agricultural news in marathi Success story of bhausaheb palaskar from pune district doing profitable farming of onion and watermelon | Agrowon

कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणित

संदीप नवले
सोमवार, 12 एप्रिल 2021

करडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू पळसकर यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून कांदा, ज्वारी, कलिंगड आणि मिरची पिकाचे योग्य नियोजन केले आहे. याचबरोबरीने कांदा बीजोत्पादन, रोप विक्रीतूनही नफा वाढविण्याचा पळसकर बंधूंचा चांगला प्रयत्न आहे.
 

करडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू पळसकर यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून कांदा, ज्वारी, कलिंगड आणि मिरची पिकाचे योग्य नियोजन केले आहे. याचबरोबरीने कांदा बीजोत्पादन, रोप विक्रीतूनही नफा वाढविण्याचा पळसकर बंधूंचा चांगला प्रयत्न आहे.

करडे हे शिरूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील साधारणपणे चार हजार लोकसंख्येचे गाव. या शिवारातील बहुतांश शेती जिरायती. दरवर्षी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर बहुतांशी शेतकरी कमी कालावधीची पिके घेतात. या गावातील भाऊसाहेब आणि अशोक पळसकर हे प्रयोगशील शेतकरी. या दोघा भावांचे एकत्रित कुटुंब असून, वडिलोपार्जित २१ एकर शेती आहे.

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात कांदा, रब्बी हंगामात ठिबक सिंचनावर गावरान ज्वारी आणि उन्हाळी हंगामात कलिंगड आणि मिरची लागवड असते. ‘आत्मा’अंतर्गत ते कृषी मित्र म्हणून गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.

कांदा शेतीचे नियोजन 

 • दरवर्षी खरीप, रब्बी हंगामात लागवड.
 • खरीप हंगामासाठी जून महिन्यात आणि रब्बी हंगामासाठी सप्टेंबर महिन्यात रोपवाटिका.
 • खरिपात अर्धा एकर आणि रब्बी हंगामात एक एकरावर रोपवाटिका.
 • रोपवाटिकेसाठी घरच्याच फुले समर्थ आणि गावरान गरवी जातीच्या बियाण्याचा वापर.

बीजोत्पादन 

 • गेल्या सहा वर्षांपासून अर्धा एकरावर फुले समर्थ आणि गावरान जातीचे बीजोत्पादन.
 • ऑक्टोबर महिन्यात लागवड, पाच महिन्यात बीजोत्पादन.
 • काढणीला आलेल्या बियाण्यांची काढणी करून हाताने मळणी.
 • शेतकऱ्यांना पंधराशे रुपये प्रति किलो दराने बियाणे विक्री.

रोप विक्री 

 • दरवर्षी किती एकरावर कांदा लागवड करायची, याचा निर्णय घेऊन रोपवाटिका निर्मिती.
 • शेतामध्ये गादी वाफे, साऱ्यांमध्ये बियाणे टाकून रोपवाटिका.
 • स्वतःच्या शेतातील लागवडीनंतर उर्वरित शिल्लक रोपांची आठशे ते एक हजार रूपये साऱ्याप्रमाणे विक्री. यातून उत्पन्नाला हातभार.

लागवडीचे नियोजन 

 • कांदा लागवडीपुर्वी जमिनीत कोंबडीखत मिसळून पूर्वमशागत.
 • शेतामध्ये वाफे पद्धत आणि गादीवाफ्यावर मजुरांच्या सह्याने योग्य अंतरावर रोप लागवड.
 • लागवडीच्या वेळेस माती परीक्षणानुसार सिंगल सुपर फॉस्फेट, लागवडीनंतर आठ दिवसाने १९:१९:१९ आणि पहिल्या खुरपणीनंतर १०:२६:२६ ही रासायनिक खतांची मात्रा.
 • कीड, रोग नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शिफारशीत फवारण्या.

ठिबक, तुषार सिंचनाचा वापर 

 • शाश्‍वत पाणी उपलब्धतेसाठी कूपनलिकांचे पाणी शेतातील विहिरीत सोडले.
 • कांदा पिकाला तुषार आणि ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन.
 • काटेकोर खत, पाणी व्यवस्थापनातून कांद्याचे दर्जेदार उत्पादन.

काढणी 

 • मोठा, मध्यम आणि लहान अशा तीन गटात कांदा प्रतवारी. लहान आणि मध्यम कांद्याची जागेवर व्यापाऱ्यांना विक्री.
 • मोठ्या कांद्याची साठवणूक.यासाठी शेतात पंचवीस टन क्षमतेची कांदा चाळ. कृषी विभागाकडून ८७,५०० रुपयांचे अनुदान.
 • कांदा चाळीमध्ये तीन ते चार महिने साठवणूक. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दर वाढल्यानंतर विक्री. त्यामुळे चांगले दर मिळण्यास मदत.

