सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन’ ब्रँड

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक कंपनीने ५०० हून अधिक सभासदांचे संघटन उभारले. सेंद्रिय शेतीपासून ते विपणन व्यवस्था, मूल्यवर्धन, प्रक्रिया व विक्री अशी साखळीच कंपनीने उभारली आहे. ‘सात्त्विक कृषिधन’ ब्रँडद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारपेठेत सादर केली आहेत.
Organic products of 'Sattvik Krishidhan' brand
Organic products of 'Sattvik Krishidhan' brand

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक कंपनीने ५०० हून अधिक सभासदांचे संघटन उभारले. सेंद्रिय शेतीपासून ते विपणन व्यवस्था, मूल्यवर्धन, प्रक्रिया व विक्री अशी साखळीच कंपनीने उभारली आहे. ‘सात्त्विक कृषिधन’ ब्रँडद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारपेठेत सादर केली आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत सेवामार्ग येथे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिशास्त्र विभाग कार्यरत आहे. या माध्यमातून रासायनिक अवशेषमुक्त शेतीचे प्रयोग सुरू आहेत. हाच विचार घेऊन शेतकऱ्यांचे संघटन उभे करून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘दिंडोरी प्रणीत शेतकरी उत्पादक कंपनी’ची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य यांच्यासह आरोग्यप्रधान प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध केली आहे. कंपनीचे अध्यक्ष गिरीश (आबासाहेब) मोरे यांना कंपनीच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला. त्या वेळी तृणधान्ये, कडधान्ये मिळून अवघी सात उत्पादने होती. सुरुवातीपासून नावीन्यपूर्ण संकल्पना, धोरणात्मक कामकाज, सूत्रबद्धता व विश्‍वसनीय व्यवस्था यावर भर दिला. आदर्श कार्यपद्धती  शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षणे, चर्चासत्रे, अभ्यास दौरे यांचे आयोजन केले. बाजारपेठेतील मागणीनुसार पीकनिवड, हंगामनिहाय लागवड, कीड- रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात येते. शेतकऱ्यांकडील मालाची विक्री होते. तंत्रज्ञान विस्तारही साधला जात आहे. दिंडोरी, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर भागातील सहभागी शेतकऱ्यांच्या विकासाचा आलेख त्यातून वाढत आहे. ‘सात्त्विक कृषीधन’ ब्रँडने मिळविली बाजारपेठ व्यावसायिक संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर कंपनीने ‘सात्त्विक कृषिधन’ हा ब्रँड विकसित केला. उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी, आकर्षक पॅकिंग, अन्नसुरक्षा, प्रमाणीकरण आदी बाबी त्यात समाविष्ट केल्या. अपेडा, राष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा यांचे प्रमाणीकरण घेतले. मैदा, प्रिझरर्व्हेटिव, कृत्रिम रंग वा स्वादयुक्त घटक न वापरता उत्पादनांची निर्मिती होते. पॅकिंगसाठीही पर्यावरणपूरक घटकाचा वापर होतो. कंपनीच्या कामकाजाची वैशिष्ट्ये

  • प्रयोगशील शेतकऱ्यांचे संघटन.
  • मागणी-पुरवठ्यानुसार शेतमाल विक्री नियोजन. मालास योग्य हमीभाव व बाजारपेठ.
  • जिल्हा व तालुकानिहाय शेतकरी गट व सेंद्रिय प्रमाणीकरण. देशी बियाणे वापर व संवर्धन.
  • देशी गोसंगोपन, संवर्धनासाठी मार्गदर्शन.
  • शेतकऱ्यांना दशपर्णी, जिवामृत, अमृतजल, गांडूळ खत, शेणखत व आवश्‍यक निविष्ठा उपलब्ध करून देणे.
  • प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची खरेदी
  • स्वयंरोजगार गटाच्या माध्यमातून स्वावलंबी, होतकरू, बेरोजगार तरुण व महिलांना संधी.
  • सुमारे ४० जणांचे कुशल मनुष्यबळ.
  • शेतीमाल हाताळणी प्रतवारीसाठी यंत्रणा
  • उत्पादने ऑर्डरसाठी www.satvikkrushidhan.com पोर्टलनिर्मिती
  • ‘सात्त्विक कृषिधन’ची उत्पादने

