agricultural news in marathi success story of custard market in Nagpur | Agrowon

नागपूरला फुलला सीताफळाचा बाजार

विनोद इंगोले
गुरुवार, 30 सप्टेंबर 2021

नागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले आहे.  दररोज दीड हजार क्रेटपर्यंत एकूण आवक असून दीडशे रुपयांपासून ते ५०० व कमाल १५०० रुपयांपर्यंत प्रति क्रेट दर मिळत आहे.
 

नागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले आहे. काटोल तालुक्‍यातील वनव्याप्त क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात आवक असून येथील आदिवासींसाठी ते उत्पन्नाचे हक्काचे साधन झाले आहे. मध्य प्रदेशातूनही काही आवक आहे. दररोज दीड हजार क्रेटपर्यंत एकूण आवक असून दीडशे रुपयांपासून ते ५०० व कमाल १५०० रुपयांपर्यंत प्रति क्रेट दर मिळत आहे.

गणेशोत्सवापासून विविध सणासुदींना प्रारंभ होतो. नवरात्र, दसरा, दिवाळी अशा टप्प्याटप्प्याने येणाऱ्या सणांमध्ये फळांची मागणी वाढते. सीताफळ हे त्यापैकी एक. अलीकडील दिवसांत राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांप्रमाणे नागपूर येथील महात्मा फुले मार्केटमध्येही नव्या हंगामातील सीताफळाची आवक वाढली आहे. आकारानुसार ३०० ते ५०० रुपये डझन दराप्रमाणे मिळणारा घाऊक दर पाचशे रुपयांपासून ते १५०० रुपये प्रति क्रेट आहे. वन्य भागातून आदिवासींद्वारे संकलित होणाऱ्या फळांचा यात समावेश आहे. आदिवासींशाठी उत्पन्नाचा हा हंगामी स्रोत महत्त्वाचा ठरला आहे. 

विविध भागांतून आवक
 नागपूर जिल्ह्यातील काटोलचा परिसर संत्रा उत्पादनासाठी आघाडीवर आहे. या तालुक्‍यात वनव्याप्त क्षेत्र मोठे असून लोहगड, झिल्पी, बुधाळा, झटामझरी या भागांतील वनक्षेत्रात नैसर्गिक रित्या सीताफळाचे बन विकसित झाले आहे. येथील आदिवासी कुटुंबीय दिवस उजाडताच जंगलात जाऊन तोडणी करतात. प्रति व्यक्‍ती ३ ते ४ क्रेट एवढी तोडणी करते अशी माहिती लोहगड येथील सुनील उईके यांनी दिली. छोट्या मालवाहू गाडीत सुमारे १०० क्रेटस बसतात. सामूहिकपणे तोडणी करून तो माल बाजारात पाठविण्यावर भर राहतो. कौटुंबिक गरजांच्या पूर्ततेसाठी हे उत्पन्न उपयोगी ठरते.

एका कुटुंबात चार जणांचा समावेश असल्यास प्रति चार याप्रमाणे १२ क्रेट फळे कुटुंबाद्वारे संकलित होतात. त्यातून कुटुंबास १२०० रुपयांचे उत्पन्न मिळते. सद्यःस्थितीत दररोज एक हजार ते दीडहजार क्रेटची आवक असल्याचे महात्मा फुले मार्केटमधील व्यापारी राजू गडपायले सांगतात. व्यावसायिक लागवड केलेल्या सीताफळाचा आकार हा सरासरी ३०० ते ४०० ग्रॅमपर्यंत राहते. दर्जाही जंगलातील मालापेक्षा चांगला राहतो. ग्राहकांची देखील मोठ्या आकाराच्या आणि पांढरा गर असलेल्या फळांना अधिक पसंती राहते. त्यानुसार दर ठरतात. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, मोहपा, देवलापार यासोबतच मध्यप्रदेशातील छिंदवाडा शिवणी भागातील सीताफळ देखील बाजारात येते.

