ता. जि. रत्नागिरी) येथील दत्ताराम राघो...
तंत्रज्ञानाच्या जोरावर रेशीम उद्योग...रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने...
शेती, पूरक व प्रक्रियेतून आर्थिक सक्षमतापालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यातील...
कापूस खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध सावनेर...‘ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हयात...
नगदी पिकांच्या जोडीला काकडी, टोमॅटोचे...नागठाणे (ता. जि. सातारा) येथील विक्रम साळुंखे...
बायोस्टिम्युलंट्‍स’- कायद्याच्या कक्षेत...बिगर नोंदणीकृत किंवा ढोबळमानाने ‘पीजीआर’ अशी ओळख...
शेतीमध्ये बदलली पीक पद्धतीमादणी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील संदीप...
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...