agricultural news in marathi success story Agriculture got the addition of dairy business | Agrowon

शेतीला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोड

गणेश कोरे
रविवार, 14 नोव्हेंबर 2021

पुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या डोंगर कुशीत वसलेले रिहे हे टुमदार गाव. भात शेतीच्या बरोबरीने या गावात पशुपालन हा महत्त्वाचा पूरक उद्योग आहे. रिहे गावातील रंजना अशोक शिंदे या प्रयोगशील महिला शेतकरी. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालनात चांगली ओळख तयार केली आहे.
 

पुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या डोंगर कुशीत वसलेले रिहे हे टुमदार गाव. भात शेतीच्या बरोबरीने या गावात पशुपालन हा महत्त्वाचा पूरक उद्योग आहे. रिहे गावातील रंजना अशोक शिंदे या प्रयोगशील महिला शेतकरी. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालनात चांगली ओळख तयार केली आहे.

रिहे (ता. मुळशी, जि. पुणे) गावातील रंजना अशोक शिंदे यांची पारंपरिक अडीच एकर शेती. या शेतीमध्ये भाताचे उत्पादन होते. भात शेतीला पूरक व्यवसाय जोड देण्यासाठी त्यांनी दोन म्हशी घेतल्या. पतीचे वीस वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर दोन मुले, एक मुलगी यांच्यासह त्यांनी चांगल्या प्रकारे प्रपंच सांभाळला. मुले मोठी झाल्यावर नोकरीनिमित्त पुणे शहरात जात होती. रंजना शिंदे यांच्या मुलीच्या सासरी गाईंचा गोठा आहे. जावई सुनील जगताप यांच्या सांगण्यावरून दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी रंजना शिंदे यांनी २०१५ मध्ये ५० टक्के संकरित दोन गाई खरेदी केल्या. म्हैसपालनाचा अनुभव असल्यामुळे गाईंच्या व्यवस्थापनासाठी फारशी अडचण आली नाही. दोन म्हशी आणि दोन गाईंचे मिळून दररोज २५ लिटर दुधाची गावामध्येच विक्री सुरू झाली. दोन संकरित गाईंच्या व्यवस्थापनाचा अनुभव आल्यानंतर त्यांनी गाईंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. 

गाईंचे दैनंदिन व्यवस्थापन 
गाईंना दररोजच्या आहारामध्ये ओला आणि सुक्या चाऱ्याबरोबर पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार पशुखाद्य दिले जाते. सुक्या चाऱ्यामध्ये कडबा, भात पेंढ्याचा समावेश आहे. भात पेंढा घरचा असल्यामुळे त्याचा खर्च नाही. हिरव्या चाऱ्यासाठी एक एकरावर चक्राकार पद्धतीने मका, लसूणघास, हत्ती गवताची लागवड केली आहे. शेतालगतच बंधारा असल्याने बंधाऱ्याच्या पाण्यावर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन होते. उन्हाळ्यात देखील पाणी उपलब्ध असल्याने पुरेसा हिरवा चारा उपलब्ध असतो. 

गहू आणि मक्याचा भरडा घरीच केला जातो. यासाठी गोठ्यामध्ये एक लहान गिरणी ठेवली आहे. या गिरणीवर रोजच्या रोज भरडा केला जातो. भरड्यामध्ये शिफारशीनुसार खनिज मिश्रण वापरले जाते. यामुळे गाईंच्या दूध उत्पादनावर चांगला परिणाम झाला आहे.  घरीच भरडा केल्याने आर्थिक बचत झाली आहे.  सध्या दावणीला १२ संकरित गाई असून, दररोज १५० लिटर दूध संकलन होते.  

दररोज पहाटे पाच वाजता गाईंना अंबोण दिले जाते. यानंतर यंत्राद्वारे दूध काढले जाते. दूध काढल्यानंतर हिरव्या चाऱ्याची कुटी दिली जाते. अंबोणामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याबरोबरच दूधवाढीसाठी खनिज मिश्रण दिले जाते. त्यानंतर गाईंना मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते. गोठ्यामध्ये चारा गव्हाण आणि पाण्याचा हौद केला आहे. गाई गरजेनुसार चारा खातात,पाणी पितात. दुपारी चार वाजता पुन्हा दूध काढले जाते. त्यानंतर चारा कुट्टी आणि पशुखाद्य दिले जाते. 