लिलाव पद्धत 
फुले मार्केटमध्ये सकाळी खुली लिलाव प्रक्रिया पार पडते. बोली लावत दर निश्‍चित केला जातो. शंभर रुपये प्रति क्रेट या दराप्रमाणे सुरुवात करून ती वाढवत जादा बोली लावणाऱ्या व्यापाऱ्याला संबंधित शेतकऱ्याचा माल दिला जातो. फुले मार्केटमध्ये १५ ते २० व्यापारी फळांचा व्यापार करतात. प्रत्येकाकडे ५० ते १०० ते १०० क्रेट आवक होते. अनेक वर्षांपासून फळांचा व्यापार करणाऱ्या प्रकाश गायकवाड यांच्याकडील फळांचा दर्जा चांगला असतो. क्रेटमध्ये सरासरी ३० ते ४० नग राहतात. दिवाळीपर्यंत आवक सुरू असते. काही आदिवासी टोपल्यांमधूनही विक्रीस आणतात. प्रति टोपलीत ६० ते ७० फळे राहतात. एकूण विचार केल्यास चार महिन्यातील उलाढाल काही कोटींच्या घरात जात असल्याचे गायकवाड सांगतात. 

 बोरकर यांची थेट विक्री व्यवस्था 
वर्धा जिल्ह्यातील सुलतानपूर (ता. हिंगणघाट) येथील रतन बोरकर यांची सात वर्षे जुनी एक एकर बाग आहे. तर दोन वर्षांपूर्वीची दोन एकरांतील नवी लागवड आहे. आंध्र प्रदेशातील कृषी विद्यापीठाद्वारे विकसित सरस्वती-७  हे वाण त्यांच्याकडे आहे. एकरी अडीच टनांपर्यंत उत्पादकता होते. २५ ऑक्‍टोंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगामाचा कालावधी राहतो. एकेप्रसंगी  फळाचे कमाल वजन त्यांना १५०० ग्रॅमही मिळाले होते. मात्र हा अपवाद वगळता २५० ते ३०० ते ४०० ग्रॅम सरासरी वजन राहते. दोन किलोच्या बॉक्‍स पॅकिंगमधून विक्री करण्यावर रतन यांचे काही  वर्षांपासून सातत्य राहिले आहे. या बॉक्‍सची किंमत ३०० रुपये ठेवली आहे. व्हॉट्‌सॲप ग्रुपवर सीताफळ उपलब्धतेची माहिती देताच ग्राहकांकडूनच मागणी यायला सुरुवात होते. घरपोच पुरवठा होतो. घरूनही काही विक्री होते. अर्थात हिंगणघाट शहरापुरतीच विक्री व्यवस्था उपलब्ध आहे. उत्पादन अधिक झाल्यास व्यापाऱ्यांना विक्री होते. 
- रतन बोरकर,  ९८६०१३४३५८  
सीताफळ उत्पादक

प्रतिक्रिया
सातपुड्याच्या दक्षिण पायथा भागात शिवणी, बैतूल, मोर्शी, वरुड, अचलपूर यांचा समावेश होतो. या भागात सीताफळाचे वन उभे राहिले आहे. बांबू वा लाकूड उपयोगासाठी लागवडीवरच वनविभागावर भर राहतो. फळलागवड शक्यतो केली जात नाही. त्यामुळे सीताफळाची ही लागवड नैसर्गिक आहे. त्यामुळे  हे कोणते वाण असेल याविषयी स्पष्ट सांगता येणार नाही. जंगलात अनेक झाडे असतात. त्यांच्या बियांचा प्रसार पक्ष्यांच्या चोचीद्वारे, पाण्याच्या प्रवाहाबरोबर होतो. अमरावती वन विभागांतर्गत संयुक्‍त वन व्यवस्थापन समितीलाही सीताफळ विक्रीचे अधिकार देण्यात आले आहेत. आदिवासींना देखील ते आहेत. मात्र त्या मोबदल्यात वनांचे संरक्षण करा असे त्यांना सांगण्यात आले आहे. 
- किशोर रिठे,  : ९४२२१५७१२३ 
वन अभ्यासक, अमरावती. 
 