पीक आणि पूरक उद्योगातून उत्पन्न 

 • कांद्याचे एकरी सरासरी १५ टन उत्पादन. एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च.
 • गेल्या वर्षी चांगल्या दरामुळे प्रति किलोस सरासरी २५ ते २७ रुपये दर. यामुळे एकरी खर्च वजा जाता अडीच लाखांचे उत्पन्न. मात्र काही वेळेस कमी दर मिळाल्यानंतर उत्पन्नात घट.
 • दोन एकर कलिंगड पिकातून दीड लाख रुपये, मिरचीतून एक लाख निव्वळ उत्पन्न.
 • कांदा बीजोत्पादनातून एक लाख रुपये, कुक्कुटपालनातून दरवर्षी दीड लाखाचे उत्पन्न.
 • जमीन सुपीकता आणि पीक फेरपालटावर भर.
 • बाजारपेठेतील दरामुळे उत्पन्नात चढ-उताराचा अनुभव.

कुक्कुटपालनाची जोड 
पळसकर हे १९९८ पासून कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आहेत. दोन शेडमध्ये वर्षभर टप्प्याटप्प्याने सातशे ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले जाते. कोंबड्यांची स्वतःच्या चिकन सेंटरवर विक्री केली जाते. त्यामुळे यातून चांगला नफा त्यांना मिळतो. तसेच शेतीसाठी कोंबडी खताची उपलब्धता होते. कोंबडी खतामुळे जमिनीची सुपीकता जपली जाते. तसेच पिकांचेही चांगले उत्पादन मिळते.

चिंच उत्पादनाला सुरुवात 
पळसकर यांनी दहा वर्षापूर्वी तीन एकरामध्ये चिंच लागवड केली. सध्या ही झाडे चांगली बहरली आहे. यंदा पहिल्यांदा चिंचेचे तीन क्विंटल उत्पादन मिळाले. चिंचेला प्रति किलो ३५ ते ४० रूपये एवढा दर मिळाला. यातून दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. पुढील काळात या फळबागेतून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

पीक नियोजन 
खरीप कांदा - ५ एकर
रब्बी कांदा - ४ एकर
रब्बी ज्वारी - ६० गुंठे
उन्हाळी हंगाम ः कलिंगडामध्ये मिरचीचे आंतरपीक -२ एकर
चिंच - तीन एकर.

शिक्षण, आरोग्यावर भर 
शेती करत असताना भाऊसाहेब पळसकर यांनी मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष दिले आहे. मुलगा गौरव बी.एस्सी. कृषी झाला आहे. त्याला गावामध्ये कृषी निविष्ठा दुकान काढून दिले आहे. मुलगी पूजा ही बीफार्मसीचे शिक्षण घेत आहे. भाऊ अशोक यांची दोन मुले माध्यमिक व प्राथमिक शिक्षण घेत आहे. दोन्ही भावांनी कुटुंबाचा आरोग्य विमा काढलेला आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीचा अपघात विमा उतरवला जातो. त्यासाठी एकूण अडीच लाख रुपये एकूण उत्पन्नातून बाजूला काढले जातात. शेती आणि पूरक व्यवसायाचा वार्षिक जमाखर्चाचा ताळेबंद मांडत पुढील वर्षीचे आर्थिक नियोजन केले जाते.

संपर्क : भाऊसाहेब पळसकर, ९८२२५८०२४४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...
दर्जेदार आंब्याला मिळवले बांधावरच ग्राहकपुनर्वसित ठिकाणी मिळालेल्या शेतजमिनी ओसाड...
शेतकऱ्यांनी आता स्ववलंबी व्हावेकृषी विविधता भरपूर असलेला महाराष्ट्र आज एकसष्ट...
कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी...
शेतीतच नव्हे. विक्रीतही आम्ही बहादूर! कोरोना संकटात आठवडी बाजार बंद झाले, बाजारांवर...
नोकरीवर शोधला प्रयोगशील शेतीचा पर्यायकोरोना लॉकडाउन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या...
शेणस्लरी निर्मिती झाली आता अधिक सोपीपुणे जिल्ह्यातील व्याहाळी (ता. इंदापूर) येथील...
प्रयोगशील शेतीतील गुलजार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिथवली येथील गुलजार निजाम...
महिना दोन लाख पक्षी उत्पादनाचा...तरोडा (जि. यवतमाळ) येथील देवेंद्र भोयर यांनी ३०...
जिद्द, नियोजनातून शेती केली किफायतशीरपवारवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील रंजना...
मर्यादित क्षेत्रात बहुविध पिकांचे...अल्पक्षेत्र असले तरी जागेचा व हंगामाचा योग्य वापर...
कोंबडीपालनाने दिली आर्थिक साथ...पारंपरिक शेतीच्या बरोबरीने आर्थिक मिळकतीसाठी लहान...