agricultural news in marathi success story of Boribel village from pune district made their own identity in melon crop | Page 2 ||| Agrowon

खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळख

संदीप नवले
शुक्रवार, 14 मे 2021

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज पिकासाठी प्रसिद्ध झाले आहे. परिसरातील जिल्ह्यांसह मुंबई, दिल्ली बाजारपेठेपर्यंत इथले खरबूज पोचले आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्न व अभ्यासपूर्वक तसेच तंत्रज्ञानाचा आधार घेत हे पीक यशस्वी करीत आपले व पर्यायाने गावचे अर्थकारण उंचावण्यात यश मिळवले आहे.
 

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज पिकासाठी प्रसिद्ध झाले आहे. परिसरातील जिल्ह्यांसह मुंबई, दिल्ली बाजारपेठेपर्यंत इथले खरबूज पोचले आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्न व अभ्यासपूर्वक तसेच तंत्रज्ञानाचा आधार घेत हे पीक यशस्वी करीत आपले व पर्यायाने गावचे अर्थकारण उंचावण्यात यश मिळवले आहे.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल हे पुणे- सोलापूर महामार्गावर रावगावपासून सात किलोमीटरवर वसलेले गाव आहे. सुमारे साडेचार हजार लोकसंख्येच्या या गावात पंधरा वर्षांपूर्वी ज्वारी, बाजरी अशी पारंपरिक पिके घेतली जायची. बदलती शेती, पीकवाण, तंत्रज्ञान व बाजारपेठा या बाबी अभ्यासून गावातील शेतकरीही सुधारणा करण्याकडे वळले.

खरबुजाकडे वाटचाल
गावातील गोरख रसाळ हे प्रगतशील शेतकरी आहेत. सन २००५ नंतर मल्चिंग पेपरच्या आधारे त्यांनी खरबुजाचा प्रयोग सुरू केला. गावातील तरुणांनीही अभ्यासातून टोमॅटो, ढोबळी मिरची, दोडके, कारली, पपई अशा पिकांकडे मोर्चा वळवला. त्यात त्यांचा जम बसू लागला. रसाळ यांनी अन्य शेतकऱ्यांना खरबुजाविषयी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्याचे अर्थकारण समजून घेऊन शेतकरी त्याकडे वळू लागले. तंत्र आत्मसात होऊ लागले. गावचे अर्थकारण बदलू लागले. आजमितीला दीडशे एकरांहून अधिक क्षेत्रापर्यत खरबूज लागवडीचा पल्ला गावाने गाठला असावा.

तरुणांनी पेलली तंत्रज्ञानाधारित शेती

  • नवी पिढी शेतीबाबत फार गंभीर नाही. त्यांचा कल व्यवसाय नोकरीकडे आहे हा समज बोरीबेल गावाने चुकीचा ठरवला आहे. गावात शंभरहून अधिक शेतकरी व त्यातही प्रामुख्याने युवा शेतकरी खरबूज, टोमॅटो कलिंगड पिकांमध्ये गुंतले आहेत. नवे तंत्रज्ञान वापरून चांगल्या पद्धतीने पीक व्यवस्थापन करण्यात ते कुशल झाले आहेत.
  • दरवर्षी जानेवारीत खरबूज लागवडीचे नियोजन होते. एकरी सुमारे सातहजार रोपे बसतात. एकरी तीन ते चार ट्रॉली शेणखताचा वापर करून गादीवाफे तयार केले जातात.
  • विविध वाणांचा शोध घेऊन त्यांची निवड केली जाते.
  • पॉली मल्चिंग पेपर अंथरून त्यावर रोपे लावून दहा दिवसानंतर ‘क्रॉप कव्हर’ने रोपे झाकली जातात.
  • सुमारे २२ दिवसांनंतर हे कव्हर काढण्यात येते. सुमारे ७० दिवसांत काढणीस सुरुवात होते. एकरी १२ ते १५ टनांपर्यत उत्पादन मिळते. त्यासाठी ७५ ते ८० हजार रुपये खर्च येतो.

दर व बाजारपेठा

  • वर्षभराचा विचार केल्यास किलोला १० रुपयांपासून ते १५ व कमाल २० रुपयांपर्यंत दर मिळतो. गेल्या वर्षीपासून कोरोना संकटामुळे बाजारपेठा विस्कळित झाल्या आहेत. व्यापारी दर पाडून मागत आहेत. विक्रीसाठी अडचणी येत आहेत. दर घसरले आहेत. तरीही शेतकरी अडचणींवर मात करीत १२ ते १५ रुपये दर मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • कलिंगडासाठी पुणे, मुंबई, दिल्ली व सुरत या बाजारपेठा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी १५ ते २० किलोच्या क्रेटमधून याच बाजारपेठांत ती पाठवतात. काही व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावरूनही खरेदी करतात. स्वतः विक्री केल्यास किलोमागे दोन ते तीन रुपये अधिक मिळतात. खरबुजाचा तीन महिन्यांचा हंगाम जोमात असतो. त्यानंतर सुमारे ८० टक्के उत्पादक त्याच मल्चिंग पेपरवर टोमॅटोचे उत्पादन घेतात. दोन वर्षांपासून ५० ते ६० टक्के शेतकरी ढोबळी मिरचीकडे वळाले असल्याचे दिसून येते.

उलाढाल
गावात दरवर्षी खरबूज शेतीतून किमान दोन कोटी रुपयांच्या पुढे उलाढाल होत असावी.
टोमॅटो व ढोबळी या दोन पिकांची त्यात भर घातल्यास ती काही कोटींनी वाढते. विशेष म्हणजे युवा, उच्चशिक्षित व अल्पभूधारक वर्गातील शेतकऱ्यांचे हे यश म्हणावे लागेल. सुधारित शेतीमुळे नवी घरे. ट्रॅक्टर, अवजारे खरेदी करणे शक्य झाले आहे. यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. दहा ते १२ विहीरी व बोअरवेल्स आहेत. खडकवासला धरण साखळीतून वर्षाला ३ ते ४ वेळा पाणी कॅनॉलद्वारे मिळते. तुषार व ठिबक सिंचनाचा वापर होतो. यंदा वातावरणातील बदलामुळे खरबुजावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकरी रासायनिक अवशेषषमुक्त शेतीकडे वळू लागले आहेत.

प्रतिक्रिया
गावात बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. नवे तंत्रज्ञान व पूरक बाबींसाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत पातळीवर शक्य होईल तेवढी मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास त्यातून मदत
होते.

- नंदकिशोर पाचपुते, सरपंच, बोरीबेल

मी अनेक वर्षांपासून खरबूज शेती करतो. टप्प्याटप्प्याने सुधारणा करीत गेलो. ठिबक, तुषार सिंचन, पॉली मल्चिंग यांचा वापर सुरू केला. अलीकडे जिवाणू स्लरीचा वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळत आहे.
- गोरख रसाळ, ९७६३६३६०६८
प्रगतिशील शेतकरी

मी २००८ पासून चार ते पाच एकरांत खरबूज, केळी अशी पिके घेत आहे. त्यातून
आर्थिक सक्षमता मिळवली आहे.

- बाळकृष्ण पाचपुते, ९९२२२८९२३१


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...