agricultural news in marathi success story Custard apple gave support to farmers | Agrowon

सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधार

संदीप नवले
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

ऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी असलेल्या फळांमध्ये सीताफळाचा समावेश असतो. यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर हंगामात दररोज १० ते १२ टन आवक झाली. मागणी अधिक राहून प्रति किलो १० ते २०० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळाला.
 

ऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी असलेल्या फळांमध्ये सीताफळाचा समावेश असतो. यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर हंगामात दररोज १० ते १२ टन आवक झाली. मागणी अधिक राहून प्रति किलो १० ते २०० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळाला.

दसरा, दिवाळी व त्यापुढील काळ हा विविध फळांच्या बाजारपेठेतील आवकेचा असतो. सीताफळ हे त्यातील मागणी असलेले महत्त्वाचे पीक आहे. पुणे- गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यातील वडकी, राजगुरुनगर, उरळी कांचन, यवत, पाटस, पुरंदर, नगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, नेवासा, सातारा, औरंगाबाद या भागातून मोठ्या प्रमाणात आवक होते.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे थेट विक्रीवर शेतकरी भर देऊ लागले आहेत. गुलटेकडी येथे यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर या हंगामात दररोज अवघी १० ते १२ टन आवक झाली. त्यातच मागणी अधिक राहिल्याने दरात चांगलीच वाढ होऊन प्रति किलोला २०० रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळाला आहे. सध्या दररोज चार ते पाच टन आवक सुरू असून, प्रति किलोला १० रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

या भागातून होते आवक
राज्यात जवळपास १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्र सीताफळाखाली आहे. पुणे मार्केटमध्ये या जिल्ह्यातील वडकी, खेड, राजगुरुनगर, उरुळी कांचन, लोणी, यवत, पाटस, पुरंदर, नगरमधील, पारनेर, नगर, नेवासा, सातारा, औरंगाबाद या भागांतून मोठ्या प्रमाणात आवक होते.

यंदाचे दर (प्रति किलो रु.)
जून ते ऑक्टोबर- ५० ते २००
ऑक्टोबर ते नोव्हेंबर- १० ते १००
डिसेंबर ते जानेवारी ४० ते २००

या वाणांची आवक
बाजारात गावरान, बाळानगर, एनएमके गोल्डन अशा तीन वाणांची आवक मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहे. गावरान वाणात गराचे प्रमाण चांगले असते. टिकवणक्षमता अधिक व मागणीही चांगली असते. बाळानगर वाणात गराचे प्रमाण कमी व गोडी जास्त असते. एनएमके गोल्डन वाणाची फळे आकारानी मोठी असतात. गोडीही चांगली असते. बहुतांश सण ऑगस्ट ते डिसेंबर कालावधीत येतात. त्या वेळी या फळांना ग्राहकांकडून मागणी अधिक असते. साहजिकच मार्केटमध्ये दररोज १० ते १२ टन आवक व्हायची. त्या वेळी किलोला १० ते २०० रुपयांपर्यंत दर होता. त्यानंतर दरात घसरण झाल्याने प्रक्रिया दारांचा खरेदीकडे कल वाढला होता. त्या वेळी दर १० ते १०० रुपयांपर्यंत झाले.

बासुंदी, कुल्फी, पल्प, आइस्क्रीम, रबडी आदी पदार्थांसाठी सीताफळाला मागणी असते. मार्केटमध्ये हंगामात चांगली आवक होत असली तरी इतर वेळेस ती दररोज ३ ते १० टनांपर्यंत असते. फळांना सरासरी ६० पासून ८० रुपये दर मिळत असून, महिन्याला सरासरी ४ ते ५ कोटींची उलाढाल होत असावी असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया
यंदा हंगामात पहिल्यांदाच सीताफळाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर दोनशे रुपयांपर्यंत गेले होते. सध्या आवक कमी असून, दर किलोला ७० ते ८० रुपयापर्यंत आहेत. एनएमके गोल्डन या जातीच्या फळाला गोवा, बंगळूर, हैदराबाद येथे सर्वाधिक मागणी असल्याने तेथे ती पाठवली जात आहेत.
- युवराज काची, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन, पुणे

शेतकरी अनुभव 
वडकी येथील शशिकांत फाटे म्हणाले, की पुणे शहरापासून १५-२० किलोमीटर अंतरावर वडकी (तळेवाडी) गावात आमची एकत्रित दहा ते बारा एकर शेती आहे. आमचे वडील पांडुरंग फाटे नोकरी करीत असताना पूर्वी अर्धा एकर क्षेत्रात सीताफळ बाग केली होती. त्यानंतर क्षेत्र वाढविण्यावर भर दिला. आता अडीच एकर क्षेत्र आहे. एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते. काढणी केल्यानंतर ग्रेडिंग करून हंगामात दररोज ३० ते ३५ क्रेट बाजारात पाठवितो. यंदा प्रति किलो दहा ते कमाल १८० रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी दर ७० रुपयांपर्यंत मिळाला.
- शशिकांत फाटे, वडकी
९५११६८९१९३


इतर अॅग्रो विशेष
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
थंडीत वाढ शक्यमहाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १०१२...
मसाला उद्योगासोबत सेंद्रिय शेतीकडे...लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय...
‘रिलायन्स’ पीकविमा भरपाई देण्यास तयारपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी दहा...
नाशिकमध्ये भरला साहित्यप्रेमींचा मेळा नाशिक : येथील कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४व्या...
देशात ४७.२१ लाख टन साखरेचे उत्पादनकोल्हापूर : देशातील साखर हंगाम वेगाने सुरू झाला...
बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची...
कृषी शिक्षणाचा टक्का घसरलापुणे ः राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाचा गाडा...
राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची...पुणे : राज्यात बुधवारपासून (ता. १) पावसाने हजेरी...
राज्यातील द्राक्ष बागांना १० हजार...सांगली ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्व...
पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाला...पुणे ः पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन आणि...