agricultural news in marathi success story of bedval family from buldhana district | Agrowon

संघर्षमय वाटचालीतून समृद्ध शेडनेट शेती

गोपाल हागे
गुरुवार, 1 एप्रिल 2021

बुलडाणा जिल्ह्यातील परतापूर येथील बेडवाळ कुटुंबाने संघर्षमय वाटचालीतून प्रयोगशीलतेला प्रमाण मानले. विविध पिकांबरोबरच संकरित भाजीपाला बीजोत्पादनात सातत्य ठेवत त्यात आदर्श, अनुकरणीय अशी ओळख तयार केली. सहा शेडनेटपर्यंत विस्तार करून आर्थिक समृद्धी मिळवली.  
 

बुलडाणा जिल्ह्यातील परतापूर येथील बेडवाळ कुटुंबाने संघर्षमय वाटचालीतून प्रयोगशीलतेला प्रमाण मानले. विविध पिकांबरोबरच संकरित भाजीपाला बीजोत्पादनात सातत्य ठेवत त्यात आदर्श, अनुकरणीय अशी ओळख तयार केली. सहा शेडनेटपर्यंत विस्तार करून आर्थिक समृद्धी मिळवली.  

बुलडाणा जिल्ह्यातील परतापूर येथील घनश्‍याम बेडवाळ यांची बारा एकर शेती आहे. संकरित भाजीपाला उत्पादनात त्यांनी ‘मास्टरी’ व पंचक्रोशीत मास्टरी मिळवली आहे. पूर्वी कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांवर उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. त्यांनी बदलत्या शेतीचा वेध घेतला. प्रयोगशील वृत्ती अंगी बाणवली. सन २००१ मध्ये बटाटा, ऊस या पिकांकडे वळाले. उत्पन्न वाढायला सुरुवात झाली. सन २००१ च्या दरम्यान द्राक्ष लागवड केली. मेहकर तालुक्यातील हा पहिला प्रयोग असावा. सन २०११ पर्यंत द्राक्ष बाग चांगली जोपासत दर्जेदार उत्पादन घेतले. पण दुष्काळाची तीव्रता पुढे इतकी वाढली, की बाग काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. सात ते आठ बोअर घेऊनही पाणी मिळाले नाही.

संरक्षित शेतीत रोवले पाय
विविध पीक पद्धतीचे अर्थकारण अभ्यासल्यानंतर संकरित भाजीपाला बीजोत्पादनात उतरायचे ठरवले. २०११ मध्ये गावात १० गुंठ्यांचे पहिले शेडनेट उभारले. खासगी कंपनीसोबत करार करून ढोबळी मिरचीचे बीजोत्पादन घेतले. चिकाटी, अभ्यास व परिश्रमातून या शेतीत चांगला जम बसवला.

बेडवाळ यांची प्रायोगिक शेती 

 • एका शेडनेटपासून सुरू झालेला प्रवास सहा शेडनेटपर्यंत (प्रत्येकी १० गुंठ्यांचे) पोहोचला आहे. 
 • दहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. तिखट मिरची, ढोबळी मिरची व टोमॅटो, कारले आदी संकरित भाजीपाला बीजोत्पादन घेतात. खुल्या जागेत सूर्यफूल, कलिंगड बीजोत्पादन घेऊ लागले आहेत. 
 • दोन खासगी कंपन्यांसोबत करार शेती. 
 • शेडनेटमधील पद्धती
 • लागवड ते काढणीपर्यंतचा कालावधी- प्रति पीक सुमारे साडेचार महिने
 • लागवड अंतर- पीकनिहाय व संबंधित कंपनीने सुचविल्याप्रमाणे
 • प्रति १० गुंठ्यांत झाडांची संख्या- टोमॅटो- १५०० ते १५५०, तिखट मिरची- ६५० ते ६००, सिमला मिरची- १४०० ते १४५०
 • पाणी, पीक संरक्षण, खत व्यवस्थापनाचे बारकावे माहीत झाले आहेत. कंपन्यांचेही तांत्रिक मार्गदर्शन मिळते. 
 • खरिपात सोयाबीन व तूर यांचे बीजोत्पादन  
 • दीड एकरांत काकडी, टोमॅटो, फुलकोबी. अकोला, मेहकर, रिसोड या बाजारपेठांत विक्री. 