राज्यात सुमारे ७० हजार हेक्‍टरवर सीताफळ लागवड आहे. सुरुवातीला बालानगर या वाणाखालील क्षेत्र अधिक होते. सध्या प्रसारामुळे एनएमके-गोल्डन १ वाणाला शेतकऱ्यांकडून मागणी आहे. चवीसाठी बालानगरलाही खवय्यांची पसंती राहते. तीनशे ग्रॅमपेक्षा अधिक वजनाच्या आणि मोठे डोळ्यांच्या फळांना ग्राहक अधिक पसंती देतात. बाजारात किलोला ७०, ८० रुपयांपर्यंत दर राहतात. एखाद्या वर्षी आवक कमी असल्यास हा दर २०० रुपयांवरही जातो. लहान आकाराच्या फळांना प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी राहते. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात ७० अशा प्रकारचे प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे छोट्या फळांबाबतची समस्या दूर होण्यास मदत मिळते.   
- अनिल बोंडे,  : ९४२२१६२२६६ .
सचिव, अखिल महाराष्ट्र सीताफळ 
उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ 
(सीताफळ महासंघ) 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
ग्राम, पर्यावरण अन शेती विकास हेच ध्येय...चांदूररेल्वे (जि. अमरावती) येथील साईबाबा ग्रामीण...
बचत अन् पूरक उद्योगातून आर्थिक...भाजीपाला लागवडीसह कुक्कुटपालन, पशुपालन, शिलाईकाम...
तिसऱ्या पिढीने जपला प्रयोगशिलतेचा वारसागोलटगाव (जि. औरंगाबाद) येथील कृषिभूषण सुदामअप्पा...
शेतीमाल मूल्यवर्धनात दत्तगुरू कंपनीची...हिंगोली जिल्ह्यातील प्रयोगशील व अनुभवी शेतकरी...
गाजराचे गाव म्हणून कवलापूरची ओळखकवलापूर (जि. सांगली) गावातील शेतकऱ्यांनी...
सेंद्रिय, रासायनिक पद्धतीने दर्जेदार...मुर्ठा (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील युवा...
फळबाग केंद्रित व्यावसायिक शेतीचा उभारला...ओणी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील कृषी...
वाशीच्या बाजारात लोकप्रिय झेंडेचा अंजीर...दुष्काळी पुरंदर तालुक्यात दिवे येथील झेंडे कुटुंब...
श्‍वानपालन रुजविले, यशस्वी केलेमातृतीर्थ सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील अतुल...
फळबागेच्या नेटक्या नियोजनातून आर्थिक...कुंडल (जि. सांगली) येथील महादेव आणि नाथाजी हे लाड...
महिला, शिक्षण अन्‌ ग्रामविकासातील ‘...कानडेवाडी (ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापूर) येथे...
ब्रॅंडेड अंजीर, सीताफळाला मिळ लागली...अंजीर व सीताफळ या पुरंदर तालुक्यातील (जि. पुणे)...
कांदासड रोखण्याऱ्या तंत्राची अभियंता...नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कल्याणी शिंदे या...
कोकणात फुलला कॉफीचा मळारत्नागिरी - कोकण म्हटलं की आपल्याल्या चटकन आठवतो...
रेशीम उत्पादकांचे गाव, त्याचे बान्सी...सिंचन सुविधांचा अभाव असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील...
वर्षभर तिहेरी आंतरपीक पद्धती, आले शेती...सातारा जिल्ह्यातील पाल येथील विजय व सतीश या शिंदे...
माळरानावर फळबागांमधून समृद्धीवाट्याला आलेल्या डोंगराळ माळरानाची बांधबंदिस्ती...