  • देशी गाईचे दूध, तूप, ताक, दही व दुग्धजन्य पदार्थ
  • हातसडी तांदूळ, ब्राउन राइस, नागली, ज्वारी, गहू, हरभरा, उडीद, मूग, हरभरा, तूर यांच्या डाळी, मठ, हळद, मोहरी, जवस, भगर, शेंगदाणा.
  • अळिंबी (मशरूम) उत्पादने- ऑयस्टर, कुर्मा, पावडर, चकली, भुजिया, सूप
  • घाण्याचे तेल- करडई, शेंगदाणा, खोबरे, खुरसणी, जवस, मोहरी, बदाम
  • अन्य-जॅम, जवस, शेंगदाणा व खुरसणी यांची चटणी, मुखवास, कुरडई, पापड, उपवासाचा वडा व थालीपीठ, मोरिंगा पावडर, कोकम सरबत, शंकरपाळे, ज्वारी पोहे, निर्जलीकरण केलेला भाजीपाला
  • लहान मुलांसाठी- गूळ चॉकलेट, नाचणी सत्त्व (बदाम, चॉकलेट, वेलची), नागली व ज्वारी कुकीज, नागली रवा, बिस्किटे (गहू, नाचणी, ज्वारी, राजगिरा)
  • किराणा- खांडसरी (गंधकमुक्त) साखर, सेंद्रिय गूळ, पावडर,काकवी, सैंधव मीठ
  • नावीन्यपूर्ण उत्पादने 

  • आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्वयंरोजगार व महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादने.
  • शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करून लाकडी घाण्यावर तेल काढले जाते.
  • लिंबावर प्रक्रिया करून लेमन जॅम, लोणचे, वडी व पावडर आदी उत्पादने निर्मिती.
  • गहू पिठापासून इन्स्टंट मेथी, बीट, कोथिंबीर, पालक पराठे.
  • रेडी टू कुक-उपमा, पुरण मिक्स, राजगिरा शिरा व भगर.
  • रेडी टू इट.- नाचणी, ओट्स, मका, ज्वारी चिवडा, मेथी, ओट्स व नाचणीचे लाडू,
  • ज्वारीपासून रवा, इडली, पोहे, एनर्जी बार (ओट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, नाचणी)
  • बाजारपेठ

  • महाराष्ट्रातील १८ हून अधिक जिल्ह्यात १७५ पेक्षा अधिक विक्रेते. वितरक संख्या २७ पेक्षा अधिक.-मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील विविध शहरांत ६७ पेक्षा अधिक ब्रँडची विक्री दालने.
  • दिल्ली, गुजरात व कर्नाटक राज्यांत नेटवर्क वाढवून सक्षम बाजारपेठ देण्याचे कार्य सुरू.
  • लॉकडाउनमध्येही मुंबई, पुणे, नाशिक येथे थेट सोसायट्यांद्वारे ऑर्डर्स घेऊन पुरवठा करण्यात आला.
  • पोलिस बांधवांनाही ताजी फळे व भाजीपाला देण्यात आला.
  • उलाढाल (रुपये)  २०१८-१९...२५ लाख २०१९-२०... ९५ लाख २०२०-२१...१ कोटी ८१ लाख आरोग्याच्या दृष्टीने शेतीमाल उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून संधी निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून देणे हा कंपनी स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात राज्यभर कामाचा विस्तार करताना यंत्रणा उभारली जात आहे. कामांचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर संधी निर्माण करण्याचा मानस आहे. - गिरीश (आबासाहेब) मोरे (अध्यक्ष, दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक कंपनी.) संपर्क - राहुल वाघ, ७२१९६५०४८६ शेतकरी उत्पादक कंपनी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com