संकटांवर मात
बेडवाळ यांनी यशस्वी शेतीचे जे मॉडेल उभे केले त्यामागे संघर्ष आहे. दिवसरात्र मेहनत आहे. अनेक संकटे आली. गेल्या खरिपात शेडनेटमध्ये मिरची बीजोत्पादन घेतले. मात्र तुफान पाऊस झाल्याने सर्व पिकांचे नुकसान झाले. शेडनेटमध्ये बेडच्या मधोमध पाणी साचले. १० गुंठ्यांतील १६०० रोपांपैकी८५० झाडे जगली. परंतु हिंमत खचू न देता अनुभवातून शक्य ते दर्जेदार बीजोत्पादन घेतले. कंपनीकडून दरही चांगला मिळाला.    

वर्षभर रोजगार 
बीजोत्पादनात विविध कामांसाठी तंत्रकुशल मजुरांची गरज असते. बेडवाळ यांच्याकडील सहा नेटसमध्ये गावातील महिलांना वर्षभर काम मिळते. हंगामात ३० ते ३५ मजूर महिला, तर हंगामाव्यतिरिक्त १० ते १२ महिला कार्यरत असतात. त्यांचीही कुशलता वाढीस लागली आहे.

शेती झाली भेटीचे ठिकाण
शेती मेहकर शहरापासून जवळच असल्याने मंत्री, कृषी विभाग व अन्य उच्च अधिकारी प्रयोगांची माहिती घेण्यासाठी भेट देतात. कृषी सहायक विठ्ठल धांडे, सचिन देशमुख, पंचायत समिती विस्तार अधिकारी मेटांगळे यांचे मार्गदर्शन मिळते. 

उल्लेखनीय बाबी 

 • बीजोत्पादनासारख्या तांत्रिक शेतीत निर्णयक्षमता, सातत्य, संयमाची गरज असते. त्यासाठी  कुटुंबाची एकी बेडवाळ यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. त्यामुळेच उत्‍पन्न वाढले. कुटुंबातील मोठे  घनश्‍याम, पत्नी संजीवनी, मुलगा शिवप्रसाद, दीपक, आई राधाबाई नारायण बेडवाळ, भाऊ हरीदास, त्यांची पत्नी कल्पना, मुलगा विवेक, आशीष असे परिवाराचे मोठे बळ आहे. शिक्षण घेत असलेली मुले वगळता सर्व जण शेतीत राबतात.
 • राजकारणाच्या चर्चा करीत व्यर्थ वेळ दवडणे पसंत नाही. लोकांच्या टिकांकडेही लक्ष न देता  शेतीत पूर्णतः मग्न राहून काम करतो. त्यामुळेच प्रगती शक्य झाल्याचे बेडवाळ सांगतात. 

बीजोत्पादन, उत्पन्न व अर्थशास्त्र (प्रातिनिधिक) (प्रति १० गुंठ्यांत)

 • तिखट मिरची- ६० ते १०० किलो  
 • ढोबळी मिरची- १५ ते १८ किलोपासून ते २५-३० किलोपर्यंत (वाणांच्या गुणवैशिष्ट्यांनुसार), त्यास मिळणारा दर किलोला १० हजार ते १५ हजार रु.
 • टोमॅटो- उत्पादन- ८ किलोपासून ते १५ किलोपर्यंत- दर किलोला 
 • ८ हजार, १० हजारांपासून ते १५ हजार, २५ हजार रुपयांपर्यंत 
 • उत्पादन खर्च- किमान ७५ हजार रुपये.
 • उत्पादनापूर्वीच कंपन्यांकडून दर निश्‍चित केले जातात. कंपनीच्या धोरणानुसार चाचणीत उतरलेल्या बियाण्याची रक्कम दिली जाते. 

भांडवल 
सुरुवातीच्या टप्प्यात घरचे पैसे गुंतविले. एकेक नेटमधील तसेच शेतीतील अन्य उत्पन्नातूनच नेटची संख्या वाढवत नेली. त्यासाठी कुठल्याही बँकेचे कर्ज काढले नाही.

‘ॲग्रोवन’चे वाचक
घनश्‍याम ‘ॲग्रोवन’चे अनेक वर्षांपासूनचे वाचक आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा परिचय व त्यांचे कर्तृत्व समजून त्यानुसार काम करणे शक्य झाल्याचे ते सांगतात. 

- घनश्‍याम बेडवाळ  ७७५७८७२३१७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...