श्री समर्थ दूध डेअरीचा शुभारंभ
पारंपरिक पद्धतीने म्हैसपालन करताना रंजना शिंदे यांनी गाव परिसरातच घरोघरी रतीबाने दुधाची विक्री सुरू केली. पुढे गाईंची संख्या वाढत गेली. त्यामुळे दुधाचे संकलन वाढू लागले. दूध विक्री सोपी जाण्यासाठी रंजनाताईंचा मुलगा सचिन याने तीन वर्षांपूर्वी पुनावळे येथे श्री समर्थ दूध डेअरी व्यवसाय सुरू केला. या ठिकाणी पॅकिंग केलेल्या दुधाची विक्री होते. दुधाची मागणी वाढल्यानंतर आता स्वतःच्या गोठ्यातील १५० लिटर आणि बाहेरून खरेदी केलेले ५० लिटर असे दररोज २०० लिटर दुधाचे संकलन होते. गाईचे दूध ४५ रुपये आणि म्हशीचे दूध ५५ रुपये प्रति लिटर या दराने विक्री होते. निम्म्या दुधाचे पॅकिंग घरीच केले जाते. डेअरीवर किरकोळ विक्रीसाठीच्या दुधाचे पॅकिंग केले जाते. 

  मुक्तसंचार गोठ्याचा अवलंब 
गाईंच्या व्यवस्थापनाबाबत रंजना शिंदे म्हणाल्या, की मी दोन संकरित गाईंच्या संगोपनातून पुढे पाच महिन्यांनी आणखी दोन संकरित गाईंची खरेदी केली. याच दरम्यान लुपीन फाउंडेशन संस्थेच्या वतीने पशुसंवर्धनाचे काम रिहे गावात सुरू होते. या कामाच्या निमित्ताने फाउंडेशनचे पशुवैद्यकीय सहायक विविध गोठ्यांना भेटी देत सल्ला आणि मार्गदर्शन करत होते. या दरम्यान आम्हालादेखील मुक्त संचार गोठ्याबाबत मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पाच गुंठे क्षेत्रावर मुक्त संचार गोठा तयार केला. संकरित गाईंच्या व्यवस्थापनातील वेळ कमी करण्यासाठी मुक्त संचार गोठा फायदेशीर ठरला. दूध काढण्याच्या वेळेस गाईंना सकाळी आणि संध्याकाळी पशुखाद्य आणि चाराकुट्टी दिली जाते. मुक्त संचार गोठ्यामध्ये गाई निवांत राहतात, फिरतात. त्यामुळे त्यांचा ताण कमी होतो. पुरेसा व्यायामदेखील होतो. मुक्त वातावरणामुळे गाईंचे आरोग्य चांगले राहत असल्याने वैद्यकीय उपचारांचा खर्च देखील कमी आहे. अडीच एकर शेती आणि गोठा व्यवस्थापनात सचिन आणि समीर या दोन्ही मुलांची चांगली मदत होते.

  शेणखतामधून अतिरिक्त उत्पन्न 
वर्षभरात ३० ट्रॉली शेणखताची विक्री केली जाते. दोन हजार रुपये प्रति ट्रॉली प्रमाणे साधारण ६० हजार रुपयांचे उत्पन्न रंजानाताईंना मिळते. हा खर्च वर्षभरातील गाईंचे पशुखाद्य आणि औषधोपचारांवर होतो. त्यामुळे इतर कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही, असा शिंदे यांचा अनुभव आहे. 

केवळ आईचे कष्ट आणि पाठिंब्यावर मी आज दूध डेअरी व्यवसायात आहे. गाईंचे व्यवस्थापन आई पाहते. पहाटे पाचपासून ते दूध पॅकिंग करेपर्यंत आई राबत असते. तिच्या योग्य नियोजनामुळेच आम्ही दोन गाईंवरून १५ गाईंवर पोहोचलो आहे. दुग्ध व्यवसाय चांगल्याप्रकारे वाढीस लागला आहे.
- सचिन शिंदे,  ८७६७३३७००९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शास्त्रीय पशुपालनातून मिळवले आर्थिक...कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले)...
भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडीमिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
फळबागांसाठी पॅकहाउस ठरले फायदेशीरआळंदी म्हातोबा येथील प्रकाश जवळकर यांनी फळबाग...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
दर्जेदार, शास्त्रीय पद्धतीने गांडूळ...माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी...
राइसमिल’द्वारे शोधला स्वयंरोजगार,...सांगली जिल्ह्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील...
एकट्याने नव्हे, इतरांना घेऊन पुढे जाऊ;...एकटा नाही तर इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार टेंभे...
आंब्यासाठी उभारले स्वतःचे रायपनिंग चेंबररत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब आंबा...
घोळवा परिसर झाला कांद्याचे ‘क्लस्टर’हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घोळवा (ता....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...