खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळख

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज पिकासाठी प्रसिद्ध झाले आहे. परिसरातील जिल्ह्यांसह मुंबई, दिल्ली बाजारपेठेपर्यंत इथले खरबूज पोचले आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्न व अभ्यासपूर्वक तसेच तंत्रज्ञानाचा आधार घेत हे पीक यशस्वी करीत आपले व पर्यायाने गावचे अर्थकारण उंचावण्यात यश मिळवले आहे.
The use of ‘crop cover’ in melons.
The use of ‘crop cover’ in melons.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज पिकासाठी प्रसिद्ध झाले आहे. परिसरातील जिल्ह्यांसह मुंबई, दिल्ली बाजारपेठेपर्यंत इथले खरबूज पोचले आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्न व अभ्यासपूर्वक तसेच तंत्रज्ञानाचा आधार घेत हे पीक यशस्वी करीत आपले व पर्यायाने गावचे अर्थकारण उंचावण्यात यश मिळवले आहे. पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल हे पुणे- सोलापूर महामार्गावर रावगावपासून सात किलोमीटरवर वसलेले गाव आहे. सुमारे साडेचार हजार लोकसंख्येच्या या गावात पंधरा वर्षांपूर्वी ज्वारी, बाजरी अशी पारंपरिक पिके घेतली जायची. बदलती शेती, पीकवाण, तंत्रज्ञान व बाजारपेठा या बाबी अभ्यासून गावातील शेतकरीही सुधारणा करण्याकडे वळले. खरबुजाकडे वाटचाल गावातील गोरख रसाळ हे प्रगतशील शेतकरी आहेत. सन २००५ नंतर मल्चिंग पेपरच्या आधारे त्यांनी खरबुजाचा प्रयोग सुरू केला. गावातील तरुणांनीही अभ्यासातून टोमॅटो, ढोबळी मिरची, दोडके, कारली, पपई अशा पिकांकडे मोर्चा वळवला. त्यात त्यांचा जम बसू लागला. रसाळ यांनी अन्य शेतकऱ्यांना खरबुजाविषयी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्याचे अर्थकारण समजून घेऊन शेतकरी त्याकडे वळू लागले. तंत्र आत्मसात होऊ लागले. गावचे अर्थकारण बदलू लागले. आजमितीला दीडशे एकरांहून अधिक क्षेत्रापर्यत खरबूज लागवडीचा पल्ला गावाने गाठला असावा. तरुणांनी पेलली तंत्रज्ञानाधारित शेती

  • नवी पिढी शेतीबाबत फार गंभीर नाही. त्यांचा कल व्यवसाय नोकरीकडे आहे हा समज बोरीबेल गावाने चुकीचा ठरवला आहे. गावात शंभरहून अधिक शेतकरी व त्यातही प्रामुख्याने युवा शेतकरी खरबूज, टोमॅटो कलिंगड पिकांमध्ये गुंतले आहेत. नवे तंत्रज्ञान वापरून चांगल्या पद्धतीने पीक व्यवस्थापन करण्यात ते कुशल झाले आहेत.
  • दरवर्षी जानेवारीत खरबूज लागवडीचे नियोजन होते. एकरी सुमारे सातहजार रोपे बसतात. एकरी तीन ते चार ट्रॉली शेणखताचा वापर करून गादीवाफे तयार केले जातात.
  • विविध वाणांचा शोध घेऊन त्यांची निवड केली जाते.
  • पॉली मल्चिंग पेपर अंथरून त्यावर रोपे लावून दहा दिवसानंतर ‘क्रॉप कव्हर’ने रोपे झाकली जातात.
  • सुमारे २२ दिवसांनंतर हे कव्हर काढण्यात येते. सुमारे ७० दिवसांत काढणीस सुरुवात होते. एकरी १२ ते १५ टनांपर्यत उत्पादन मिळते. त्यासाठी ७५ ते ८० हजार रुपये खर्च येतो.
  • दर व बाजारपेठा

  • वर्षभराचा विचार केल्यास किलोला १० रुपयांपासून ते १५ व कमाल २० रुपयांपर्यंत दर मिळतो. गेल्या वर्षीपासून कोरोना संकटामुळे बाजारपेठा विस्कळित झाल्या आहेत. व्यापारी दर पाडून मागत आहेत. विक्रीसाठी अडचणी येत आहेत. दर घसरले आहेत. तरीही शेतकरी अडचणींवर मात करीत १२ ते १५ रुपये दर मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • कलिंगडासाठी पुणे, मुंबई, दिल्ली व सुरत या बाजारपेठा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी १५ ते २० किलोच्या क्रेटमधून याच बाजारपेठांत ती पाठवतात. काही व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावरूनही खरेदी करतात. स्वतः विक्री केल्यास किलोमागे दोन ते तीन रुपये अधिक मिळतात. खरबुजाचा तीन महिन्यांचा हंगाम जोमात असतो. त्यानंतर सुमारे ८० टक्के उत्पादक त्याच मल्चिंग पेपरवर टोमॅटोचे उत्पादन घेतात. दोन वर्षांपासून ५० ते ६० टक्के शेतकरी ढोबळी मिरचीकडे वळाले असल्याचे दिसून येते.
  • उलाढाल गावात दरवर्षी खरबूज शेतीतून किमान दोन कोटी रुपयांच्या पुढे उलाढाल होत असावी. टोमॅटो व ढोबळी या दोन पिकांची त्यात भर घातल्यास ती काही कोटींनी वाढते. विशेष म्हणजे युवा, उच्चशिक्षित व अल्पभूधारक वर्गातील शेतकऱ्यांचे हे यश म्हणावे लागेल. सुधारित शेतीमुळे नवी घरे. ट्रॅक्टर, अवजारे खरेदी करणे शक्य झाले आहे. यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. दहा ते १२ विहीरी व बोअरवेल्स आहेत. खडकवासला धरण साखळीतून वर्षाला ३ ते ४ वेळा पाणी कॅनॉलद्वारे मिळते. तुषार व ठिबक सिंचनाचा वापर होतो. यंदा वातावरणातील बदलामुळे खरबुजावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकरी रासायनिक अवशेषषमुक्त शेतीकडे वळू लागले आहेत. प्रतिक्रिया गावात बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. नवे तंत्रज्ञान व पूरक बाबींसाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत पातळीवर शक्य होईल तेवढी मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास त्यातून मदत होते. - नंदकिशोर पाचपुते, सरपंच, बोरीबेल मी अनेक वर्षांपासून खरबूज शेती करतो. टप्प्याटप्प्याने सुधारणा करीत गेलो. ठिबक, तुषार सिंचन, पॉली मल्चिंग यांचा वापर सुरू केला. अलीकडे जिवाणू स्लरीचा वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळत आहे . - गोरख रसाळ, ९७६३६३६०६८ प्रगतिशील शेतकरी मी २००८ पासून चार ते पाच एकरांत खरबूज, केळी अशी पिके घेत आहे. त्यातून आर्थिक सक्षमता मिळवली आहे. - बाळकृष्ण पाचपुते, ९९२२२८९२३१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com